रंगभूमी

अ परफेक्ट मर्डर

Submitted by Ravi Shenolikar on 20 September, 2019 - 07:36

काही दिवसांपूर्वी "अ परफेक्ट मर्डर" हे नाटक पाहिले. अल्फ्रेड हिचकाॅकचा गाजलेला चित्रपट "Dial M for murder" चे हे सुंदर नाट्यरूपांतर. पहिल्या क्षणापासून खिळवून ठेवणारे. चित्रपट खूप वर्षांपूर्वी पाहिला असला तरी पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळाला. नाटकाचे लेखन फार उत्तम झाले आहे. अनिकेत विश्वासराव व पुष्कर श्रोत्री ह्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. विशेषत: पुष्करने पोलिस ऑफिसरची भूमिका मस्तच केली आहे. हे नाटक ते भूमिकांची अदलाबदल करून सुद्धा सादर करतात. त्यामुळे तुम्ही नाटक बघाल तेव्हा पुष्कर वेगळ्या भूमिकेत बघायला मिळण्याची शक्यता आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

Submitted by पाषाणभेद on 22 June, 2019 - 17:58

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.)
(शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.)

एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी!

दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी?

पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी.

मराठी नाटक -एका लग्नाची पुढची गोष्ट

Submitted by me_rucha on 3 June, 2019 - 04:48

थोडया दिवसांपूर्वी एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक पाहिलं. नाटकाचं कथानक थोडक्यात पुढील प्रमाणे सांगते.

विषय: 

भो भो २०१६ - चित्रपट

Submitted by कटप्पा on 2 June, 2019 - 20:30

मुळात असा एखादा चित्रपट आहे हेच मला माहित नव्हते। सहज तूनळी वर दिसला, प्रशांत दामले, सुबोध भावे, शरद पोंक्षे, संजय मोने, केतकी चितळे सारखी स्टारकास्ट पाहिली, बघायला सुरुवात केली, खूप ओरिजिनल थ्रिलर मिस्ट्री आहे.
एक फ्लॅट आहे आणि पोलीस दरवाजा तोडून आत शिरतात तर तिथे दिसते स्मिता चा मृतदेह आणि बाजूला बसलेला एक कुत्रा. स्मिता च्या शरीरावर कुत्र्याने हल्ला केलेल्या खुणा दिसतात, पोलीस कुत्र्याला ताब्यात घेतात आणि केस फाईल करतात.
स्मिता ची एक करोड ची इन्शुरन्स पॉलिसी आहे, आणि तिचा नवरा विनायक ला पैसे नको असतात, ते पैसे सरळ स्मिता च्या आई ला देण्यात यावेत असे त्याचे म्हणणे असते.

शब्दखुणा: 

तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

विषय: 
शब्दखुणा: 

कला जगणारा कलावंत - विठ्ठल नागनाथ काळे

Submitted by आठवणीतीलराजाराणी on 25 April, 2019 - 17:06

नुकताच कागर चा ट्रेलर आला आणि आर्ट फिल्म मधील परिचित एक चेहरा त्या ट्रेलर मध्ये दिसला. जवळ पास 125 short फिल्म 15 मराठी डिप्लोमा व फुल्ल लेंथ फिल्म आणि 2 हॉलिवूड फिल्म असा अनुभवाचा पेटारा असणारा एक कलाकार म्हणजे विठ्ठल काळे.
kagar.jpg
घेणं अन देणं फुकटच .....हा संवाद आणि नागीण डान्स ह्यात जे काम त्याच दिसत ते त्यांचा अनुभवाला

विषय: 

तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 

भटकभवानी ठुमकत चाले

Submitted by सिद्धेश्वर विला... on 28 January, 2019 - 10:21

भटकभवानी ठुमकत चाले

भटके पप्पू संगे

तारुण्याची नौका हाकण्या

शोधे नेहेमी लफंगे

पप्पू शामल कुलीन शोभे

नाकासमोर चाले

डोक्यावरती तेल थापूनी

चष्म्यावरती आले

हारतुरे तो घेऊनि हाती

विनवी पांडुरंगा

तुझ्या कृपेने लाभली मजला

चंचल अवखळ गंगा

गंगा मैय्या रंगुनी सोडे

झुळझुळणारं पाणी

पप्पू मात्र कापडं काढूनच

होई पाणी पाणी

पप्पू होऊनि खजील बिचारा

शोधे नाना दवा उपाय

काय खाऊ नि काय पिऊ?

जेणे उठेल मधला पाय

शोधत शोधत गेला असता

सापडे नवी खाण

शब्दखुणा: 

ओव्हररेटेड सेलिब्रिटी

Submitted by कटप्पा on 20 November, 2018 - 13:56

तुम्हाला ओव्हररेटेड वाटणारे कलाकार कोण आहेत आणि कशामुळे यांच्या चर्चेसाठी धागा उघडण्याचे पुण्य कर्म दोन महिन्यानंतर करत आहे.

शब्दखुणा: 

आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर

Submitted by मेधावि on 9 November, 2018 - 23:29

अभिजीत देशपांडे लिखीत आणि दिग्दर्शीत "आणि डाॅक्टर काशिनाथ घाणेकर" सिनेमा काल पाहीला. अभिजित हा आमच्या वर्गमित्राचा भाचा म्हणून अजून कौतुकानं व प्रेमानं पाहीला.

काशिनाथ घाणेकरांची नाटकं आणि त्यांचा सुवर्णकाळ आमच्या पिढीला पहाता किंवा अनुभवता नाही आला, मात्र हा सिनेमा बघताना त्या काळात शिरून, भालजी पेंढारकर, सुलोचनादिदी, डाॅक्टर ह्या अप्राप्य व्यक्तींसमवेत काही क्षण जगल्यासारखं निश्चितपणे वाटलं.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - रंगभूमी