चूल

Submitted by anjali maideo on 18 June, 2014 - 23:01

चूल

चूल म्हणल्यावर कुणीही सांगेल की तीन दगडं किंवा दोन-दोन-दोन अशा सहा वीटा लावून चूल मांडतात. पण ही ढोबळ माहिती झाली.
मुळात चूल आणि चुला असे दोन प्रकार.
जेवणावळीना किंवा मोठ्या प्रमाणात जेव्हा जेवण तयार करतात तेव्हा स्वयंपाकी मांडतात तो तात्पुरता दगड किंवा वीटांनी बनवलेला तो चुला.
चूल ही कुंभाराकडे तयार होणारी चि-याची दगडात कोरुन केलेली किंवा मातीची असते.चुलीचे दोन भाग----चूल आणि वैल.चुलीवर शिजवलेले अन्नाचे पातेले मंद आचेवर ठेवायचे झाल्यास वैलावर ठेवतात.चूल म्हणजे मुख्यत: ज्यात विस्तव असतो आणि वैल म्हणजे ह्या विस्तवाची धग बंद भागातून चुलीच्या दुस-या भागात कमी प्रमाणात येते तो भाग.ह्या वैलाकडे जाळ जाऊ नये यासाठी त्याचे तोंड बंद करण्यासाठी मातीच्या गोळ्यासारखे साधन असते ते वैलाच्या तोंडावर ठेवले की हवा न मिळाल्याने तिथे जाळ रहात नाही. एरवी त्याच्या मंद आचेवर अन्न शिजे.

चूल वापरायची पध्दत
हिंदू पध्दतीप्रमाणे अग्नि हा देव मानला जातो म्हणून तो विझवत नसत.पण म्हणून चूलही पेटती ठेऊन लाकडाचा अपव्यय करत नसत.दिवसभराची सर्व कामे आटोपली की रात्री भाताच्या तुसाने भरलेल्या छोट्या शेगडीत स्वयंपाकघरातील चुलीतला एक जळता निखारा ठेवीत असत. आणि मग चूल विझवत असंत.मग रात्रभर त्या निखा-याच्या मंद आचेवर ते तूस व त्यात भरलेल्या शेणी पेटती रहात असे .ही छोटी शेगडी भरणे हे संध्याकाळचे काम असे. छोट्या मातीच्या शेगडीत भाताचे तूस घालून त्यात शेणी (गाई-म्हशीच्या शेणापासून बनवलेली,उन्हात वाळवलेली /गोवरी )पुरून ही शेगडी तयार करुन ठेवणे.
दुस-या दिवशी सकाळी केरवारे झाले की सारवंण हे महत्वाचे काम असे.ह्यामधे चूल सारवणे,स्वयंपाकघर सारवणे, देवघरासमोर व तुळशीसमोर सारवणं हे महत्वाचं. हे झालं की चूल पेटवून कामांना सुरवात. चूल सारवण्यासाठी लाल माती किंवा शेण वापरत.मग चूल पेटवायची आणि त्यासाठी आदल्या दिवशी छोट्या शेगडीत ठेवलेला निखारा वापरंत.यामुळे अग्नि तोच पुढे पेटता राही.साधारण प्रत्येक घरी स्वयंपाकघरात दोन चुली असत. आदल्या सकाळी सारवलेली चूल दुस-या दिवशी वापरली जाई व सहाजिकच आज सकाळी सारवलेलीचा वापर उद्यासाठी.पण सकाळचं पहिलं सारवण रोज ठरलेलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणखी सविस्तर हवे होते. भाताच्या तूसाची शेगडी मालवणला वेगळी भरत. एखादे नळकांडे चुलीत उभे ठेवून त्याभोवती दाबून दाबून भुसा भरायचा. अश्या चुलीची धग छान लागते. ( जागूचा लेख आहे. )

माझ्या आजोळी गॅस असला तरी भाकर्‍या अजूनही चुलीवरच करतात. पुर्वी मक्याच्या असत.
चुलीच्या मागे ठेवलेले दूध असेच मस्त गरम रहात असे. चुलीतच भाजलेल्या कांद्या खोबर्‍याचा मसाला वाटून रस्सा भाजी होते.
मी आजोळी गेलो कि भात पण चुलीवर करायला लावतो. त्याची करप म्हणजे माझा वीक पाँईट.

जेव्हा हाताला चटके... गाण्यात रत्नमालाबाईंनी स्वतः भाकर्‍या भाजल्या आहेत. त्या भाकर्‍या करण्यात फारच कुशल होत्या.

Khoop chhan anjali ji. Maza janma 80 chya dashakatala aani janmapasoon me mumbaikar tyamule chool mhanje mazyasathi aajine sangitaleli kinwa bhatuklit milnari chhoti steel chi evdhach maryadit hota..
Chhan vatala vachoon, ajun kahi mahiti asel tar nakki dya vachayla khoop awadel.
(Mazya tab varon marathi type hot nahiye so vachayala tras hoil tyabaddal sorry

मला चूल या प्रकाराबद्दल माहीती हवी असल्याने स्शोध घेताना हा धागा सापडला.

