कैलास - पर्वत आणि लेणी

Submitted by अविनाश जोशी on 14 March, 2026 - 03:59

कैलास - पर्वत आणि लेणी
कैलास पर्वत हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र स्थान आहे. वेदकालीन ग्रंथ सर्व भारतभर पसरण्याअगोदरपासून हे शिव -पार्वतीचे निवासस्थान मानले जाते. बऱ्याच दृष्टीने हा पर्वत आणि त्याच्या जवळ असलेले मानसरोवर हे अद्वितीय भौगोलिक रचना आहे. या पर्वताची उंची सुमारे ६६३८ मीटर आहे. सामान्य समजुतीप्रमाणे कैलास पर्वत हा हिमालयाचा भाग नाही. हिमालय पर्वत श्रेणी आणि कैलास पर्वत याच्यामध्ये तिबेटचे पठार आहे आणि दोघात अंदाजे 300 ते 400 किलोमीटर अंतर आहे. कैलास पर्वताकडे जायला अनेक मार्ग आहेत. पारंपरिक मार्ग म्हणजे भूतान मधून तिबेट ओलांडून जाणारा मार्ग. या मार्गावरून चालतच जावे लागते. नेपाळ मधून जाणाऱ्या एका मार्गावरून जीप सारखे वाहन जाऊ शकते. राजकीयदृष्टया हा भाग चीन मध्ये येतो. जवळच आसलेले मानसरोवर हे गोड्या पाण्याचे एक अत्यंत भव्य सरोवर आहे. याचा परीघ सुमारे 88 किलोमीटर असून क्षेत्रफळ 412 चौरस किलोमीटर आहे. मानसरोवरच्या जवळच राक्षसताल सरोवर खाऱ्यापाण्याचे दुसरे मोठे सरोवर आहे. याचा परीघ सुमारे 77 किलो मीटर असून क्षेत्रफळ 250 चौरस किलोमीटर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोड पाणी , खारेपाणी असलेले हे एकमेव स्थान आहे आणि हा एवढा मोठा पाण्याचा साठा समुद्र सपाटीपासून 4575 मीटर (1597 फूट) उंचीवर आहे.
कैलास पर्वताच्या चार बाजूकडून सिंधू , सतलज , ब्रह्मपुत्रा आणि कर्नाली या नद्या उगम पावतात.
सिंधू नदीचा प्रवास: तिबेट → लडाख → पाकिस्तान → अरबी समुद्र,
ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवास: तिबेट → अरुणाचल → आसाम → बांगलादेश,
सतलज नदीचा प्रवास: तिबेट → हिमाचल → पंजाब → पाकिस्तान
कर्नाली नदीचा प्रवास: तिबेट → नेपाळ → गंगा नदीमध्ये मिळते
हा पर्वत हिंदू, बौद्ध, जैन आणि बोन धर्मासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. हिंदू धर्माप्रमाणे हे शिव पार्वतीचे म्हणजेच शिवाचे आणि शक्तीचे अखंडित निवासस्थान आहे. एका कथेप्रमाणे शंकर पार्वतीला अतिशय गुह्य ज्ञान शिकवत असतांना आजूबाजूला बरेच श्रोते जमा झाले. त्यांना कळू नये म्हणून शिवाने सर्व बाजूला ढग आणि धुके निर्माण केले. तोच हा कैलास पर्वत. इतर शिव स्थानांप्रमाणे इथे कैलास पर्वतावर किंवा पायथ्याशी कुठलेही शिव मंदिर नाही तर पर्वताच्या आतच शिव शक्तीचे वसतिस्थान आहे असे मानले जाते. काही संशोधकांच्या मते हा पर्वत म्हणजे परा शक्तीने बांधलेल्या पिरॅमीडचा आकार आहे. त्यामुळे त्याच्या वरील चारही बाजू अतिशय गुळगुळीत असतात. आणि त्याचे शिखरपण कृत्रिम असावे असे टोकदार आहे. आणि तो इतर बर्फाच्या पर्वतांपेक्षा वेगळाच वाटतो. मानसरोवरात ब्रम्ह मुहूर्तावर अंघोळ करायला असंख्य यक्ष किन्नर येतात अशी समजूत आहे. मान सरोवरात अंघोळ करून कैलास पर्वताला प्रदक्षिणा घालणे हे मोठे कार्य समजले जाते. कैलास पर्वताची परिक्रमा सुमारे बावन्न किलोमीटर अंतराची असून त्याला तीन चार दिवस जातात.
