बेसिक पियानो वाजवणे कसे शिकायचे?

Submitted by sneha1 on 26 December, 2019 - 19:18

नमस्कार!
मधे चांगले डील मिळाले म्हणून यामाहाचा कीबोर्ड आणला. खूप दिवसांची शिकायची इच्छा होती म्हणून. मी क्लासेस ची माहिती काढते आहे, पण सध्या तरी काही contract वगैरे न करता घरीच बेसिक शिकता येते का बघायचे आहे. मला ओ की ठो येत नाही Happy
कुणी काही सांगू शकेल का?
धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

BLACKCAT, फोटो नंतर टाकते. YPT 360 हे मॉडेल आहे. $ १४९ ला होता मला वाटते.
च्रप्स, लिन्क्स देऊ शकाल का प्लीज?

तुम्हाला काय वाजवायचे आहे? हिंदी मराठी गाणी की भारतीय शास्त्रीय की पाश्चिमात्य शास्त्रीय?
माझा अंदाज आहे की तुम्हाला हिंदी मराठी सिनेमा गाणी वाजवायला शिकायचे आहे. युट्युब वर खूप ट्युटोरीअल मिळतील.
एक हार्मोनियम गुरू नावाचा यूजर आहे त्याचे व्हिडीओ चांगले आहेत. ते बघून जमते का बघा.

तालवाद्य सरावाने आत्मसात करता येते तसे स्वरवाद्य लवकर जमत नाही. त्यासाठी उपजत स्वरज्ञान असावे लागते. सुरवातील बोटे सफाईदार फिरावीत म्हणून काही काही नोटेशन्स असतात त्यांचा सराव करा. आवाज चांगला नसला तरी शक्यतो वाजवताना गा. उत्साह टिकावा म्हणून आवडणाऱ्या गाण्यांचे नोटेशन बसवा. बाजारात भरपुर नोटेशन्सची पुस्तके उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त गाणी अगदी बारकाईने ऐका. त्यांची पट्टी (स्केल) ओळखण्याचा प्रयत्न करा. आवडते गाणे किंवा त्याचे करावके लावून त्याला साथ करायचा प्रयत्न करा. महत्वाचे म्हणजे खुप ऐका, लक्षपुर्वक ऐका.
या धाग्याचा कदाचीत तुम्हाला उपयोग होईल.

टवणे सर, हिंदी मराठी गाणी फक्त. शास्त्रीय ची माझी लेव्हलच नाही Happy

हरिहर. , छान आहे लिन्क. मी नीट बघते आता.

आवडणारी गाणी वाजवायला शिका. हॅपी बर्थडे पहिल्यांदा. मग ते वाजवून लोकांना काव येऊ द्या. रेकॉर्ड करून प्रत्येकाला वाढदिवसाला पाठवून द्या. मजा येते.

एका हाताने वाजवायला पहिले शिका. सोप्या मेलडी ज्यात 10 20 सेकंद नोट्स आहेत त्या लगेच येतात. आणि लोकांनाही ओळखू येतात. तुमचाही उत्साह टिकून राहतो.

कीबोर्ड वाटला तरी वाजवायला सोपा नाही. मी शिकतेय सध्या! तिथे कोणी गुरु मिळाला तर मदत घ्या. बेसिकच महत्वाचे आहे. ऑनलाईन शिकायची इच्छा असेल तर माझ्या गुरुंना विचारेन. सांगावे.

किबोर्ड वर शिकून वाट लावू नका( आवडीची व टेकनिक शिकायची).
हा सल्ला माझ्या गुरुने मला दिलेला सुरुवातीला. मला पटला व पटतोच.
नुसता छंद आहे तर एक वेळ ठिक आहे.
कीबोर्ड की आणि पियानो की प्रेशर व ट्युनिंग वेगळेच असते.

सुरुवातीला चांगल्या पियानो शिक्षकानेच शिकवलेले बरे; बोटांना व्यवस्थित शिक्षण व सवय महत्वाची. अगदी बसण्याची सवय, पद्धत, हाताचा डोम कसा करून किती दाब वगैरे तेच सांगतात. मला ताठ बसण्याची सवय त्यामुळेच लागली.
संगीत व वाद्य शाळेत बघा कोर्स.
शुभेच्छा!

दुपारी सगळे झोपलेले असताना प्रॅक्टिस करायची म्हणजे घरातल्यांचे, शेजाऱ्यांचे, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळतात आणि आपल्या वाजवण्यात झपाट्याने सुधारणा होते. मी बासरी अशीच दुपारी वाजवतो.

किबोर्डला हेड्फोन लावता येतो किंवा आवाजही कमी करता येतो. त्यामुळे दुसर्‍याला आपल्या सरावाचा त्रास होत नाही.

पियानोची (बेसिक लर्निंगची) पुस्तके/DVDs आणा. ती तुमच्या जवळच्या ग्रंथालयातही मिळतील.
Youtube वर भरपूर ट्युटोरियल मिळतील...>>+१

>>>> दुपारी सगळे झोपलेले असताना प्रॅक्टिस करायची म्हणजे घरातल्यांचे, शेजाऱ्यांचे, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळतात आणि आपल्या वाजवण्यात झपाट्याने सुधारणा होते. मी बासरी अशीच दुपारी वाजवतो.>>>>> =)) =))