धना भाग १

Submitted by प्रविण राऊत on 13 July, 2016 - 03:26

लेखन,संकपना,शदांकन
पै.गणेश मान

गडे
यांच्या परवानगीने

“धना”

एक गाव होत.महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात असणार्या गावांपैकी एक गाव म्हणा हवेतर.त्या गावात इतर गावाप्रमाणे गावकीसुध्दा होतीच.

गावात एक हनुमानाचे मंदिर होते,फार जुने.कोण म्हणत होते कि ते पांडव वनवासात असताना बांधले होते ,कोण म्हणत होते सातकर्णी राजवटीत बांधले गेले..!!

कोणी बांधले कोणास ठाऊक.मात्र बांधले असे होते काय विचारता.
दगड असले तासले होते कि एकवेळ उर्वशीच्या गालावर फिरवलेला हात सुध्दा थबकावा क्षणभर.
मजबूत,बेलाग,दणकट..उपमा नाही..!

त्याच्या मागे एक सायसंगीण तालीम होती.तीही तशीच जुनी तालीम.तालमीत आजही शड्डू घुमत होते.मोठे मोठे पैलवान रोज सरावासाठी तिथे येत होते.

त्यापैकीच एक होता ”धनाजी”

धनाजी तसा गरीब परिस्थितीतला.आई शेळ्याचे दुध विकून त्याला खुराक पुरवत होती.धनाने नारळापासून कुस्तीची सुरवात केली होती,आज त्याची जोड तशी बरीच मोठी होती.महाराष्ट्रातील बर्याच चांगल्या मल्लांना त्याने असमान दाखवून गावाचे नाव चमकावले होते.

धना चे वस्ताद फार कुस्तीवेडा माणूस.धनाला लहानपणीच त्यांनी पारखले होते.म्हणून आता त्याला काय हवे नको ते त्यांच्याही गरीब परिस्थितीतून पुरवत होते.
वस्ताद देव माणूस.वस्ताद कसा असावा याचे उदाहर होते ते..त्यांचे नाव विठ्ठलकाका…!

पण ,सध्या परिस्थिती वेगळी होती.१ महिन्यावर शेजारच्या गावाचे मोठे मैदान आले होते.पंजाब मधील एका मोठ्या पैलवानाबरोबर त्याची कुस्ती ठरली होती.

पण धनाला आता कुस्ती नको होती.

बाकीच्या पैलवानासारखे गावभर हिंडावे,मुलींशी बोलावे असे त्याला नेहमी वाटत असे.पण आई आणि वस्ताद काका यांच्या दडपणामुळे धना तालीम सोडत नसे.मन मारून व्यायाम आणि कुस्ती सुरु होती.

मागच्या महिन्यात तालुक्याला धना ने मोठे मैदान मारले होते.कोल्हापूरच्या पैलवानाला ढाक लावून अस्मान दाखवले होते.त्यावेळी फेटा बांधून,बैलगाड्या जुंपून,पुढे हलगी आणि घुमक्याच्या तालावर त्याची गावातून प्रचंड मिरवणूक काढण्यात आली होती.

गावाच्या पाटलांच्या वाड्यात मिरवणूक थांबली होती.पाटलांची मुलगी हि नुसतीच तारुण्यात आली होती.धना नदीवर अंघोळीला जाताना ती नेहमी पहात असायची.त्याची ती चालण्याची अदा, भरदार छाती हे सर्व ती वाड्याच्या गच्चीवरून रोज पाहत असे..!

पण धना च्या नजरेने कधी जमीन सोडली नव्हती…हे असे बरेच दिवस चालत होते.

न काळात ती त्याच्याकडे ओढली गेली होती..हा वयाचा दोष म्हणा किंवा इतर काही..प्रेम जडले होते.

त्या दिवशी मिरवणुकीत धना पाटलांच्या वाड्यात पाटलांना विजयाचा सांगावा आणि आशीर्वाद घ्यायला थांबला.बोलणी चालणी झाली..धना जायला निघाला.तितक्यात गच्चीवरून पाटलांच्या मुलीने त्याच्यावर गुलाल टाकला..धना एकदम दचकला.त्याने वर पहिले तर पाटलांची ती मुलगी.

एक क्षण नजरानजर झाली.
ती हासली..पण धना ..विचारू नका.!!

प्रथमच असला प्रकार, नाहीतर वस्ताद काकांना विचारल्याशिवाय धनाला तालमीचा उंबरा ओलांडता येत नव्हता.

गेले महिनाभर धनाला तो दिवस आठवत होता.त्यानंतर रोज नदीवर जाताना तिचे दर्शन घडू लागले.ते पाहून हासणे,लाजने,परत हासणे असले प्रकार घडू लागले.

अहो जवानीची मस्ती आणि म्हातारपणाचा खोकला दाबून कधी दाबेल का..??

