आपण उरलोच

Submitted by चितस्थधि on 8 July, 2016 - 12:40

जाणीव-नेणिवेच्या जंगलात
आणि मूर्त अमूर्ताच्या लपंडावात
घुसळणीतून फक्त कविता उतरते
मग आम्ही स्थिर होतो
पुन्हा दगड होतो नि संपतो
तरीही
उरलोच.....

धडपड फक्त कागदावर उरते
काहीतरी उकिरडयावर फेकून दिल्यासारखी
नागराज म्हणतो तसं
मनातला कोलाहल उपसण्यासाठी वा
नेमाडेंच्या देखणीच्या अपूर्णत्वासाठी
तरीही
पूर्णत्वासाठी उरलोच ....

दोन-चार शब्द गोळा केलं कि
कर्तृत्व संपतं
आतली घाण भ्रूण हत्येसारखी फेकून
नामानिराळं होणं
एवढंच ते शौर्य
हि लढाई जिंकलो
कि उरलोच.......

पोटपाण्याऐवजी असले भिकार उद्योग सुचणं
आणि कागद वाया घालवणं
एवढंच आलं कि

आपण उरलोच ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users