बौद्ध धर्म – हा पर्वत बुद्धांच्या तांत्रिक देवतेशी संबंधित मानला जातो.
बौद्ध धर्मामध्ये अनेक तांत्रिक देवता आहेत, विशेषतः वज्रयान बौद्ध धर्मात (जो तिबेट, भूतान आणि इतर हिमालयीन प्रदेशात प्रचलित आहे). या देवतांना इष्टदेवता (यिदम) किंवा ध्यानदेवता असेही म्हटले जाते. या देवता बाहेरून पूजनीय असल्या तरी, त्या साधकाच्या बुद्धत्वाच्या गुणांचे आणि प्रबोधनाच्या मार्गाचे प्रतीक मानल्या जातात.
प्रमुख तांत्रिक देवतांपैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
• चक्रसंवर (Chakrasamvara): ही एक अत्यंत महत्त्वाची आणि जटिल इष्टदेवता आहे. त्यांना सहसा नीळ्या रंगात, अनेक हात आणि चेहऱ्यांसह, वज्रवराहीसोबत (त्यांची शक्ती) आलिंगनबद्ध स्थितीत दर्शवले जाते. हे सर्वव्यापी आनंद आणि शून्यता यांचे प्रतीक आहेत.
• वज्रवराही (Vajravarahi): ही चक्रसंवर यांच्या शक्ती आहेत आणि त्या स्वतः एक स्वतंत्र आणि अत्यंत शक्तिशाली तांत्रिक देवी आहेत. त्या ज्ञानाचे आणि सर्व मोहांना भेदून जाण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहेत.
• हेरुका (Heruka): हे तांत्रिक परंपरेतील अनेक क्रोधी देवतांसाठी वापरले जाणारे एक सामान्य नाव आहे. हेरुका म्हणजे "रक्ताचा धारक" आणि ते अज्ञान आणि नकारात्मक भावनांवर विजय मिळवणाऱ्या क्रोधी बुद्धांचे रूप आहेत. चक्रसंवर हे हेरुकाचेच एक रूप आहेत.
• कालचक्र (Kalachakra): "वेळेचे चक्र" म्हणून ओळखले जाणारे, कालचक्र हे एक जटिल तांत्रिक बुद्ध आहेत. ते वेळेची आणि विश्वाची समग्र समज आणि आध्यात्मिक मार्गावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहेत.
• यमांतक (Yamantaka): हे यमाचे (मृत्यूचा देव) नियंत्रक आहेत. ते मंजुश्री (ज्ञानाचा बोधिसत्व) यांचे क्रोधी रूप मानले जातात. अज्ञानाचा नाश करण्यासाठी आणि मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी त्यांची उपासना केली जाते.
• वज्रभैरव (Vajrabhairava): यमांतकाचेच दुसरे नाव, विशेषतः गेलुग परंपरेत.
• गुह्यसमाज (Guhyasamaja): ही देखील एक महत्त्वाची तांत्रिक इष्टदेवता आहे, जी मायावी शरीर आणि स्पष्ट प्रकाशाचे प्रतीक आहे.
या देवता केवळ मूर्ती किंवा चित्रे नाहीत, तर त्या साधकाला आत्म-परिवर्तनासाठी आणि बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी ध्यान आणि कल्पना करण्याची साधने आहेत. त्यांच्या विविध रूपांमधून प्रबोधनाच्या विविध पैलूंचे दर्शन होते.

