लेखन

कवितेचे पेड

Submitted by anjali maideo on 18 June, 2014 - 23:04

कवितेचे पेड
--------------
वेणीत गुंतलेले ते एकसारखे तीन
शब्द ,लय, भाव
कवितेचे।।

शब्द एक पेड
दुसरा तो भाव
तिसरा लयीत हेल
गेयाचा ।।

जरी वजनात अंतर
पडे कुणाही एकात
नाही मिळे कौल
मनाचा ।।

जरी पडतात शब्द
नेमक्या मात्रेत
सुटतो धागा
अर्थाचा ।।

एरवी काम बिघडे
जमुनी ह्या अंकात
कवितेला आधार
तीनाचा ।।

अंजली मायदेव
११/१२/२०१३

विषय: 

चूल

Submitted by anjali maideo on 18 June, 2014 - 23:01

चूल

चूल म्हणल्यावर कुणीही सांगेल की तीन दगडं किंवा दोन-दोन-दोन अशा सहा वीटा लावून चूल मांडतात. पण ही ढोबळ माहिती झाली.
मुळात चूल आणि चुला असे दोन प्रकार.
जेवणावळीना किंवा मोठ्या प्रमाणात जेव्हा जेवण तयार करतात तेव्हा स्वयंपाकी मांडतात तो तात्पुरता दगड किंवा वीटांनी बनवलेला तो चुला.

विषय: 
शब्दखुणा: 

अस्वस्थ

Submitted by चाऊ on 18 June, 2014 - 07:39

भय वाटते शांततेचे करा गोंगाट करा
ढोल ताशे नगारे टिव्ही रेडीओ सुरु करा

बुडून जाऊ या कल्लोळात भोवतालच्या
बघू दडपतो का आवाज आतल्या कल्लोळाचा

बधीर सारी गात्रे नको ऎकू काही खरे
नुसताच आवाज, नको कुठल्या अर्थाचे किनारे

भणंग भटकणे दिशाहीन, आज भावते
न मिळाली मंझील तर? जीवा धाकावते

कमवू उधळू जाळू स्वता:ला आणी जगाला
कशास हवे काही कारण आज जगायला

चित्र नको नुसतेच रंगाचे फराटे
गुंगवून टाकणारे मायाजाल उफराटे

अशांत मन, तन, जग सारे तेवढेच उरते
विध्वंसाची पहाट फक्त उजाडताना दिसते

प्रतिमा-प्रचीती

Submitted by शर्मिला फडके on 14 June, 2014 - 14:06

प्रतिमा-प्रचीती
नितीन दादरावाला
लोकवाङ्मय गृह

छायाचित्रकारांवर लिहिले गेलेले पुस्तक वाचताना तुमच्या मनात काय अपेक्षा असतात? असाव्यात?

संस्कृती

Submitted by लाल्या on 12 June, 2014 - 21:59

भेटते... हरवलेली संस्कृती अधेमध्ये भेटते!!

एअरकंडिशन्ड गाडीतून ऑफिसला जाताना,
एफ.एम. वरचे रिमिक्स मनामध्ये गाताना.
एखाद्या जुन्या चालीतून मनाला छेडते.
भेटते... हरवलेली संस्कृती अधेमध्ये भेटते!!

दर्शनासाठी कशाला सालं लायनीत उभं राहायचं?
पैसे टेकवून दलालाला शॉर्ट-कट दर्शन घ्यायचं!
तीर्थ बनून हळूच तेव्हा ओंजळीत शिरते...
भेटते... हरवलेली संस्कृती अधेमध्ये भेटते!

दिवाळीच्या सुट्टीत जेव्हा हिल-स्टेशन गाठतो.
रम घेऊन हातात जेव्हा धिंगाणा घालतो.
फुलबाजाची तडतड बनून कानावर पडते.

विषय: 

आजीची गोष्ट

Submitted by लाल्या on 12 June, 2014 - 21:50

Tiger.jpgखूप खूप वर्षांपूर्वी, एक होतं गाव,
आजी माझी सांगायची, आटपाट त्याचं नाव.
या आटपाट नावाच्या गावात, रहायचा एक वाघ,
त्याने लावला होता सपाटा - ह्याला त्याला खाऊन टाक.

सगळा गाव हादरला,
वाघोबाला घाबरला,
सगळे गेले कोतवालाकडे,
तो त्यांच्यावरच डाफरला.

"तुमचे प्रॉब्लेम तुम्ही बघा, आपल्याला नको टेन्शन,
नोकरी करतो झोपायची, नंतर मिळतं पेन्शन."