मी नव्या घरासाठी नैसर्गिक थीम बेस्ड प्लान बनवतीये. त्यात सौर चूल आणि पारंपारीक चूल असेच प्रकार असावेत असं माझं आणि नव-याचंही मत झालं आहे (इमर्जन्सी साठी कोळसा आणि शेगडी ).

त्यासाठी चूल कशी असावी, काय काळजी घ्यावी याची माहीती हवी आहे. घर शहरापासून बरंच दूर असणार आहे.

चुलीबरोबर चुलीवरचा स्वयंपाक कसा करतात याची सुद्धा माहीती हवी आहे.

चार बर्नरचा गॅस स्टोव्ह असतो तशीच चूल माझ्या लहानपणी आजी बनवायची. तशी चूल दिसतच नाही. आईलाही आता आठवणीत नाही काही. अशी चूल बाहेरच्या बाजूला बनवली तर धूर घरात येणार नाही. याबद्दल सुद्धा माहीती हवी आहे. पावसापासून या चुलीची काही काळजी घ्यावी लागेल का ?

डीविनिता

हो. ती चूल साफ सूफ करणे, शेणाने सावरणे वगैरे सगळं ती करायची. शेजारी एक मोठा रांजण होता. त्यातून मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन चुलीवर तापायला ठेवलं जायचं.

घरात कोणत्याही स्वरूपात पेटता अग्नि राखण्याची पद्धत दोन-तीन शतकांपूर्वी जगभर होती. याचे कारण म्हणजे तेव्हा काड्यापेट्या किंवा लायटर नव्हते. घर्षणाने अग्नि पेटवावा लागे आणि हे मोठेच कठिण काम होते. आपल्याकडे अजूनही महायज्ञादि कार्यात लाकडांच्या घर्षणाने अग्नि सिद्ध केला जातो. त्यासाठी कृत्रिम साधने वापरली जात नाहीत कारण नैसर्गिकरीत्या प्रज्वलित झालेला अग्नीच या कार्यांत पवित्र मानला जातो. अगदी पन्नाससाठ वर्षांपूर्वीपर्यंतसुद्धा आपल्याकडचे आदिवासी आणि कष्टकरी लोक चकमक आणि कापूस जवळ बाळगत. आपल्याकडे युरोपच्या मानाने काड्यापेट्या उशीरा आल्या. त्यामुळे तोपर्यंत चुलीमध्ये एखादा तरी निखारा धुमसत ठेवला जात असे. अग्निहोत्र धारण करण्यामागेसुद्धा सोयच प्रथम होती. नंतर तिला धार्मिक रंग चढले.
थंड प्रदेशांमध्ये तर उबेसाठी शेकोटी धगधगती ठेवावीच लागे. त्यामुळे तेथे वास्तुरचनेमध्ये फायर-प्लेस किंवा हर्थला महत्त्व आले.

नमस्कार, चुली ची माहिती उत्तम प्रकारे मांडालू आहे अंजली मॅडम नि. धन्यवाद मॅडम.

पिढ्यानं पुढल्या चालली अशा ह्या माती चा चुली दिवसेंदिवस लवकर खराब होत आहेत.

लोकांना ची गरज लक्षात घेऊन आम्ही ह्या मध्ये enginnering करून एक उत्तम प्रकारच्ची "सिमेंट" ची चूल बनवलेली आहे. चूल सिमेंट ची असले मुळे त्याला सिमेंट पाईप बसवल्यास धूर होत नाही.१०० % धूर न होण्या ची गॅरेंटी आम्ही देतो. चूल सिमेंट ची असले मुळे चूल गरम होते आणि ५० % इंधन ची बचत होते.

गेली २५ वर्षे आम्ही ही सिमेंट ची चूल विकत आहे. अगदी गोवा मालवण पासून सांगली ते बेळगांव ते सातारा हा पूर्ण भाग आम्ही कव्हर केला आहे सिमेंट चा चुली ने.

साधारवन माती चा चुली १ वर्ष असते. आमची सिमेंट ची " पार्वती समाधान चूल " आम्ही ५ वर्षे गॅरंटी देतो आणि ही चूल १०- १२ वर्षे चालते.

चुली चा फोटो ह्या सोबत जोडताना तांत्रिक अडचणी येत आहेत तुम्हांला फोटो और माहिती हवी असेल तर ह्या नंबर ला whatsapp केले तरी चालेल . अजून माहिती हवी असेल तर ९६०४८०७५०० ह्या नंबर ला कॉल करू शकता आपण.

कोल्हापूर - सांगली - बेळगांव - सावंतवाडी एवढ्या एरिया पर्यंत आम्ही घरपीच सुविधा देत आहोत.
चूल सोबत लहान भांडे बसवण्या साठी रिंग पण आम्ही देतो.