जैन धर्म – पहिला तीर्थंकर Rishabhanatha यांनी येथे मोक्ष प्राप्त केला असे मानले जाते.

बोन धर्म – हा पर्वत त्यांच्या दृष्टीने विश्वाचा आध्यात्मिक अक्ष मानला जातो. बोन धर्म (Bön) हा तिबेटमधील सर्वात प्राचीन धर्म मानला जातो. बौद्ध धर्म तिबेटमध्ये येण्यापूर्वी अनेक शतकांपासून हा धर्म अस्तित्वात होता. सर्व धर्मातच शिव हे शक्तीचे केंद्रस्थान मानले गेले आहे.
बुद्धीचा वापर कारण्यामध्येसुद्धा दहा - बारा टक्के वापर करणारे आपल्यासारखे सामान्य किंवा स्थूल बुद्धी असणारे लोक, आईनस्टाइन सारखे पंचवीस तीस टक्के बुद्धी वापरू शकणारे सूक्ष्म बुद्धीचे लोक. 80-90 % बुद्धी वापरणारे शून्य बुद्धीचे लोकं आणि 100% बुद्धी वापरणारे ते शिव. हे लोक देहातीती कालातीत असतात आणि संपूर्ण विश्वावरच त्यांची सत्ता चालते. शिवाच्या आनंद तांडवामध्येच सर्व विश्व चालू आहे.
अतिशय प्रचंड शक्ती स्रोत कैलास पर्वतात सामावलेले आहे. काही तास तिथे राहणाऱ्या लोकांना कालगती जास्त वेगाने चालत आहे असे वाटते. त्यात केस आणि नखे वाढणे, केस पांढरे होणे , अंगावर सुरकुत्या पडणे असे अनुभव येतात. दुसरे म्हणजे कैलास पर्वताच्या शिखरावर अजून कोणीही जाऊ शकला नाही. तसे पाहता हा पर्वत माऊंट एव्हरेस्टहून कितीतरी लहान आहे. परंतु निम्मे अंतर तर चढूनही अजून कोणी जाऊ शकले नाही. याचा अर्थ प्रयत्नच झाला नाही असे नाही. एव्हरेस्टवर आजपर्यंत हजारो लोक जाऊन आले परंतु कैलास पर्वतावर कोणीच नाही.
कैलास पर्वतावर चढाई करण्यास अधिकृतपणे बंदी असल्यामुळे, कोणीही त्यावर यशस्वीपणे चढाई केल्याची नोंद नाही. मात्र, काही लोकांनी पूर्वी चढाईचे प्रयत्न केले होते किंवा त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे अनुभव आणि त्या संदर्भातील माहिती खालीलप्रमाणे आहे:
पौराणिक संदर्भ: बौद्ध दंतकथांनुसार, वज्रयान बौद्ध धर्माचे चॅम्पियन मिलारेपा यांनी बोन धर्माचे चॅम्पियन नारो बोन-चुंग यांना पर्वतावर चढण्याचे आव्हान दिले होते. मिलारेपा यांनी सूर्यप्रकाशाच्या किरणावर बसून पर्वतावर चढाई केली आणि कैलास पर्वत बौद्ध धर्मासाठी जिंकला. तेव्हापासून पर्वतावर कोणीही यशस्वीपणे चढाई केल्याची नोंद नाही. काही कथांमध्ये असेही म्हटले जाते की, मिलारेपांनी इतरांना पवित्र पर्वतावर चढू नका असे सांगितले, कारण ते सामान्य माणसासाठी अशक्य होते आणि मिलारेपा सामान्य माणूस नव्हते.
1926 मध्ये, प्रसिद्ध इंग्रज गिर्यारोहक ह्यू रटलेज यांनी पर्वताच्या उत्तरेकडील भागाचा अभ्यास केला आणि तो "पूर्णपणे चढण्यायोग्य नाही" असे घोषित केले. त्याच वेळी, कर्नल आर. सी. विल्सन यांनी दक्षिणेकडील भागात चढाईचा मार्ग ओळखल्याचा दावा केला, परंतु बर्फवृष्टीमुळे ते थांबले.
