पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वेगळंच वळण दिलं हे सर्वश्रुतच आहे. विष्णु दिगंबर आणि त्यांच्या गांधर्व महाविद्यालयानं अनेक गायक व शिक्षक तयार केले. त्यांपैकीच एक प्रो. बी. आर. देवधर. विष्णु दिगंबरांनी ज्यांना गायनाबरोबरच शालेय शिक्षणाचीही परवानगी दिली, असे देवधर हे एकमेव विद्यार्थी. कलाशाखेची पदवी मिळवलेले देवधर मास्तर हे त्या काळी एकमेव शिक्षित असे गायक होते. विष्णु दिगंबरांच्या परवानगीने त्यांनी पाश्चात्य शास्त्रीय संगीताचेही धडे गिरवले होते.
आत्ताच आमच्या महाराष्ट्र मंडळाकडुन ह्या विषयीची मेल आली. लगेच हे मायबोलीवर पण शेयर करावस वाटल.
घरबसल्या भावसंगीताचे धडे सलील कुलकर्णी, संजिव अभ्यंकर आणि कौशल इनामदार ह्यांकडुन मिळणार.
अधिक माहिती साठी www.gabhavasangeet.com ह्या दुव्या वर टिचकी मारा.
काल यशवंत देव यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या "देवगाणी" या कार्यक्रमाला गेलो होतो. स्वतः देव ही उपस्थित होते. शब्दप्रधान गायकीचा नवा ठसा मराठी संगीतावर उमटवणारे अशीच त्यांची ख्याती. सांगा कसं जगायचं, भेट तुझी माझी, नको नको रे पावसा, या जन्मावर,अरे संसार संसार, माघाची थंडी, बोलगाणी, दिवस तुझे हे फुलायचे, भातुकलीच्या.. अशी एकेक गाणी ऐकताना असं वाटलं की खरंच या शब्दांना जर इतका न्याय मिळाला नसता तर ती अजरामर झाली असती? कवितेचा अर्थ श्रोत्याला समजावून सांगणारं संगीत अशीच त्यांची संगीताची व्याख्या.
आज २८ सप्टेंबर. लतादीदींचा सहस्रचंद्रदर्शनसोहळा. यानिमित्तानं दीदींशी गेल्या अनेक वर्षांचा ऋणानुबंध असणार्या काही दिग्गजांची ही मनोगतं..
विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळाली. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला जेवढी शक्य होतील तेवढ्या गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल (sanyojak@maayboli.com) करून कळवायचा आहे. सर्वात जास्त बरोबर उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.
गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: श्री. राहुल देशपांडे
गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: श्री. रघुनंदन पणशीकर