मार्को - भाग ३

Submitted by अज्ञातवासी on 12 July, 2016 - 08:52

"काय वेडेपणा चाललाय?"
"पुतळ्याला जाळी बसवत आहे.
का?"
कारण कोणीही त्याची नासधूस करू नये म्हणून!
तर मंडळी मागील सर्व महाभारत घडल्यावर शेरिफने त्याच्या मंदबुद्धिनुसार एक जागतिक निर्णय घेतला होता.
मार्को आणि मी एकाच घरात राहण्याचा!
म्हणजे माझ्याच घरात राहण्याचा!
आणि गेले सहा महीने मी त्याच्याबरोबर राहत होतो.
तसाही हा माणूस कंटाळवाना होताच.हा दिवसभर त्याच्या खोलीत झोपून राहत असे. दरवाजा नेहमीच बंद.कधीकधी काही विचित्र लोक त्याच्याशी रात्री चर्चा करायला येत तेव्हाही याचे दार बंदच असे!
एव्हाना मलाही याची सवय झाली होती.
आणि मला विचार करायला एक अजून निमित्त मिळालं होतं!
ऍना!
पंचविशीत असेल!
सुंदर आणि तरतरीत!
अविवाहित होती आणि मीसुद्धा......
तिच्याशी माझी ओळख व्हायला देखील मार्कोच कारणीभूत होता.
त्या सकाळी मला मार्कोच्या आवाजाने जाग आली. मार्को तिच्यावर जोरजोराने ओरडत होता.
"तू कोणत्या प्रकारची बाई आहेस ते मला माहित आहे! आता मी तुझा किस्साच संपवतो!"
आणि तो तिच्याकडे बंदूक घेऊन धावला. मात्र मी त्याला पकडले.
ती तिथून घाबरून पळून गेली.
"सोड मला" तो जोरजोरात किंचाळत होता.
"एका स्त्रीच रक्षण करणं माझं परम कर्तव्य आहे".
आणि थोड्याच वेळाने मी बेशुद्ध पडलो.
मार्कोचा एक ठोसा बसून!
दुसऱ्या दिवशी मला माझ्या रूममध्ये जाग आली तर त्याचा रूम नेहमीप्रमाणे बंद होता.
आज मला चिकन खावंसं वाटत होतं त्यामुळे मी मांसबाजारात गेलो. मस्त अर्धा किलो चिकन आणि सोबत माझी आवडती वाईन!
त्याचवेळी मला ती दिसली.
मला पाहून ती झपाझप पाऊले टाकायला लागली.
पण माझ्या चपळपणापुढं तिचा काय टिकाव लागणार?
तिला मी गाठलेच.
ती जरा शरमेनेच म्हणाली, "धन्यवाद"
अहाहा काय सुंदर दिसत होती ती!
"ते तर माझं कर्तव्य होतं"
"तुम्ही खरंच ग्रेट आहात"
"पण मार्कोला तुमच्याविषयी काय अडचण होती"
ती थोड्यावेळ गप्प बसली आणि म्हणाली.
"तो माझा रुग्ण आहे!!"
"रुग्ण? कशाचा?"
"तो मानसिक रुग्ण आहे!!!"
त्या दिवसापासून मार्कोकडे बघण्याची माझी नजर पूर्णपणे बदलली!
आता तो माझ्या पुतळ्याकडे का वेड्यासारखा बघून हसत असे हेसुद्धा मला उमजले.
आणि ऍना!
तिची तिच्या रुग्णाविषयी काळजी बघून मी तिला सलामच ठोकला.
ती माझ्याकडून मार्कोची सर्व माहिती घेत असे. तिने मला त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देण्यास सांगितलं होतं.
खरंच अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही!
आता मी त्याच्या खोलीवर पाळत ठेवून होतो.
आणि ऍना दररोज सकाळी उठून मला भेटत असे.
खरंतर ती माझ्याकडे आकर्षित होत आहे असे मला वाटत होते!
एके दिवशी मी त्याच्या खोलीत डोकावत असताना त्याने मला जोरात पितळी फ्लॉवरपॉट मारून फेकला!!
मात्र मी माझ्या निश्चयापासून अजिबात विचलित झालो नाही.
आणि ऍनाच आणि माझं प्रेमप्रकरण फुलत होतं!
ंमार्कोमुळे!!!!!!!

मार्को। भाग १
http://www.maayboli.com/node/59015

भाग २
http://www.maayboli.com/node/59034

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय महाभारत घडले ते कळले नाही, दुसरा भाग शेरीफने अटकेची पूर्वसूचना देणाऱ्या संवादाने संपला. Any वे, काही बिघडत नाही, गोष्ट पुढे जाऊ द्या.

धन्यवाद मंडळी
मागील काही काळात पासवर्ड मिळत नसल्याने मायबोलीवर येऊ शकलो नाही
पण आरंभम पूर्ण केल्यावर ही कथा पूर्ण करणारच आहे
धन्यवाद