बॉटनी इन बॉलीवुड (चित्रपटसंगीतात आलेले झाडाझुडुपांचे/फुलापानांचे उल्लेख)

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 December, 2021 - 16:32

न्यूयॉर्कच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये शेक्सपिअर विंग आहे. त्याच्या लेखनात उल्लेख आलेली झाडंझुडपं तिथे जोपासली आहेत. प्रत्येक झाडापाशी त्याच्याशी संबंधित असलेल्या उतार्‍याचा बोर्ड लावला आहे. काही वर्षांमागे तिथे गेले असताना 'असं एखादं उदा. गुलजार गार्डन' मुंबईत केलं तर किती मजा येईल' असं मनात आलं होतं. कालांतराने त्याचा विसर पडला.

काल एका मायबोली-मैत्रिणीने सहज गप्पा मारताना "'कदंबा'चा उल्लेख असलेलं हिंदी गाणं" म्हणून 'चुपके चुपके' चित्रपटाच्या शीर्षकगीताचा उल्लेख केला. 'ऐसे जैसे के कोई राधा की सहेली मैं भी ढूंढूँ कदम्ब की छैया' अशी ओळ आहे त्यात.
त्यावरून मला पुन्हा एकदा त्या शेक्सपिअर गार्डनची आठवण झाली.

गार्डन होईल, न होईल, पण निदान गाणी आठवायला काय हरकत आहे.

ही सहज सुचलेली यादी सुरुवात म्हणून देत आहे, तुम्हाला आठवतील तशी यात भर घाला.

हिंदी:

1. मिला है किसी का झुमका ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
2. चुपके चुपके चल री पुरवैया (मैं भी ढुंढूँ कदम्ब की छैया)
3. तेरे बिना (तेरे संग कीकर पीपल)
4. थोडी सी जमीं, थोडा आसमाँ (बाजरे के सिट्टों से कौए उडाएंगे)
5. म्हारो गाँव काठावाडे (जहाँ बड पीपल की छैया)
6. चने के खेत में
7. इक चमेली के मंडवे तले
8. आप की आँखों में कुछ (लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं)
9. केतकी गुलाब जूही चंपक बन फूले
10. चंदन सा बदन
11. चली पी के नगर (झूले, पीपल, अंबुवा छाँओ)
12. अंबुवा की डाली पे बोले रे कोयलिया
13. छुप गये सारे नज़ारे (अंबुवा की डाली पे गाये मतवाली)
14. मेरी बेरी के बेर मत तोडो
15. बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे
16. नजर लागी राजा तोरे बंगले पर (जो मैं होती राजा बेला चमेलिया)
१७. दूर कहीं इक आम की बगिया
१८. गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
१९. मैं तुलसी तेरे आंगन की
२०. लवंगी मिरची मैं कोल्हापुरची, लगी तो मुश्किल होगी

मराठी:
१. गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान, खुलविते मेंदी माझा रंग गोरापान
२. मेंदीच्या पानावर
३. लटपट लटपट तुझं चालणं (जाईची वेल कवळी)
४. नाच रे मोरा आंब्याच्या बनात
५. चिंचा आल्यात पाडाला, हात नका लावू माझ्या झाडाला
६. केळीचे सुकले बाग
७. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
८. चंपा, चमेली की जाई, अबोली
९. चाफा बोले ना
१०. बिबं घ्या बिबं, शिकंकाई
११. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी - वांगी तोडते मी रावजी
१२. केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर

मराठी यादीतली काही गाणी चित्रपटगीतं नाही म्हणून लिहावीत की नाही असा विचार करत होते, पण असू दे. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.aathavanitli-gani.com/Song/Nishigandh_Tichya_Najarecha - निशीगंध तिच्या नजरेचा .....
------------------------------------------------
https://www.aathavanitli-gani.com/Song/Shabdamala_Puresha_Na - काळरात्रीसही सोबतीला रातराणी तुझा गंध होता
---------------------------------------------------------------
शालू हिरवा पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला ....
------------------------------------------------
https://www.aathavanitli-gani.com/Song/Shetala_Ra_Majhya_Naga
कसा सळसळतो जोंधळा
नाही पिकला अजुनी कोवळा
_________________________
https://www.aathavanitli-gani.com/Song/Tu_Varnilya_Gruhachya
मंदारवृक्ष बाल, फुलता झुके डहाळी .
.
फुलण्या अशोकवृक्ष मागेल पाय डावा
----------------------------
https://www.aathavanitli-gani.com/Song/Jeth_Ghume_Muraj_Janu
.
मंदारांची छाया ऊन वरती
.
कोरांटी शिरीषफुले कानी गुंतली
फुलवित तू तो कदंब भांग- शोभना
.
करी कमळे क्रीडेस्तव कुंद कुंतली
----------------------------------------
https://www.aathavanitli-gani.com/Song/Majo_Lavtay_Dava_Dola
माजो लवतोय डावा डोळा
जाई जुईचो गजरो माळता
रतनअबोली केसान फुलता
.
मनचो बकुळ गो परमाळता
-------------------------
थांबते. खूप चिटींग केली मी. आठवणीतील गाणी वर डायरेक्ट जाउन फक्त कॉपी पेस्ट केली गाणी Sad

निमुडा निमुडा निमुडा
कभी निम निम कभी शहद शहद
इमली का बुटा बेरी का पेड
गुलमोहोर गर तुम्हारा नाम होता
बंगलेके पिछे तेरी बेरी के निचे
मेरी बेरीके बेर मत तोडो
मैं हूं खुषरंग हिना
मेहंदी है रचनेवाली
मराठी :
हे चिंचेचे झाड मज दिसे चिनार वृक्षा परी
बाईग केळीवाली मी
तुझ्या उसाला लागल कोल्हा