ऑस्ट्रेलियन लेखक आणि गिर्यारोहक हर्बर्ट टिची यांनी 1936 मध्ये स्थानिक लामांना कैलास पर्वतावर चढाई करणे शक्य आहे का, असे विचारले असता, लामांनी उत्तर दिले की "केवळ पापरहित माणूसच कैलासवर चढू शकतो. आणि त्याला तेथील बर्फाच्या भिंती चढण्याची गरज भासणार नाही – तो फक्त स्वतःला पक्ष्यात रूपांतरित करून शिखरावर उडून जाईल".
स्वामी प्रणवानंद (१९२८-१९४९): एक भारतीय स्वामी, त्यांनी अनेक मोहिमांदरम्यान कैलास पर्वत आणि मानसरोवर तलावाभोवती सखोल वैज्ञानिक संशोधन केले. त्यांनी चार प्रमुख नद्यांच्या उगमांचा शोध घेतला आणि पर्वताच्या अनेक प्रदक्षिणा (कोरास) पूर्ण केल्या, त्यांचे निष्कर्ष नोंदवले. त्यांचे कार्य गिर्यारोहणाऐवजी भौगोलिक आणि आध्यात्मिक पैलूंवर केंद्रित होते.
1980 च्या दशकात, रेइनहोल्ड मेस्नर (एव्हरेस्टवर एकट्याने आणि ऑक्सिजनशिवाय चढाई करणारे पहिले गिर्यारोहक) यांना चिनी सरकारने कैलास पर्वतावर चढाई करण्याची परवानगी दिली होती. परंतु त्यांनी ती संधी नाकारली. त्यांनी म्हटले की, "जर आपण या पर्वतावर विजय मिळवला, तर आपण लोकांच्या आत्म्यातील काहीतरी जिंकू.".
2001 च्या आसपास, एका स्पॅनिश टीमने कैलास पर्वतावर चढाई करण्याचा विचार करत असल्याची बातमी आली. यामुळे धार्मिक नेत्यांनी आणि जगभरातून तीव्र विरोध झाला. त्यानंतर चीन सरकारने औपचारिकपणे कैलास पर्वतावर चढाई करण्यास कायमस्वरूपी बंदी घातली.
काही लोक ज्यांनी अनधिकृतपणे प्रयत्न केले, त्यांनी तीव्र गोंधळ, ऊर्जेची कमतरता आणि एक जबरदस्त शक्ती जाणवल्याचे सांगितले आहे, जणू काही पर्वताने त्यांना आत येऊ दिले नाही. काही कथांमध्ये असेही म्हटले आहे की, कैलासजवळ वेळ वेगळ्या गतीने फिरते किंवा ज्यांनी चढाई करण्याचा प्रयत्न केला त्यांना वेगाने वृद्धत्व आले. तथापि, या केवळ कथा किंवा अफवा आहेत आणि त्यांना वैज्ञानिक आधार नाही.
थोडक्यात, कैलास पर्वतावर चढाई करणे हे केवळ शारीरिक आव्हान नाही, तर धार्मिक, कायदेशीर आणि नैतिक अडथळे आहेत, ज्यामुळे तो एक अनमोल आणि अस्पर्शित पवित्र शिखर राहिला आहे .
एका दंतकथेनुसार रावणाच्या आईला पूजेकरिता शिवलिंग हवे होते त्यावेळेस रावणाने कैलास पर्वतच उचलून नेण्याचा घाट घातला. अर्थात त्या प्रयत्नात रावण त्या पर्वताखाली अडकला.
