रंग बदललेला गुलाल
रंग बदललेला गुलाल
जात-धर्माच्या नावाखाली, चिंगारी पेटून उठली.,
रंग रक्ताचे विसरून आता, माणूस हरवून बसली.
काळ्या-निळ्या छताखाली फडफडनार्या रंगीत झेंड्यानीही, इथे रणशिंग फुंकले,
रंगीबेरंगी इंद्रधनूतील नाते हरवून बसले..
आता काठ्याविरुद्ध लाठ्या उठल्या, अन खड्गाविरुद्ध
तलवारी पेटल्या,
लाल-तांबड्या गरम चिळकांड्या, गर्द गर्दीत पुन्हा विसावल्या.
मग तांबडा गुलाल, देव म्हणवणाऱ्या दगडाच्या पायथ्याशी थरकापत उधळत राहिला,
अन नकळत पाजलेले माणुसकीचे धडे हेच असेल, म्हणुन स्वताचे समाधान करू लागला.