मोबाईल नंतर वाचा. . .
______________________________________________________________________________________________________________________
(पुस्तक नंतर वाचा" च्या धर्तीवर आजच्या काळाला अनुसरुन "मोबाईल नंतर वाचा/खेळा" अशी एक नाटिका दोन वर्षापुर्वी बसवली होती. सर्व बालकलाकार परदेशीस्थित असल्याने साधी सोपी वाक्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. नाटिकेसाठी लागणारी ऑडिओ क्लिप्स, उद्घोषणा, पार्श्वसंगीत मी स्वतःच दिले होते. यातील गाण्यात देखिल "मोबाइल नंतर खेळा" असा बदल करुन घेतला होता)
मी काल एक मराठी विनोदी नाटक बघितले, या नाटकामध्ये टीव्हीवर येणारे प्रसिद्ध कलाकार आहेत, हे नाटक बऱ्यापैकी हाउसफ़ुल्ल होते, प्रेक्षक सर्व वयोगटातले होते. पण या नाटकातला सत्तर ते ऐंशी टक्के विनोद व्यक्तीचा रंग, अंगकाठी आणि बाह्य स्वरूप यावरच होता, या विनोदावर थिएटर मधले सगळेच हसत, दाद देत होते, माझ्या शेजारी एक शाळकरी मुलगा त्याच्या आईवडीलांबरोबर आला होता, त्याला ही हे विनोद आवडत होते. आपण जर अजूनही व्यक्तीचा रंग, अंगकाठी, बाह्य स्वरूप यावरच विनोद करत असू, हसत असू, दाद देत असू तर हे दुर्देवी आहे का?
शाळा सुटता, पुस्तक मिटता, करुया आपण गमत्या जमत्या..
अलबत्या गलबत्या..... अलबत्या गलबत्या.... अलबत्या गलबत्या... अलबत्या..
भरत नाट्य मंदीर चा ४९ वा हाउसफुल शो चालु होता.आजुबाजुला बसलेला लहानथोर तमाम प्रेक्षकवर्ग या गाण्यावर ताल धरुन टाळ्या वाजवत होता.
खुर्चीत बसुन नाचत होती पोरं नुसती.
पहिल्या गाण्यापासुन नाटकानं जी पकड घेतली ती शेवटच्या गाण्यापर्यंत सुटली नाही.सुमारे २.५ तास कापरासारखे उडुन गेले.
"अलबत्या गलबत्या" पाहायचा कालच योग आला.नाटक म्हणायला बालनाट्य पण मोठे पण तितकेच रंगुन गेले होते.
मोठ्यानी लहानांसाठी केलेलं हे बालनाट्य अतिशयच सुंदर आहे.
तेरे बिना जिंदगी.....
तेरे बिना ज़िंदगी से कोई, शिकवा, तो नहीं,
शिकवा नहीं
शिकवा नहीं, शिकवा नहीं
तेरे बिना ज़िंदगी भी लेकिन, ज़िंदगी, तो नहीं,
ज़िंदगी नहीं
ज़िंदगी नहीं, ज़िंदगी नहीं
एक कलाकार
जवळजवळ चौदा तासांची शिफ्ट करून तो फ्लॅटवर पोचला तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. थकलेल्या शरीराने आणि सुन्न मनाने तो सोफ्यावर बसून राहिला. त्याचा रूम पार्टनर केव्हाच दिवा मालवून झोपला होता. इतके थकल्यावरही त्याला अंथरुणावर आडवे व्हावेसे वाटेना. तो स्वयंपाकघरात गेला खायला काही आहे का ते बघायला. आदल्या दिवशीचा ब्रेड आणि दूध तेवढेच फक्त दिसत होते. तेच त्याने पोटात ढकलले आणि परत सोफ्यावर येऊन बसला. ‘कसले वैफल्य आहे हे आणि का?’ तो स्वत:वरच चिडला. ‘आता का रागावतोय आपण आणि कोणावर? सोशल मेडियावरच्या प्रतिक्रियेला एवढे महत्व का देतोय आपण?’
उत्तम, प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक आणि नट म्हणून आलोक राजवाडेची ख्याती आहे. फोर्ब्सच्या 'थर्टी अंडर थर्टी' या यादीत झळकलेल्या आलोकला 'कासव'मधल्या अभिनयासाठी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय चित्रपट-महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं.
'कासव' ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. त्या निमिताने आलोक त्याच्या नाट्यसृष्टीतल्या पदार्पणाबद्दल सांगतोय.
वेडं होऊन मी खूप
मिळवलं आहे
दुःखाच्या समुद्रात
स्वतःला घडवलं आहे
सुखाचा आता
मोह वाटत नाही
निराश होण्याची
गरज भासत नाही
दुःख आता
शोधून मिळत नाही
अन्
सुख माझी
पाठ सोडत नाही
(माझा हा पहिलाच प्रयत्न..
काही चुकलं तर सांभाळून घ्या..)
संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा..
मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव...
राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला...
संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे..
राघव : तुला म्हणतोय तुला..
मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा..
संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा..
राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा...
मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत..
संकेत : मी काय म्हणतो
राघव : काय म्हणतोस तु??
संकेत : हेच्या आयलां...
मयुरी : संक्या शांत हो.. राघव निघ इथुन..