लेखन

पिठलं भात

Submitted by सुपरमॉम on 13 July, 2016 - 12:24

पिठलं भात

'हं, मग कुठे जायचंय जेवायला?' गाडी रिव्हर्समधे घेताघेताच नवर्‍याचा प्रश्न.

'कुठेही चालेल.'

मागच्या सीटवरून हेडफोन्स कानात घालतच मुलीचं उत्तर.

'कुठेही' या नावाचं हॉटेल अजून आपल्या गावात निघालेलं नाहीय.' नवर्‍याचा आवाज किंचित चढलेला.

'आस्क मॉम. तिचाच नेहमी प्रॉब्लेम असतो.' इति चिरंजीव.

'माझा?' माझा आवाज चांगलाच चढलेला.

विषय: 

धना भाग १

Submitted by प्रविण राऊत on 13 July, 2016 - 03:26

लेखन,संकपना,शदांकन
पै.गणेश मान

गडे
यांच्या परवानगीने

“धना”

एक गाव होत.महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात असणार्या गावांपैकी एक गाव म्हणा हवेतर.त्या गावात इतर गावाप्रमाणे गावकीसुध्दा होतीच.

गावात एक हनुमानाचे मंदिर होते,फार जुने.कोण म्हणत होते कि ते पांडव वनवासात असताना बांधले होते ,कोण म्हणत होते सातकर्णी राजवटीत बांधले गेले..!!

कोणी बांधले कोणास ठाऊक.मात्र बांधले असे होते काय विचारता.
दगड असले तासले होते कि एकवेळ उर्वशीच्या गालावर फिरवलेला हात सुध्दा थबकावा क्षणभर.
मजबूत,बेलाग,दणकट..उपमा नाही..!

(अल्पावधीत माडी कशी चढवावी ? ) *

Submitted by धनि on 12 July, 2016 - 15:32

त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.

अल्पावधीत ताडी कशी बनवावी?

Submitted by अज्ञातवासी on 12 July, 2016 - 14:31

त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा ग्रूप मायबोलीवर धिंगाणा घालायला येतोय. बहुतांश जणांचा धिंगाणा आधीच झालाय तरीही पुन्हा धिंगाणा घालणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी "द ग्रेट मुजिकल ऑलराऊंडर - हिमेस रेसमिया " (धाग्याचे नाव वाचून कोणी हसून हसून पडल्यास आम्ही जबाबदार नाही) आणि नुकतेच "AIB ची किड - पुन्हा एकदा - आवरा आता यांना" (हे धाग्याकर्त्यालाच लागू पडत होते केले होते.) या धाग्यांवर केले होते. हा मान यंदा चक्क "अल्पावधीत जाडी कशी वाढवावी?" या धाग्याने पटकावला आहे. पण एक गोची आहे.

विषय: 

रा.चिं.ढेरे : अखंड नंदादीप - श्रीराम रानडे

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

रा.चिं ढेरे परिवाराचे आणि आमचे खूप वर्षापासूनचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध. नुकतेच ढेरेअण्णा गेले. एक हाडाचा संशोधक, एक विचारवंत, एक लेखक आणि एक व्यक्ती म्हणूनही रा.चिं.ढेरे आम्हा सगळ्यांसाठीच वेगवेगळ्या पातळ्यांवर स्फूर्तीदायक व्यक्तीमत्व होतं. अण्णा गेले तेव्हा माझे आई-बाबा अमेरीकेत असल्याने त्यांच्या अखेरच्या दर्शनाला, ढेरे परिवाराला भेटायला प्रत्यक्ष जाऊ शकले नाहीत ही खंत आई-बाबांना अस्वस्थ करत असणार. या अस्वस्थतेतच बाबांच्या हातून 'अण्णांना आदरांजली' या भावनेनं उतरलेला हा लेख - अखंड नंदादीप !
---------------------------------------------

प्रकार: 

