गणेशोत्सव २००९ सांस्कृतिक कार्यक्रम

जय हेरंब स्पर्धा

Submitted by संयोजक on 3 September, 2009 - 21:33

विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळाली. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला जेवढी शक्य होतील तेवढ्या गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल (sanyojak@maayboli.com) करून कळवायचा आहे. सर्वात जास्त बरोबर उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.

विषय: 

गणेशोत्सव २००९ आभार प्रदर्शन

Submitted by संयोजक on 3 September, 2009 - 01:19

गेले बारा दिवस चालू असलेल्या मायबोली गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. 'मायबोली गणेशोत्सव : हमखास यशस्वी पाककृती' मध्ये सांगितल्याप्रमाणे भरपूर उत्साह, आवडीनुसार कल्पनाशक्ती, विनोदाचा मसाला, कोपरखळ्यांची फोडणी, दाद आणि प्रतिसादांची सजावट आणि रांधायला-वाढायला-चाखायला
लेखण्या, कॅमेरे, झारे, कढया, चॉपस्टिक्स आणि रंगपेट्या हे सगळे घटक पदार्थ घेऊन साजरा केलेला गणेशोत्सव दणक्यात साजरा न होता तरच नवल !!! हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी संयोजक मंडळाला पडद्यामागच्या अनेक कलाकारांची खूप मदत झाली. ह्या मायबोलीकरांना पडद्यासमोर आणून त्यांची ओळख व आभार प्रदर्शनाचा हा एक महत्वाचा आणि गोड कार्यक्रम.

विषय: 

मंडळ - भाग ५ (अंतीम)

Submitted by हायझेनबर्ग on 3 September, 2009 - 01:12

नेहमीसारखीच संथ पावलं टाकत तो मंडळाकडे निघाला. घनघोर युद्धात पराभूत झालेल्या नगरातल्या रस्त्यांवर उत्तररात्री पसरते तशा शापित आणि उदास छायेचा अंमल दाटल्यासारखा त्याला भासला. उत्तररात्र, जी सरताच उजाडणारी पहाट पहिल्या किरणांबरोबर घेऊन येईल रणांगणावर अचेत पडलेल्या आपल्या प्रियजनांच्या नाशाच्या अप्रिय वार्ता आणि पाठोपाठ येतील क्रूर नियतीच्या असंख्य वारांनी जागोजागी छिललेली त्यांची निष्प्राण कलेवरं. त्याला वाटले, ही आजची रात्रही तशीच आहे, अपेशी, भयाण. अशा वेळी मूक रूदन करण्यापलिकडे कुठलीही अवस्था मनाला प्राप्त होणे शक्य नाही. थरथरत्या काळजाचा टवका ऊडून आत्ताच काहीतरी निसटून दृष्टीआड झालंय.

SOPEC चे संस्थापक आणि संचालक डॉ. पेठे

Submitted by Adm on 3 September, 2009 - 01:10

परिचितांमधले अपरिचित : SOPEC चे संस्थापक आणि संचालक तसेच ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. पेठे

जय हेरंब - श्री. राहुल देशपांडे

Submitted by संयोजक on 3 September, 2009 - 00:58

गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: श्री. राहुल देशपांडे

विषय: 

तू...!

Submitted by श्रावण मोडक on 2 September, 2009 - 02:29

तू... तू आणि मी. आपलं तसं खरं तर काहीही नातं नाही. कारण मुळात तू आहेस हेच मी मानत नाही. पण, सभोवतालचे असंख्य जण जेव्हा तुझा दाखला देत राहतात, तेव्हा तुझं, आभासी का होईना, पण एक अस्तित्त्व तयार होत जातंच. या तुझ्या, भले आभासी का होईना, अस्तित्त्वानं आता इतकं घेरून टाकलं आहे की हे एक नातंही आपसूक तयार झालं आहे. आभासीच. पण नाकारता न येण्याजोगं...

पाऊस जीवघेणा - वैभव जोशी

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 02:23

गीत/स्वर: वैभव जोशी

चीझ : भाग २

Submitted by मेधा on 1 September, 2009 - 21:37

फ्रेंच चीझबद्दल लिहायचं म्हणजे कुठून सुरुवात करावी ते कळत नाही. आपल्याकडे भाषा, बोलीभाषा नसतील तेवढे चीझचे प्रकार असतील. अन् प्रत्येकाची चव वेगळी, पोत वेगळा, खाण्याची पद्धतदेखील वेगळी अन् सोबत प्यायच्या वाईन्स वेगळ्या.

विषय: 

अष्टविनायक दर्शन : श्री महागणपती

Submitted by पल्ली on 1 September, 2009 - 01:57

ranjangaon_0.jpgश्री महागणपती- रांजणगाव, जि. पुणे.

मार्ग- नगर रस्त्यावर पुण्यापासुन सुमारे ५० कि.मी., उरळी स्थानकापासून सुमारे १६ कि. मी.

यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी.

मूर्ती- मंदिरात दिसते ती भोगमूर्ती. ही प्रसन्न व मनोहर आहे. ऋद्धी-सिद्धी समवेत मूळ मूर्ती विधर्मीयांच्या आक्रमणाच्या भीती मुळे तळघरात दडवलेली आहे. महागणपती हा ८, १० किंवा १२ भुजांचा असतो. तशीच काहीतरी तळघरातली मूर्ती असावी. तिला १० सोंडी व २० हात असल्याचे सांगतात.

मंडळ - भाग ४

Submitted by हायझेनबर्ग on 1 September, 2009 - 01:54

लहान मुलांच्या स्पर्धा संपून आवराआवरी झाली आणि रोजच्यासारखाच सगळा ग्रूप मंडळात गप्पा मारत बसला. माणिक, अजय, रेणुका आणि विकी अजूनही सत्यनारायणाची अणि कालच्या गाण्यांच्या मैफिलीचीच चर्चा करत होते.

अजय म्हणाला, दोनदा बोलावणं पाठवूनही साठे आजोबा प्रसादाला आले नाहीत, शेवटी साठे आजींकडेच मी त्यांचा प्रसाद बांधून दिला.

विकी म्हणाला, शैलेशला पूजेला बसवण्याचा डाव त्यांच्या ध्यानात तर आला असेल ना?

माणिक म्हणाला, काही सांगता येत नाही, तब्येत बरी नाही म्हणून निरोप पाठवला होता त्यांनी, उद्या सकाळी ऑफिसला जाताना भेटून येईन मी.

Pages

Subscribe to RSS - गणेशोत्सव २००९ सांस्कृतिक कार्यक्रम