आयुष्यावर बोलु काही!..सिडनी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मागील शनिवारी सिडनी ला आयुष्यावर बोलु काही... चा कार्यक्रम झाला! खरे तर, सिडनीतील मायबोलीकर दाद ह्यांना भेटण्याचे निमित्त करुण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो

DSC00758.JPG
अग्गोबाई ढग्गोबाई
***
DSC00759.JPG
सुपरमॅन सुपरमॅन
वरुन चड्डी
आतुन प्यां s s s ट

श्री संदीप ह्यांनी चड्डी हा शब्द अन वस्तु ह्यांना पर्याय शोधण्याचे त्यांच्ये प्रयत्न सांगितले, अन शेवटी चड्डी ला पर्याय नाही असे ठाम मत व्यत केले!

***

बालगीते, प्रेमगीते, विरहगीते अन हलकी फुलकी गाणी.....कार्यक्रम खुप च सुंदर झाला... वर्णन अशक्य! Happy

कार्यक्रमाला खुप प्रतिसाद होता. अगदी शेकडोंच्य संख्येने... मला तर अगदी बालगंधर्व ला गेल्याचा अनुभव आठवला! पण चंपीला नटुन थटुन येणार्‍या गर्दीची कल्पना नसल्याने, तिला नटुन थटुन आलो नाही ह्याचे फार वाईट वाटले.... पण त्यामुळे आम्ही वेळेत कार्यक्रमाला पोहचु शकलो!:)

कार्यक्रम संपल्या नंतर श्री संदीप व डॉ. सलील ह्यांची भेट घेतली. श्री संदीप यांना मायबोलीवरील क्षिप्रा ह्यांनी घेतलेल्या मुलाखतीची आठवण करुण दिली.http://www.maayboli.com/node/282
आदल्या दिवशी बोलताना क्षिप्रांनी मला काही फर्माईशी करायला सआंगितले होते. पण वेळेअभावी आमची फर्माईश कार्यक्रमात घेतली गेली नाही. त्याचीही आठवण श्री संदीप ना करुण दिली Happy अश्या अनेक फर्माईशी अपुर्ण राहिल्याने संयोजकांनी रविवारी पुन्हा त्याच ठिकाणी अजुन तीन तासाचा कार्यक्रम ठरवला ..... पण मला कामामुळे जाता आले नाही!

काही व्हिडिओ क्लिप्स रेकॉर्ड करायला परवानगी मिळाली होती....टाकेल नंतर! पुर्ण कार्यक्रमच रेकॉर्ड करण्यासारखा आहे, पण झी बरोबरच्या करारामुळे तसे करायला परवानगी नाही!

प्रकार: 

सही रे!
'आयुष्यावर बोलू काही' ऐकलाय, पण 'अग्गोबाई ढग्गोबाई' प्रत्यक्ष ऐकायचा योग काही जुळून आला नाहीये.
अन् बाकी तू रविवारी सुट्टीच्या वक्तालादेखील कामं उपसतोस?!

मिलिंदा Happy

अरे फ, बायकोला दुकानात घेउन जाणे पण एक अत्यंत महत्वाचे कामंच ना? युरोपात बरे होते. रविवारी दुकाने बंद असायची. इथे ते सुख नाही!

अग्गोबाई चा एक व्हिडीओ आहे. अन त्यावर लहाणग्यांचा डान्स आहे! मज्जा....... टाकेल उद्या!