मार्को - भाग ३

Submitted by अज्ञातवासी on 12 July, 2016 - 08:52

"काय वेडेपणा चाललाय?"
"पुतळ्याला जाळी बसवत आहे.
का?"
कारण कोणीही त्याची नासधूस करू नये म्हणून!
तर मंडळी मागील सर्व महाभारत घडल्यावर शेरिफने त्याच्या मंदबुद्धिनुसार एक जागतिक निर्णय घेतला होता.
मार्को आणि मी एकाच घरात राहण्याचा!
म्हणजे माझ्याच घरात राहण्याचा!
आणि गेले सहा महीने मी त्याच्याबरोबर राहत होतो.
तसाही हा माणूस कंटाळवाना होताच.हा दिवसभर त्याच्या खोलीत झोपून राहत असे. दरवाजा नेहमीच बंद.कधीकधी काही विचित्र लोक त्याच्याशी रात्री चर्चा करायला येत तेव्हाही याचे दार बंदच असे!
एव्हाना मलाही याची सवय झाली होती.
आणि मला विचार करायला एक अजून निमित्त मिळालं होतं!
ऍना!

हुग्गी-उत्सव

Submitted by चैतन्य दीक्षित on 12 July, 2016 - 06:03

आजकाल माघात थंडी असतेच असे नाही, पण लहानपणी मात्र चांगलीच थंडी असायची. गणेशजयंती किंवा दासनवमीच्या निमित्तानं छान उत्साह असायचा वातावरणात. अर्थात आम्ही लहान असल्यानं त्या उत्सवाशी आमचं नातं 'देवाला नमस्कार कर आणि प्रसाद घ्यायला जा' इथपर्यंतच असायचा. (आता तसे लग्नात होते:-p)

लॉर्ड टेनिसन आणि जी.ए.कुलकर्णी यांची "शलॉट".....

Submitted by अशोक. on 10 July, 2016 - 13:05

~ परवा ८ जुलै रोजी पर्सी शेलीची जयंती होती. त्या निमित्ताने त्याच्या "Ode to the West Wind" चे वाचन करत असताना पहिल्या ओळीतील "O Wild West Wind, thou breath of Autumn's being...." पासून त्याने केलेले अतिशय सुंदर असे निसर्ग वर्णन भावत असतानाच मला आठवत गेली लॉर्ड टेनिसनची जगप्रसिद्ध कविता "The Lady of Shalott". हळवी आणि करूण रसाचा वापर केलेली ही एका तरुणीची शोकांतिका. ह्या दीर्घ कवितेत टेनिसनने एका युवतीची कहाणी प्रकट करून सांगितली आहे. इंग्रजी साहित्यातील "Ode" या गीत प्रकारातील ही चार भागाची कविता.

विषय: 
शब्दखुणा: 

ऋतू

Submitted by फूल on 10 July, 2016 - 04:37

"नाही खर्चीली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम….” ही आणि अशीच अजून २-४ गाणी तो ट्रेनमध्ये गाउन दाखवत असे पण तो भिकारी नव्हता. केस विंचरायच्या फण्या पुरूषांच्या डब्यात विकत असे तो. गाणं ही त्याच्या आयुष्यातली एकच जमेची बाजू. बाकी विधात्यानं त्याच्या कुटुंबासहित सगळं सगळं लुटून नेलं. कमावलं नाही तर खायचं नाही. सोप्पच गणित! पण गंधर्वाघरचं लेणं मात्र होतंच त्याच्या गळी.

विषय: 
शब्दखुणा: 

आपण उरलोच

Submitted by चितस्थधि on 8 July, 2016 - 12:40

जाणीव-नेणिवेच्या जंगलात
आणि मूर्त अमूर्ताच्या लपंडावात
घुसळणीतून फक्त कविता उतरते
मग आम्ही स्थिर होतो
पुन्हा दगड होतो नि संपतो
तरीही
उरलोच.....

धडपड फक्त कागदावर उरते
काहीतरी उकिरडयावर फेकून दिल्यासारखी
नागराज म्हणतो तसं
मनातला कोलाहल उपसण्यासाठी वा
नेमाडेंच्या देखणीच्या अपूर्णत्वासाठी
तरीही
पूर्णत्वासाठी उरलोच ....

दोन-चार शब्द गोळा केलं कि
कर्तृत्व संपतं
आतली घाण भ्रूण हत्येसारखी फेकून
नामानिराळं होणं
एवढंच ते शौर्य
हि लढाई जिंकलो
कि उरलोच.......

Pages

Subscribe to RSS - लेखन