लता ८०

Submitted by चिनूक्स on 28 September, 2009 - 14:22
lata_collage2.jpg

आज २८ सप्टेंबर. लतादीदींचा सहस्रचंद्रदर्शनसोहळा. यानिमित्तानं दीदींशी गेल्या अनेक वर्षांचा ऋणानुबंध असणार्‍या काही दिग्गजांची ही मनोगतं..


_________________________________________________
Shreeniwas_Khale.jpg

छाया - श्री. सतीश पाकणीकर, प्रताधिकार - श्री. सतीश पाकणीकर

ज्येष्ठ संगीतकार श्री. श्रीनिवास खळे यांनी लतादीदींसाठी असंख्य अजरामर गाणी रचली. 'अभंग तुकयाचे', 'राम श्याम गुण गान', 'श्रावणात घननीळा बरसला' यांसारख्या ध्वनिमुद्रिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. श्री. श्रीनिवास खळे यांचं हे मनोगत..
_________________________________________________
yashwant_deo.jpg

ज्येष्ठ संगीतदिग्दर्शक श्री. यशवंत देव यांनी दीदींवर रचलेली ही एक कविता त्यांच्याच आवाजात..

_________________________________________________
Na_Dho_Mahanor_C.jpg

ज्येष्ठ कवी श्री. ना. धों. महानोर यांनी दीदींसाठी अनेक गाणी लिहिली. 'जैत रे जैत', 'सर्जा' या चित्रपटांतली महानोरांनी लिहिलेली आणि दीदींनी गायलेली गीतं खूप गाजली. 'आजोळची गाणी' या ध्वनिमुद्रिकेतली गाणीही रसिकांनी उचलून धरली. आपल्या खडकाळ शेतात विकसित केलेल्या सीताफळाच्या अतिशय मधुर फळ देणार्‍या जातीला महानोरांनी 'लताफळ' हे नाव दिलं. या लताफळाविषयी आणि दीदींविषयी बोलत आहेत श्री. ना. धों. महानोर...

_________________________________________________
mn1.jpg

श्री. मोहन वाघ यांचं मनोगत...

Lata_Mangeshkar_4.jpg

छाया - श्री. सतीश पाकणीकर, प्रताधिकार - श्री. सतीश पाकणीकर

_________________________________________________
श्रीमती लता मंगेशकरांची छायाचित्रे व गाण्यांचे अंश वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती उषा मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, Sa Re Ga Ma India Pvt. Ltd. व HMV यांचे विशेष आभार
_________________________________________________
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स, मला फक्त श्री मोहन वाघ ह्यांचीच ध्वनीफित एकायला मिळाली. बाकीच्या नाही आहेत का लिंक्स?
धन्यवाद ह्या खजिन्याबद्दल.

थँक्स, मला वाटते लिन्क्स चुकल्या आहेत. म्हणजे मोहन वाघांची श्रीनिवास खळे ह्यांच्या नावाखाली एकायला येतेय्.(येत होती दुपारी तरी, अजुन मी पुन्हा चेक नाहि केले). बघते आता.

चिनुक्स, केवळ अमुल्य. तुम्ही आम्हाला वेळोवेळी ज्या खजिन्याच्या किल्ल्या देतात त्याबद्दल धन्यवाद.

ग्रेट रे मित्रा ! खजिनाच उपलब्ध करुन दिलास. धन्यु ! Happy
अर्थात असे कित्येक खजीने आजपर्यंत तु आमच्यासमोर आणुन ओतले आहेस म्हणा. धन्यवाद.

आज ऐकले मी हे सगळे. आवडले.
श्रीनिवास खळ्यांचे मनोगत विशेष आवडले.
मस्त रे चिन्मय.. तू खरंच अशक्य आहेस... Happy

सर्व मराठी लोकांनाच नव्हे तर सर्व भारतीयांना ललामभूत ठरलेल्या आपल्यातीलच एक असलेल्या लताताईंना देवाने दीर्घायुष्य देवो. आपण आम्हा मायबोलीकरांना हा अमृतलाभ दिल्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे.