लेखन

मोहनची हुशारी

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 07:01

मोहनची हुशारी
एकदा एका जंगलात मोहन व त्याची दोस्त मंडळी शिकारीला गेले. संध्याकाळ झाली होती . थोड्याच वेळात अंधार पडणार होता . मोहन व त्याची मित्र मंडळी बाजूच्याच गावात राहत होते . दिवसभर लहान सहान उद्योग करण्यात त्यांचा वेळ जात असे . पण शेतात काम करून पैसे कमावणे त्यांना कमीपणाचे वाटे .

विषय: 

वाघाची बोबडीच वळली

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 06:57

वाघाची बोबडीच वळली
एका गावात मोहन नावाचा एक मुलगा राहायचा . मोहनला लहानपणा पासून एक खोड होती . तो खूप बढाया मारायचा . सर्व मित्र त्याला फेकू म्हणायचे . म्हणजे थापाड्या . मोहनला त्याचे काही वाटायचे नाही . त्याला मजा वाटायची . खर तर ते वयच अस होत ना कि मुल खूप स्वप्न नगरीत विहार करीत असतात . त्यात मोहन तर फक्त सात वर्षांचाच होता .

विषय: 

देव आणि शैतान

Submitted by Suyog Shilwant on 20 June, 2016 - 04:02

एकदा दोन मुलं शेजारच्या बागेतुन एक गोणीभर संत्री चोरतात.

त्याचे वाटप करायला एखाद्या निर्जन स्थानाच्या शोधात दोघे एका कब्रस्ताना जवळ येतात.

गेट वर चढून ओलांडून जाण्याच्या गडबडित गोणितून दोन संत्री खाली पडतात, पण त्या कड़े दुर्लक्ष करून दोघे आत जातात.

दरम्यान तिथून एक बेवड़ा टुन होऊन जात असतो, त्याच्या कानावर शब्द पडतात ... "एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा ..."

तो धावत चर्च मध्ये जातो व धापा टाकत टाकत फादऱला सांगतो, "फादर, लवकर चला कब्रिस्तानात, ईश्वर आणि शैतान शवांचे वाटप करीत आहेत ..."

शब्दखुणा: 

सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ४

Submitted by Suyog Shilwant on 16 June, 2016 - 18:33

सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा.
सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग- 2
सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग- 3

ह्या मागील तिन्ही भागात आपल्याला सुयुध्द त्रिनेत्री व त्याच्या भुतकाळाची माहिती कळाली. हे तिन्ही भाग मिळुन कथेचा पहिला चॅप्टर 'शोध' पुर्ण झाला आहे. मागील भाग- 3 मध्ये आजोबांनी सुयुध्दला त्यांच्या घराण्याचा खरा इतिहास सांगितला पण सर्वकाही सांगायच्या आत. त्यांच्या घरात दैत्य घुसले. काया ती पहिली व्यक्ती होती जी त्यांना दाराच्या फटीतून पाहते व प्रचंड घाबरते. तिला घाबरलेले पाहुन चिरंतर तिला विचारतो.

शब्दखुणा: 

बोट - शिक्षण

Submitted by स्वीट टॉकर on 16 June, 2016 - 05:49

'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला।' वगैरे बालगीतात ठीक आहे. पण ‘अशा बंगल्यात रहाणार्‍यांना चॉकलेटच्या वासानी मळमळायला लागेल का?’ असे रसभंग करणारे प्रश्न विचारायची जरूरच नाही कारण असा बंगला असणंच शक्य नाही.

शब्दखुणा: 

पाचोळा -३ अन्तिम

Submitted by स्टीव रॉजर्स on 16 June, 2016 - 05:35

आतुन कसली तरी अगम्य गुणगुण ऎकु येत होती.त्या विक्रुत आवाजाने डोके जड व्हायला लागले.कसातरी आधार घेत मी खोलीत डोकावलो, आणि ह्रदय एक क्षणासाठी थांबलेच.खोलीत मिणमिणता प्रकाश पसरलेला होता, अख्खी खोली पानांनी भरलेली होती.त्याच प्रकाशात एक बाई दोन पाळण्यात फावड्याने ती पाने भरत होती.मध्येच ते पाळणे पुढे मागे करत होती

विषय: 

पाचोळा -२

Submitted by स्टीव रॉजर्स on 16 June, 2016 - 01:22

क्षणार्धात पायाखालची जमीन सरकली.एक बाई आणि दोन लहान मुली माझ्याकडे पाठ करुन बसलेल्या होत्या.हातातला पाण्याचा तांब्या दणक्कन खाली पडला आणि माझं लक्ष विचलित झाले त्या निमिषार्धात खोली पूर्ण रिकामी होती.तिथे आता कोणीच नव्हतं. मला भास झालेला का? मी लाइट तसाच चालू ठेउन बाहेर उभा राहिलो.खोलित परत जायची हिंमत होत नव्हती.पण पाच दहा मिनिटांनी मनानेच समजून घातली झोपेत कदाचित भास झाला असावा.एक सेंकदभर फार तर दिसले आपल्याला नक्कीच मी झोपेत असणार.मी परत खोलीत आलो.आता तिथे काहीही नव्हते, तसाच बल्ब चालु ठेवला,आणि पडून राहिलो अजूनही धडधडत होतें जाणो परत काही घडलं तर पण नंतर काहीच झाले नाही.

विषय: 

असच आपलं सटर फटर.... भाग बारा

Submitted by ह.बा. on 15 June, 2016 - 07:37

मायबोलीवर न येणारे सगळे निर्बूध्द आहेत असे म्हणुया का? घ्या ना सर क्यालेंडर घ्या.... आपल्यापेक्षा चांगली गाडी घेणार्‍या मित्राची गाडी जाळून टाकूया का? हे आमचं नाही तुमचंच काम आहे ते आम्ही करतोय... सकाळी सहाला न उठणार्‍यांना एकाच वेळी झोपेच्या पन्नास गोळ्या देऊया का? साबण, गोमूत्र हवय का?... माझ्या लेखावर चांगली प्रतिक्रीया न देणारे म्हणजे मराठी अस्मितेचे मारेकरी आहेत असेच म्हणायला हवे ना? समाज आपल्या मुळांपासून दूर कसा काय जाऊ शक्तो... पोस्टर घ्या ना... पुर्वेला लावा... मी माझा विचार आणि हा समाज यांच्यात साखळ्दंडांनी एक न तुटणारं नातं बनवायचय मला....

विषय: 

मार्को - भाग २

Submitted by अज्ञातवासी on 15 June, 2016 - 03:37

मी माझ्या घरात बसलो होतो. ती व्यक्ति माझ्यासमोर होती....
साधारण तीस वय. भारदस्त बांधा. सहा फूट उंच. लांब नाक. तरतरित डोळे.
मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे हात आणि पाय चांगलेच लांब असून त्याचे तळवे अत्यंत पसरट होते.
कोपऱ्यात असलेले खास बनवलेले बूट त्याची साक्ष देत होते.
तर पुतळा प्रकरणानंतर झालेल्या गोष्टी म्हणजे मी माझ्या घरात बसलो होतो आणि माझा पुतळा घराबाहेर दिमाखात उभा होता.
"तर आपल्याला आपले घर परत हवे आहे."
"हो."
"आणि त्यासाठी आपण मी मोजलेली किंमत परत करायला तयार आहात."
"हो."
"तर हे घर मी विकत घेतले आहे हे आपणांस मान्य आहे."
"हो."

आरती

Submitted by वैवकु रीटर्न्स on 14 June, 2016 - 02:44

स्वप्न पडलेच तर बघूया की
दु:ख झालेच तर रडूया की

रात्र सगळीकडेच आहे जर
आज इकडेच घालवूया की

फोन करण्यामधे मजा नाही
छान चिठ्ठीच पाठवूया की

जोक ऐकून तर बघू आधी
आणि सुचलेच तर हसूया की

भरकटत जायची मुभा आहे
वाट वळलीच तर वळूया की

जन्म ओवाळलाच आहे तर
जन्म का? आरती म्हणूया की !

~वैवकु

Pages

Subscribe to RSS - लेखन