कैलास पर्वताला साजेसारखेच भारतात कैलास लेणी या नावाने एक अतीप्राचीन शिव मंदिर आहे. या मंदिरात एक प्रसिद्ध शिल्प आहे की रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. शिवाने पायाने पर्वत दाबला आणि रावण अडकला. शेवटी रावणाने स्तुती केल्यावर शिव प्रसन्न झाले.

कैलास टेम्पल (वेरूळ कॉम्प्लेक्स, औरंगाबाद). वेरूळ किंवा एलोरा येथे अतिप्रचंड अशा ३४ गुहा आहेत. त्यातील १७ वैदिक धर्माच्या, १२ बुद्ध धर्माच्या आणि ५ जैन धर्माच्या मानल्या जातात. यातील कैलास लेणे हे वास्तुशास्त्र दृष्ट्या अत्यंत प्रगत देऊळ आहे. नुसता आकार पाहिला तरी ते लक्षात येते. त्या मंदिराची उंची सुमारे ३० मीटर आहे. लांबी सुमारे ८२ मीटर आणि रुंदी ४६ मीटर आहे.
एवढंच नव्हे तर या एलोरा कॉम्प्लेक्स खाली एक संपूर्ण शहराचा लेआऊट आहे. तेथे जाण्याकरीता असंख्य वाटा होत्या. पाणी पुरवठा आणि पाण्याचा निचऱ्याकरिताही सोय होती. हे सर्व भुयारी मार्ग शासनाने बंद केली आहेत. येथील कित्येक भुयारे १८ इंच व्यासाची असून ती शेकडो फूट पसरली आहेत. हे खोदकाम कसे केले असेल हे सांगणे अवघड आहे. या देवळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण देऊळ आणि खालचा बरासा भाग एकाच दगडातून कोरलेला आहे. दक्खन पठारावर सापडणाऱ्या अग्निजन्य खडकात (बेसॉल्ट रॉक) त्याच्याहुनही तांत्रिक दृष्ट्या हे देऊळ वरून खाली बांधले गेले आहे. यात अनेक प्रश्नाचा उलगडा होत नाही.
काही कोटी क्युबिक फूट असलेला एकसंध दगड , दगडाची परीक्षा कशी केली गेली ? या सगळ्या मोठया पसाऱ्यात दगडात एकही फ्रॅक्चर असते तरी देऊळ बांधणे शक्य नव्हते. देवळाच्या २८० फूट लांबीत एका पाठोपाठ एक अनेक दालने आहेत. त्यातील खांबावर आणि छतावर रामायण आणि महाभारतातील प्रसंग, विष्णूचे दशावतार, कृष्णलीला असे असंख्य प्रसंग कोरले आहेत. गर्भगृहात शंकराच्या पिंडीवर पाण्याची संततधार चालू असते ते पाणी एका छिद्रातून बाहेर जाते पण नंतर त्याचा कोठेही मागमूस लागत नाही. इतके नाजूक काम, इतके भव्य काम आणि 'आधी कळस मग पाया रे ' हे अतिप्रगत तंत्रज्ञानच करू शकते, देऊळ ३५००-४००० वर्षापूर्वीचे असावे असे मानले जाते. दुसरे म्हणजे इतर ३३ गुहांमधील आणि कैलास लेण्यातील काढलेला दगड कोठे गेले कळत नाही. यामध्ये मायन संस्कृतीतील काही देवळांचे साधर्म्य आढळते.
या देवळाचा संपूर्ण दगडाचा आकार 30 X 46 X 82 मीटर पेक्षा थोडा जास्तच असला पाहिजे. थोडक्यात तो 1,13,000 घन मीटरपेक्षा जास्त असेल.
1. सध्याच्या काळात सुद्धा एवढा प्रचंड दगड शोधून काढणे अवघड आहे. सध्याचे तंत्रज्ञान सुद्धा दोषरहित एवढा अजस्त्र दगड शोधू शकत नाही. देवळाचे काम सतरा वर्षात पूर्ण झाले असे मानले जाते तसे असेल तर रोज अतिशय कसबी असे हजाराहून जास्त कामगार लागले असतील. एवढे लोकं काम करू शकतील अशी जागाच नाही.