सगळे गेले कोतवालाच्या मोठ्या साहेबाकडे,

विषय: 

सॉरी, राहुल!

Submitted by लाल्या on 12 June, 2014 - 21:47

कधी कधी वाटतं, राहुलला माझ्या,
काही गोष्टी दिसणार नाही!
जेव्हा आम्हाला दिसल्या होत्या, तेव्हा कुठे ठाउक होतं?
त्याच्यावेळी त्या असणार नाही!

"लईवालाSS" ओरडणारा
कलईवाला खान.
रिक्शावाले जो देत असत,
गिर्‍हाईकांना मान.
फेरिवाले गाडी घेऊन
रस्त्यावर फिरायचे.
फूटपाथ वर चालणारे त्यांचं
सामान विकत घ्यायचे.
फूटपाथ असतं चालण्यासाठी,
हे त्याला कधीच कळणार नाही...
कधी कधी वाटतं, राहुलला माझ्या,
काही गोष्टी दिसणार नाही.

फिल्म्स डिविजनचे
लहान लहान कार्टून प्लॉट.
दीदीच्या "अनेक चिडियॉं"चा
गोड चिवचिवाट.

विषय: 

"वृक्षसखा"

Submitted by जिप्सी on 12 June, 2014 - 06:50

वटपौर्णिमेला आईने त्याला वडाची फांदी आणायला सांगितले. झाडाची फांदी तोडावी वगैरे त्याच्या तत्वात बसणारे नसल्यामुळे त्याने आईचे बौद्धिक घेतले. आईनेही त्याला प्रतिप्रश्न केला, की मला वडाची पूजा करायची आहे ती कशी करायची ते सांग. त्या माऊलीला तिची परंपरा जपायची /जोपासायची होतीच. तो शांतपणे गच्चीत गेला आणि तिथली एक कुंडी त्या‍ने आईसमोर आणून ठेवत सांगितले, "याची पूजा कर!" त्या- कुंडीत होतं, त्याने जगवलेले आणि जोमाने वाढणारे "वडाचे झाड!"

यातील "तो" म्हणजे तुमच्या आमच्यासारखाच मध्यमवर्गीय तरूण "विक्रम यंदे".

स्कूल चले हम

Submitted by dreamgirl on 11 June, 2014 - 07:07

(थोपू वर पूर्वप्रकाशित Happy )

चला, अ‍ॅडमिशनचा कार्यक्रम एकदाचा पार पडला...
एका महीन्याच्या फरकासाठी म्हणे अख्खं वर्ष लहान गटात काढावं लागतंय... छ्या!! आजकाल काय हे पहीलीला जाण्यापूर्वी हजारो प्रकार असतात- प्ले ग्रूप, नर्सरी मग ज्युनियर केजी मग सिनीयर केजी.... आम्ही डायरेक्ट पहीलीत गेलो सहा वर्षांचे झाल्यावर. (म्हणजे घोडनवर्‍यांसारखा आमचा घोडविद्यार्थी प्रकार असावा!!) त्या आधी घरातली लुडबूड कमी व्हावी म्हणून आजूबाजूच्या बालवाड्यांमध्ये काही काळ सोडले जात असे अस्मादिकांना. दुपार तेव्हढीच टेन्शनफ्री आणि तेवढाच आपल्या डोक्याचा त्रास दुसर्‍यांच्या डोक्याला Proud

मीही जुनीच आहे...!

Submitted by मुग्धमानसी on 9 June, 2014 - 08:09

मीही जुनीच आहे...

अस्वस्थ दमटलेल्या
मातीत खोल खोल
रुजलेली एक बोच
कुजलेली एक ओल
त्यातून उगवते मी
अन् उन्मळून जाते
हे रोज रोज घडते
तरिही हि मीच आहे...
मीही जुनीच आहे!

आकाश दाबूनी या
जमिनीस झाकताना
जात्यात सर्व दाणे
एकत्र भरडताना
मीही अधांतरी ही
या पोकळीत घुमते
मी नष्ट होत नाही
मी सान होत जाते
उधळून सर्व देते...
उरले जराच आहे...
मीही जुनीच आहे!

मीही जुनीच आहे...

उन्मत्त आरशाला
खोट्या जलाशयाला
मी वाचताच ये ना
कुठल्याच पंडिताला!
सुटली कठोर गणिते
शास्त्रेही क्लिष्ट कळली
माझीच भंगलेली
प्रतिमा कुणा न जुळली...!
जरी विस्कटून गेले,
तुमच्यातलीच आहे...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन