क्रीडा

फुटबॉल विश्वचषक २०२२

Submitted by आशुचँप on 12 November, 2022 - 12:39

जगात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक २०२२ स्पर्धेला येत्या रविवार (२० नोव्हेंबर) पासून सुरुवात होत आहे. या महास्पर्धेच्या चर्चेसाठी हा धागा

स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यादाच कुठल्या अरब देशात ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे नोहेंबर डिसेंबर मध्ये ही स्पर्धा कारण तिथल्या उन्हाळ्यात खेळायची तर बातच नाही. आतासुद्धा कतारमध्ये एसी स्टेडीयम असतील असे जाहीर करण्यात आले आहे.

दरवेळी प्रमाणेच ८ ग्रुपमधून १६ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. असे म्हणले जात आहे की ३२ संघ असलेली ही कदाचित शेवटची स्पर्धा आहे. पुढील विश्वचषकाला संघांची संख्या वाढवली जाईल.

विषय: 

कालचा दिवसच 'विराट' होता

Submitted by फेरफटका on 25 October, 2022 - 14:49

काल कुठलीही ईडा-पीडा भारतीय संघाला छळणार नव्हती, कुठल्याही अतृप्त आत्म्याची बाधा होणार नव्हती, कुणाचे शिव्या-शाप भोवणार नव्हते कारण कालचा दिवसच भारतीय संघासाठी 'विराट' होता.

आव्हानाचे अत्तर (इटली आयर्नमॅन स्पर्धा) भाग ४ शेवट

Submitted by हर्पेन on 19 October, 2022 - 02:32

भाग १ इथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/82537

भाग २ इथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/82540

भाग ३ इथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/82546

१८ सप्टेंबर २०२२

विषय: 

आव्हानाचे अत्तर (इटली आयर्नमॅन स्पर्धा) भाग ३

Submitted by हर्पेन on 17 October, 2022 - 07:55

भाग १ इथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/82537

भाग २ इथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/82540

भाग ३ सुरु

मुक्काम चर्व्हिया 

१३ सप्टेंबर २०२२

विषय: 

आव्हानाचे अत्तर (इटली आयर्नमॅन स्पर्धा) भाग २

Submitted by हर्पेन on 13 October, 2022 - 03:02

भाग १ इथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/82537

भाग २ सुरु

करोना काळातल्या त्या दोन वर्षांच्या बऱ्या(च)वाईट आठवणी मागे टाकून पुनःश्च हरिओम करून स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली.

विषय: 

आव्हानाचे अत्तर (इटली आयर्नमॅन स्पर्धा) भाग १

Submitted by हर्पेन on 11 October, 2022 - 07:57

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर - कवी गुरु ठाकूर

मी इटलीतील चर्व्हिया येथे १८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या स्पर्धेत भाग घेऊन ३.८ किमी पोहणे, १८०. किमी सायकल चालवणे आणि ४२. किमी धावणे ह्या तिन्ही गोष्टी १४ तास ३५मिनिटात संपवून आयर्नमॅन हा किताब पटकावला. १६ तासात ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्वांनाच हा किताब मिळाला.

मी आयर्नमॅन कसा झालो त्याची ही कथा.

विषय: 

रॉजर फेडरर

Submitted by विक्रमसिंह on 15 September, 2022 - 11:39

एका युगाचा अंत . हा आठवडा काय घेऊन आलाय . सेरेना रिटायर झाली आणि आता रॉजर . काय बोलणार आणि लिहिणार त्याच्या विषयी . १०० पुस्तके तरी होतील त्याच्यावर .
आम्हाला अप्रतीम टेनिस पाहिल्याचा आनंद दिला . भारताच कोणी नसले तरी आम्ही त्याच्या साठी सगळे सामने पहायचो . सुरुवातीला तू चिडकी होतास . पण नंतर Humility personsonified .
असो .
तुझ्या जुळ्या मुलांना आणि मुलींना तू घडवत असशीलच . तुझ्या सारखेच असोत . वाट बघतोय .

शब्दखुणा: 

नर्डल (NERDLE) - अंकखेळ

Submitted by जयु on 11 June, 2022 - 23:36

Nerdle ( https://nerdlegame.com/ ).
मायबोलीवर सध्या वर्डल, शब्दखुळ या खेळांची बरीच चलती आहे. तसाच गणितीय खेळ आहे - नर्डल . ० ते ९ आकडे आणि प्राथमिक गणितीय क्रिया + , - , * , / वापरून योग्य समिकरण तयार करायचे आहे . दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे , वर्डल सारखेच आहेत.
काळं-->> अंक/ क्रिया बाद .
गुलाबी-->>अंक/ क्रिया बरोबर पण जागा चुकली.
हिरवा-->>अंक/ क्रिया आणि जागा पण बरोबर.

शब्दखुणा: 

महाराष्ट्राच्या या प्रतिभावान टेनिसपटूच्या स्वप्नांना बळ हवंय

Submitted by दिनेशG on 8 November, 2021 - 03:38

दोनच वर्षांपूर्वी पुण्याला झालेल्या एका आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेमध्ये भारतात आज ज्युनिअर गटाच्या क्रमवारीत नंबर २ आणि महिलांच्या गटातील क्रमवारीत नंबर २१ वर असणाऱ्या नवी मुंबईच्या आकांशा नित्तुरेची गाठ पहिल्याच फेरीत यावर्षीची यूएस ओपनची विजेती एमा राडूकानू हिच्याशी पडली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर फार कमी अनुभव असणारी सोळा वर्षीय आकांशा हरली खरी पण तो अनुभव तिला फार काही शिकवून गेला.

Pages

Subscribe to RSS - क्रीडा