2. वेरूळ लेण्यातील तेहतीस लेण्यांपैकी बत्तीस लेणी ही द्विमितीय आहेत. कैलास हे लेणे फक्त त्रिमितीय आहे.
3. देऊळ कळसापासून सुरवात करून पाया पर्यंत बांधले गेले. हे काम अजून अवघड आहे . देवळाची आणि आकृत्यांची प्रमाण बद्धता पाहता. याचा व्यवस्थापकीय आराखडा आणि त्याचा समन्वय साधण्यासाठी अतिशय प्रगत तंत्रज्ञान आवश्यक होते.
4. कैलासाची प्रतिमा म्हणून हे सर्व मंदिर पांढऱ्या रंगात रंगवले गेले होते. अजूनही काही ठिकाणी त्याच्या खुणा सापडतात. मंदिराच्या परिसरात काही ठिकाणी एक फुटाहून कमी व्यासाची आणि शंभर पफुटाहून जास्त खोली असलेली विवरे आहेत. माणसाची कोणतीही प्रजाती असे खोदकाम करू शकत नाही.
5. सामान्यतः सर्व प्राचीन लहान मोठी शिव मंदिरे जल स्रोताजवळ आढळतात येथे मात्र पिंडीवर कोठून पाणी पडते आणि ते कोठे जाते हे कळत नाही.
6. तेहतीस लेण्यातील हेच लेणे एवढे मोठे का आहे आणि असे त्रिमिती दर्शक का आहे? याचा पत्ता लागत नाही.
7. शेजारील डोंगरावर मंदिराच्या वरच्या भागात पहिले तर एखादे आकाश यान उतरावे असे भूमापन दिसते. हे तीन हजार वर्षापूर्वी पेक्षा जास्त जुने शिल्प आहे. येथे काही चित्रात युरोपियन पद्धतीच्या हॅट्स घातलेली तर काही आकृतीत अवकाश प्रवासी दिसतात.
8. एक मतप्रवाह असा आहे, की या सर्व उभारणीसाठी आवश्यक तो दगड वितळवण्यात आला आणि सध्याच्या संगणकीय त्रिमिती मुद्रांकाप्रमाणे हे देऊळ घडवले गेले. अर्थातच याचा अर्थ हे देऊळ अतिशय उच्च अशा प्रजातींनी बनवले आहे. असंख्य विवरे आणि खालील थरांचा काहीही बोध होत नाही.
अशी ही कैलास नावाचीच महत्वाची आणि गूढ ठिकाणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुट व मीटरमध्ये गडबड झालीय बहुतेक. ते सुधारुन घ्या.

छान आहे माहिती. कैलास पर्वत खरेच गुढ आहे. यु ट्युबवर काही विडिओ आहेत त्यात कैलासाच्या एका बाजुला मुर्ती खोदलेल्या दिसतात असा दावा केलाय. अर्थात हे काही खरे नसावे.

कैलास लेणी आश्चर्यकारक आहेत. खाली अमुकच इतके खोदत जायचे हे ठरवले नसेल त्यामुळे व्यवस्थित आकृत्या खोदत खाली गेले आणि सर्व पुर्ण झाल्यावर खोदकाम थांबवले. असे झाले असेल. आणि त्या भागात तसेच सलग खडक सापडत असतील. आतुन निघालेला दगड नंतर इतरत्र वापरला असेल. तेव्हा तिथे रस्ते असतील जे कालौघात नष्ट झाले.

याचा अर्थ जे काम केले त्याची किंमत शुन्य असे नाही. वरुन खाली जात प्रमाणबद्ध मुर्ती खोदणारे उच्च प्रतीचे कलाकार होते हे नक्की.

पण करणार्‍याला जे काम सोपे व सहज वाटते ते नंतर पाहणार्‍याला विस्मयकारक वाटते.