तुमच्या mobile वर कोणती रिंगटोन वाजते

Submitted by KulkarniRohini on 5 November, 2019 - 23:40

माझ्या बे मध्ये बहुत जणांकडे mi चा मोबाइल आहे. सगळीकडे तेच तेच आवाज वाजत असतात. पाहिल्यांदा जेंव्हा college मध्ये असताना mobile मिळाला तेंव्हा रोज नवी रिंगटोन मी ठेवायचे. इव्हन hellotune सुद्धा.
सध्या यात काही नाविन्य उरल नाही का ? मी सुद्धा mi ची default रिंगटोन ठेवलीये.
मागे माझी मुलगी लहान होती तेंव्हा तिच्या आवाजातले गाणे ठेवले होते . फोन वाजला की असलं भारी वाटायचं.
आज मी senorita ऐकत होते वाटलं याची रिंगटोन ठेऊ.
तुम्हाला पण ह्या गोष्टी मॅटर करतात का? त्या त्या ringtone चा पण एक काळ असतो असे वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कुटुंबातील व्यक्तींसाठी आईफोनची कॉपी केलेली घंटी ठेवली आहे.
इतरांसाठी ' आइचा घो येडा झाला का तू रे?

आज मी senorita ऐकत होते वाटलं याची रिंगटोन ठेऊ. >>> आइ शप्पथ . गेले ४-५ दिवस तेच गाणं डोक्यात घोळतय , आणि हाच विचार .

भारीच.
ते आईचा घो म्हटल्यावर मला सिद्धार्थ जाधव ची हृदयी वसंत फुलताना ही रिंगटोन आठवली कोणता सिनेमा तो विसरले.
तसेच विद्या बालन ची पण तुम्हारी सुलू मध्ये कोयल सी 'तेरी बोली ही रिंगटोन होती.

टिक टिक वाजते डोक्यात.. धडधड वाढते ठोक्यात..
सई स्वप्नीलच्या आवाजात..
जेव्हा चित्रपट आलेला तेव्हापासून सेम हिच रिंगटोन माझी पेहचान झाली आहे.

माझी डिफॉल्ट रिंगटोन - लुईस बँक्सची "टॉर्च ऑफ फ्रीडम" मनामनात राष्ट्र ज्योत जागवा.
काही हरामी (परममित्र) जुन्या मित्रांसाठी - द गुड, द बॅड द अगली.
ऑफिस मधल्या मंडळींसाठी - फॉर ए फ्यू डॉलर्स मोअर.
मॉर्निंग अलार्म - फॉर ए फ्यू डॉलर्स मोअर.

आपण कशासाठी जगतोय रिंग टोन ने लक्षात यायला पाहिजे. Happy

Default : cadburry kiss me ची रिंगटोन.

आणि बाॅससाठी : फायरिंग रिंगटोन ठेवलीय..

गेला 1 वर्ष whats up लग्न मुवीतलं तु जराशी गाणंच रिंगटोन म्हणुन ठेवलंय..

हे कसलं गाणं नव्हे, नाच करण्याचे आमंत्रण नव्हे, 'आरती/स्तोत्राचा विसर पडला होता का तुला ? ऐक आता पूर्ण आरती /स्रोत्र, मगच फोन घे असे' वगैरे रिमाइंडर नव्हे,
तर ही फोनची रिंग आहे, इतरांनाही ही फोनचीच रिंग आहे असे वाटेल, एक अत्यंत साधी घटना घडत आहे, तुला कुणाचा तरी फोन येत आहे एवढीच जाणीव करून देणारी रिंगटोन ठेवतो.

हो त्या त्या रिंगटोन चा काळ असतो असं वाटतं मला तरी. सध्या मी तर बरेच दिवस I am sherloked.कंबरबॅच च्या शेरलॉक ची ओपनिंग थीम.

माझिया प्रियाला प्रीत कळेनाची टोन तेव्हा बऱ्याच लोकांनी ठेवली होती. मी फोन मधलीच कुठली तरी एक ठेवते सगळ्या कॉल साठी.

रिंगटोनची सेफ साईट कुठली मरठी गाण्याची

१) टिवीसमोर फोनमध्ये रेकॉर्डिंग करून गाणं मिळवायचं./
२) मोबाईलमध्ये एफेम रेकॉर्डिंग सोय असेल तर फारच उत्तम.
३) युट्युब ते एमपी३ साईट आहेत त्यातून.

माझ्या ऑफिसमध्ये एक प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत.
त्यांची रिंग टोन आहे 'popeye the sailor man '
खणखणीत वाजते आणि ते पण रिंगटोन पूर्ण झाल्यावरच फोन उचलतात.

मी बऱ्याच गाण्यांच्या रिंगटोन्स तयार केल्या आहेत एके काळी एडिटींग टूल वापरून! गाण्यांचे इंट्रो पीसेस किंवा छानसे इंटरल्यूड्स यांचे रिंगटोन ऐकायला छान वाटतात. विशेषतः जून्या हिंदी गाण्यांचे. पिया तोसे मधला पीस, आनेवाला पल चा इंट्रो वगैरे.
सध्या it's another day of sun या La la land च्या गाण्याचा इंट्रो रिंगटोन म्हणून ठेवला आहे!

The good, the bad and the ugly चित्रपटातला इन्ट्रो पीस..

Pages