लता मंगेशकरांनी गायलेल्या व मला आवडलेल्या गाण्यांचे रसग्रहण करायचा हा आनंददायक उपक्रम पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू केला आहे. ह्या गाण्यांचे आपले असे एक मिथिकल युनिवर्स आहे. मानवी भावनांच्या अनेक नाजूक, हळव्या पदरांना लतेची गाणी तिच्या सुमधुर अप्रतिम आवाजात स्पर्श करतात. गाणे ऐकल्यावर आपल्याला उमगते की खरेच की, मला असंच तर वाटतंय. ही गटणे छाप एक्सेल शीट मधली जंत्री नव्हे किंवा लताचे टॅलेंट कसे वर्ल्ड्क्लास आहे ते ठासून सांगायचा प्लॅट्फॉर्म ! ही फक्त एक सुरांची आनंदयात्रा आहे.
तुम आ गए हो, नूर आ गया है....
बिचारी माझी सहकर्मचारिणी !!!
(तिला आपण सहचा म्हणूया.)
काय झालं असं हा तुमचा प्रश्न असेल, मी कसं बरोबर ओळखलं !! जात्याच हुशार ना ! काय करणार. काही जण तर मला मनकवडी म्हणतात. असो . स्वस्तुती फार होतेय.
तर थोडक्यात प्रसंग असा घडला की , सहचाला लग्नाला जायचे होते. सीमांतपूजन गाठण्यासाठी ह्या बाईसाहेब हिंजवडी पट्टा ३ वरून नगर रोड ला (आणि तेही ऑफिस नंतर म्हणजे ट्रॅफिकची पीक (??) वेळ ) वाघोलीस्थित असणाऱ्या एका कार्यालयात (मंगल कार्यालय हो .. ऑफिस नाही काही .. ) जाणार होत्या.
सर्व मायबोलीकरांना होळी च्या रंगीबेरंगी शुभेच्छा
मराठी/हिंदी चित्रपट , लोकसंगीत यातील होळी, रंग, रंगपंचमी चा उल्लेख असणारी गाणी इकडे आठवूया.
संगीत, स्वरविश्व या गोष्टी शब्दांच्या पलीकडच्या असतात. त्या शब्दांत बांधू पाहणे म्हणजे 'मुक्याने गूळ खादला । गोडी न ये सांगायाला' म्हणजेच मुक्या व्यक्तीने गूळ खाऊन त्याची गोडी सांगायचा प्रयत्न केल्यासारखेच! त्यामुळे मनाला स्पर्शून जाणाऱ्या संगीत/स्वरविश्वातल्या कोणत्याही कृतीबद्दल काही लिहायचेच झाले तर त्याच्या शेवटी 'अवर्णनीय आनंद' हे हमखास येणारच! त्यामुळे नादब्रह्मापुढे शब्दब्रह्माने मौन पाळणेच योग्य ठरते.
काही महिन्यापूर्वी मी माझे नवीन गाणे प्रसिद्ध केले. ऐकून प्रितिसाद द्या.
कवयित्री - जयश्री अंबासकर
गायिका - प्रज्ञा जाधव
संगीत आणि संयोजन - प्रशांत गिजरे
ध्वनी मिश्रण आणि संपादन - साकेत
"It's like I'm paranoid lookin' over my back
It's like a whirlwind inside of my head
It's like I can't stop what I'm hearing within
It's like the face inside is right beneath the skin ...
... The sun goes down
I feel the light betray me
The sun goes down
I feel the light betray me ..."
बदल हाच जगाचा नियम आहे. तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे तर बदलाचा वेग अजूनच प्रचंड वाढतो आहे. हा बदल सतत कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या समोर येतो आहे. उपयोगी आणि निरुपयोगी नवनवीन माहिती दर मिनिटाला WhatsApp किंवा फेसबुकमार्गे फोनवर दिसते आहे. फोनमधून डोकं वर काढावं तर चोवीस तास भडक बातम्या ओकणारी खाजगी टीव्ही चॅनेल्स आहेत. वृत्तपत्रांची पण तीच परिस्थिती. या मधली मराठी भाषा ऐकल्यावर किंवा वाचल्यावर लक्षात येतं की गेल्या वीस वर्षात मराठी खूपच बदलली आहे. मराठी भाषेतल्या योग्य आणि चपखल शब्दांचा वापर कमी होताना दिसतो आहे. असं का होतंय ते कळत नाही.
ठाण्यामधे मुलीला गायनाचा तास्/क्लास सुरु करायचा आहे..
तिचं वयं ५ पुर्ण आहे..
आवाज चांगला आहे..नाजुक आहे.. तिला आवड निर्माण होईल का ते पहायच आहे..
कोणाला माहिती आहेत का क्लासेस ठाण्यामधे?
तिने आधी असं काही केलं नाहिये .. ही पहिली वेळ अशा क्लास ला जायची..
मदत हवी...