पाऊस जीवघेणा - वैभव जोशी

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 02:23

गीत/स्वर: वैभव जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लासच...ऐकायला अजून मजा आली Happy

ऐकत ऐकत वाचायला वा वाचत वाचत ऐकायला अजून छान वाटतं म्हणून ही शब्दातही. Happy

काही जुन्या स्मृतींशी सलगी करून गेला
पाऊस जीवघेणा आला निघून गेला

हा दूर चाललेला मृदगंध सांगताहे
कोणीतरी मनाच्या वेशीवरून गेला

थोडे मळभ निसटले थोड्या सरी निखळल्या
चाळून कागदांना वारा उडून गेला

एका क्षणात माझे गाणे निरभ्र झाले
या मैफलीतुनी का कोणी उठून गेला

तृष्णेत झिंगलेला वेडा फकीर होता
ग्रीष्मात पावसाचे गाणे म्हणून गेला

हा दूर चाललेला मृदगंध सांगाताहे
कोणीतरी मनाच्या वेशीवरून गेला

थोडे मळभ निसटले थोड्या सरी निखळल्या
चाळून कागदांना वारा उडून गेला

एका क्षणात माझे गाणे निरभ्र झाले
या मैफलीतुनी का कोणी उठून गेला

अगदी जीवघेणे लिहिता गुरुजी तुम्ही!
श्यामलीताई धन्यवाद!

सुरेख गझल, श्यामली ने लिन्क दिली , खुप दिवसानी मायबोलीवर चक्कर झाला... टु गूड................... मस्त !!!!!! गुरुजी अजुन ऐकाय्चे ):...

वाह! क्या बात है!!
ऐकताना वातावरण निर्मिती इतकी मस्तं झाली की कामावर असलो तरी मला हे असं दिसलं :
एखाद्या कोकणातल्या खेड्यातल्या झाडींनी वेढलेल्या एकल्या घरात, रात्री, निघून गेलेल्या पावसाच्या झाडावरच्या थेंबांची टपटप .. आणि मनाला किंचित सुन्न करणा-या (आणि ऐकून झाल्यावर काही काळ तसंच ठेवणा-या) कवितेचा हा आवाज...

वाह वैभव.. मस्तंच!! जबरदस्त रचना!

एका खिन्न सायंकाळ चे व्हीजुअलाय्जेशन -शब्दात विश्व सामावले.
मनात माझ्या शब्दातील पाऊस हुरहूर सोडून गेला.

तृष्णेत झिंगलेला वेडा फकीर होता
ग्रीष्मात पावसाचे गाणे म्हणून गेला

सुरेख!
गझल ही वाचण्यापेक्षा ऐकण्याची चीज आहे, हे खरंच आहे!

वैभव... तु लिहिलेलं तुच वाचतोस ना तेव्हा तुझ्या कवितेशी जास्तच मैत्री झाल्यासारखी वाटते.. अप्रतिम काव्य, शब्द आणि सादरीकरण.

हा दूर चाललेला मृदगंध सांगताहे
कोणीतरी मनाच्या वेशीवरून गेला

थोडे मळभ निसटले थोड्या सरी निखळल्या
चाळून कागदांना वारा उडून गेला
फारच सुन्दर आहेत या ओळी. वैभव तुमच्या गझल अगदी हटके असतात.

व्वा... Happy

सुंदर !!

शाळेत असल्यापासूनच कविता अभ्यासण्याऐवजी अश्या ऐकायला मिळाल्या असत्या तर मलाही कदाचित पद्यात वेळीच रस निर्माण झालाही असता...

तेव्हा लिहिली प्रश्नोत्तरे, संदर्भासहित स्पष्टीकरणे
काव्य अनुभवायचा का मजाच निघून गेला... Sad