धना तिच्या आणि ती धनाच्या प्रेमात पडली.

लहान मुलांकडून सांगावे जावू लागले.

आज शेजारच्या गावात कुस्ती ठरली खरी..पण धनाला कुस्ती नको वाटू लागली होती.

आज तो तिला भेटायला रात्री जाणार होता..तसा निरोप होता.

पण जायचे कसे ??

वस्ताद काका घर सोडून फक्त त्याच्यासाठी तालमीत झोपायला येत होते.पाहते ते स्वत उठवून त्याचा व्यायाम घेत होते.मग ?? कसे ??जाणार

सायंकाळ झाली ..लढती संपल्या.अंघोळी झाल्या.वस्ताद जायला निघाले.

आणि म्हणाले पोरानो आज मी झोपायला नाही येणार..शेजारच्या गावात जेवायचे आमंत्रण आहे ,तुम्ही लवकर झोप..सकाळी लवकर उठवायला येतो ..!!

धनाच्या मनात आनंदाची लकेर उठली.

रात्र झाली.

तालमीच्या मागच्या दाराने धना गुपचूप बाहेर पडला.

रानातील आडवाटेने त्याने सरळ पाटलांचा वाडा गाठला..!!

मनात भीती होतीच.पाटलाला कळले तर ??

कारण धनाच्या खुराकाचा सर्व खर्च पाटील स्वत: करत होते.धनाची आई पाटलांच्या रानात काम करत असे..सर्व डोक्यात होते धनाच्या..पण ओढ सुध्दा तितकीच होती.

वाडा जवळ आला.गच्चीवर कोणीतरी असल्याची चाहूल लागली.धनाने ओळखले…

धना धावत वाड्यामागे गेला.

दगडी वाड्याच्या ,दगडाला संधी-सपाटीत बोटे घालून धरून तो वर चढू लागला.बघत बघत तो वर पोचला.!!

ती दिसली…प्रथमभेट ..कल्पना करा मंडळी.बाकी काही लिहित नाही..!!

त्या रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात..ते दोघे भेटले होते…..!!!

पहाट झाली होती.धनाला रोजच्या प्रमाणे जाग आली होती.तो दचकून उठला .जायला निघाला..

परत भेटायची वचने झाली आणि धनाने तालमीची वाट धरली.

धनला खाली उतरताना पाटलाच्या गड्याने पहिले…!

तो दिवस धनला तिच्याशिवाय दुसरे काही सुचत नव्हत.

ना व्यायामाकडे लक्ष,ना खुराकाकडे लक्ष…!!

असेच २-३ दिवस गेले…ती भेटण्याची ओढ परत निर्माण झाली..!!

पुन्हा रात्री तोच प्रकार..असे आता रोज घडू लागले..!!

कधी वस्ताद नसताना..तर कधी असतानासुद्धा घडू लागले.

आजारी असल्याचे कारण सांगून धना सर्व पचवू लागला.!!

आणि कुस्ती तोंडावर आली….!!

कसेबसे मन सावरले..सराव सुरु झाला ,खुराक सुरु झाल्या…३-३ तास सरावने धना लवकर झोपू लागला…..!!

पण मन मात्र तिच्याभोवती फिरत होते…!!

कुस्तीचा दिवस उजाडला.

तिने सांगितले होते,कुस्तीला जायच्या आधी मला भेटून जायचे..म्हणून धना भल्या पहाटे उठून तिला भेटायला निघाला….

वास्तादना शंका आलेली आधीच…आज त्यांनी त्याचा पाठलाग केला व सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला पन ते काहीच बोलले नाहीत…!!

सर्व कुस्त्याच्या ठिकाणी आले.

कुस्त्या सुरु झाल्या.

धना शरीराने मजबूत असला तरी त्याचे मन वेगळीकडेच होते….

याचा परिणाम म्हणून धनाला प्रतिस्पर्धी पैलवानाने खाली धरून इराणी एकलंगी इतकी जोरात घातली कि धनाचा पाय गुडघ्यातून निसटला ..!!

आर्त किंकाळीने मैदान हादरले….पराभव सपशेल पराभव.

आणि कायमचा अधूपणा……

जखमी धनाला इस्पितळात आणले …

वास्तादानी विचारले धना खेळू शकेल का पुन्हा…?

डॉक्टर म्हणाले होय..पण २ महिने विश्रांती घ्यावी लागेल…!!

गावाचे नाव गेले,पैलवानाची अब्रू गेली ,वस्तादांची इज्जत गेली आणि हे अधूपण आले..याचे कारण धना आणि वास्तदना माहित होते.

इर्षेने त्याच पैलवानाला पुढच्या मैदानात धरून पाडायचे असा विचार गाव करत होता…..

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users