डिज्जे Happy

शालू हिरवा, पाचु नि मरवा, वेणी तिपेडी घाला...
जाळीमंदी पिकली करवंदं

पटकन आठवली तशी गाणी

१.केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
२.जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या
बनात नागीण सळसळली
३.काकडीचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा
मुळ्यावानी कडू तरी, रंग गोरा गोरा
लीम्बावानी कांती तुझी, बीटावानी ओठ
टंब्याटाचे गाल तुझे, भेन्डीवानी बोटं
काळजात मंडई तू मांडशील काय
आगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय
४. माळच्या मळ्यामंदी पाटाच पाणी जातं, गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवित
५. मेहंदी वरील अनेक गाणी, तसेच हळद लागली, सुपारी फुटली वगैरे नेहमीचे यशस्वी कलाकार Happy
६. चंदनावर अनेक गाणी असावीत असं वाटतंय, पण आता आठवतं नाहीत.

राजसा, जवळि जरा बसा (मी ज्वार, नवतिचा भार, अंग जरतार ऐन हुरड्यात)

मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियांसि आला

(जाईची वेल कवळी) >> चवळीची शेंग कवळी

ग ग्ग साजणी ---- डाळींबाचं दाणं तुझ्या चुरडलं व्हटावरी.

घेई छन्द मकरन्द प्रिय हा मिलिन्द

मै तुलसी तेरे आंगनकी
भंवरा बडा नादान
गुनगुनारहे है भंवर खिल रही है कलीकली
भंवरेकी गुनगुन

मस्त धागा.

* वेगवेगळी फुले उमलली, रचुनि त्यांचे झेले. ( कदंबतरूला बांधुन दोला उंच-खालती झोले, परस्परांनी दिले-घेतले, गेले ते दिन गेले)

* तरुण आहे रात्र अजूनी ( बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा, रातराणीच्या फुलांचा, गंध तू लुटलास का रे?)

* अजून त्या झुडुपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते
अजून अपुल्या आठवणींनी
शेवंती लजवंती होते
तसे पाहाया तुला मला ग
तसे पाहाया तुला मला ग
अजून दवबिंदू थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कांलगुजास्थव
अजून ताठर चंपक झुरतो
अजून त्या झुडुपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते
अजून गुंगीमध्ये मोगरा आ आ आ आ आ आ
अजून गुंगीमध्ये मोगरा
त्या तसल्या केसांच्या वाटे
अजून त्या पात्यात लव्हाळी
होतच असते आपुले हासे
अजून त्या झुडुपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते

* त्या बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले

* बकुळफुला कधीची तुला धुंडते बनात

* घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला

* चंपक गोरा कर कोमल हा करात तुझिया देते
नेशील तेथे येते सखया नेशील तेथे येते

* माळ्याच्या माळ्यामंदी पाटाचं पाणी जातं, गुलाब जाईजुई मोगरा फुलवितं

ह.पा., मामी Happy

मन क्यूँ बहका रे बहका आधी रात को, बेला महका रे महका आधी रात को
बूझ मेरा क्या नाव रे … पीपल झूमे मोरे आँगना …

गुलाबाची कळी बघा हळदीनं माखली
रुपेरी वाळुत माडांच्या बनात येना
पाडाला पिकलाय आंबा
फुल गुलाब का लाखोमे हजारोमे चेहरा जनाब का

रुत आ गयी रे
रुत छा गयी रे
पीली-पीली सरसों फूले
पीले-पीले पत्ते झूमें
पीहू-पीहू पपीहा बोले
चल बाग़ में.

* केतकी गुलाब जुही चंपक बन फूले. ( बसंतबहार १९५६ : https://www.youtube.com/watch?v=FseICrhx-W0 )

* जूही की कलि मेरी लाडली
नाज़ों की पली मेरी लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जिए
नन्हीं सी परी मेरी लाडली... ( दिल एक मंदिर : https://www.youtube.com/watch?v=WcNwYNcdvXk)

वाह मस्त प्राजक्ता!
------------------
>>>>>>>>गुलाबाची कळी बघा हळदीनं माखली
सुरेख उपमा!!
---------------------------------
>>>जूही की कलि मेरी लाडली
नाज़ों की पली मेरी लाडली

सुरेख!!!

* चंदन सा बदन चंचल चितवन
धीरे से तेरा ये मुस्काना
चंदन सा बदन चंचल चितवन
धीरे से तेरा ये मुस्काना
मुझे दोष न देना जग वालों
मुझे दोष न देना जग वालों
हो जाऊँ अगर मैं दीवाना ( हो जाएं अगर दिल दिवाना)

बेक़रार करके हमें यूँ न जाईये
आपको हमारी कसम लौट आईय
......
देखिए गुलाब की वो डालियाँ
बढ़के चूम लें न आपके कदम
खोए-खोए भंवरें भी हैं बाग़ में
कोई आपको बना न ले सनम
बहकी-बहकी नज़रों से खुद को बचाईये
आपको हमारी...

* चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना

* जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी
हा-हा-हा ढोल वाजं जी, वाजं जी ढोल वाजं जी, ढोल कुणाचा वाजं जी.

चौदहवीं का चाँद हो या आफ़ताब हो
जो भी हो तुम ख़ुदा की क़सम, लाजवाब हो
....................

चेहरा है जैसे झील में हँसता हुआ कँवल
या ज़िंदगी के साज़ पे छेड़ी हुई ग़ज़ल

* कळीदार, कळीदार कपूरी पान
कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना
रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
घ्या हो मनरमणा
कळीदार, कळीदार कपूरी पान

* पान खाए सैंया हमारो
सावली सूरतिया होठ लाल लाल

* खैके पान बनारसवाला

Pages