हॅमिल्टन: एक सर्वांगसुंदर संगीतिका

Submitted by अमा on 5 July, 2020 - 22:38

जागतिक नाट्यसॄष्टीत ब्रॉडवे वर नाटक ह्याचे एक खास व महत्वाचे स्थान आहे. कसलेले कलाकार, उत्तम अभिनय, तगडे दिग्दर्शन व कथानक भक्कम आर्थिक पाया असल्याशिवाय नाट्यकृती ब्रॉडवे वर सन्मान मिळवू शकत नाहीत व ऑफ ब्रॉडवे आपला कला विष्कार दाखवत राहतात. अमेरिकेचे एक फाउंडिंग फादर व ट्रेझरी सेक्रेटरी अलेक्झांडर हॅमिल्टन ह्यांच्या जीवन कथेवर रचलेली हॅमिल्टन ही संगीतिका ब्रॉडवे वर २०१५ च्या सुमारास प्रथम प्रदर्शित झाली.

ह्यातील गाणी, संवाद लगेच लोकप्रिय झाले व युट्युब वर उपलब्ध होते. हे क्लिपिन्ग्ज इतके परि णाम कारक होते की अगदी इथून बुकिंग करून टुरिस्ट व्हिसा घेउन हा प्रयोग प्रत्यक्ष बघायलाच हवा असे मनातून वाटत होते. पण तितके काही करावे लागले नाही. डिस्ने + व हॉटस्टार च्या कृपेने हॅमिल्टन ह्या नाट्य कलाकृतीवर बनवलेला सिनेमा प्रिमि यम वर उपलब्ध झाला. शनिवार चार जुलैला सकाळीच हा प्रयोग बघता आला.

मुख्य म्हणजे ही नुसती नाट्यकला कृती नाही. तर संगीतिका आहे. आपला राजा किंग जॉर्ज तिसरा हाच आपल्याला मोबाइल बंद करून आता गप्प बसा व शो एंजॉय करा असे सांगतो. दर वाक्याला, संवादाला गाण्याला सतत प्रेक्षकांची दाद मिळत राहते व आपणही कथेत गुंतत जातो. हॅमिल्टनह्याला वडील नाहीत कॅरेबिअन मध्ये वेश्ये च्या पोटी जन्मलेला मुलगा आई वारल्यावर पोरका होतो व दहा डॉलर घेउन अमेरिकेत येतो. मोठा होतो. बॉस्टन टी पार्टी च्या सुमारास सैन्यात दाखल होतो. लाफायेत बरोबर लढतो. तेव्हाच त्याचा आजन्म शत्रू बर ह्याचा ही आर्मित त्याचा सहकारी असतो. ह्या दोघांची ही समांतर कथा आहे जी बहुतांशी गाण्यांतून व संवादातून व्यक्त होते. संपूर्ण प्रयोग अडीच पाव्णेतीन तासाचा आहे. व शक्यतो मध्ये न उठता व व्यत्यय न येउ देता बघावा. प्रत्येक वाक्य व संवाद अगदी चपखल लिहीला आहे. एखादी लिंक गेली तर पुढे समजणे अवघड जाईल.

गाण्यांतून व्यक्त होते युद्ध , तत्कालीन परिस्थिती, हॅमिल्टन चे डेटिंग व एलायझाचे त्याच्या प्रेमात पडणे, त्यांचे लग्न, मूल होणे हे एका लेव्हल वर होत राहते. एलायझाचे हेल्पलेस हे गाणे फार सुरेख आहे. व पार्टीचा सीन पण छान घेतल आहे. कास्ट एक एक प्रॉप आणते ठेवते व नेते ह्या हालचाली फार सफाईदार आहेत. हे पूर्ण नाटक भर.

लेखन ही हॅमिल्टन ची मेजर स्ट्रेंग्थ असते. तो प्रेमपत्रे, कायदेशीर डॉक्युमेंट्स, पॉलिसी स्टेट मेंट , पत्रे सुरेख ड्राफ्ट करतो. त्याचा पूर्ण पत्रव्यवहार व लेखन भरपूर व चांगल्या दर्जाचे आहे. ही पत्रे ऑन्साँब्ल कास्ट तर्फे वितरीत केली जातात ते बघणे फार मनोरंजक आहे. आर्मीतील करीअर संपल्यावर तो राजकारणात येतो व पुढे चढ त जातो, त्याचे शत्रू बनत जातात. कधी सपोर्ट ही मिळतो. हॅमिल्टन व बर ह्यांना मुले होतात तेव्हाच अमेरिका नावाचे नवे राष्ट्र ही जन्माला आलेले असते. इमिग्रंट लोकांचे कष्ट व आपले आर्थिक स्थान उंचवायची प्रत्येकाची धडपड ह्यातून राष्ट्राची बांधणी व मजबूत वाढ होते. त्याचे खास असे प्रश्न ही निर्माण होतात. काही प्रश्न बंदुकीच्या ड्युएल ने सोडवले जातात ( त्या काळची पद्धत. !!!) आय एम जस्ट लाइक माय कंट्री यंग स्क्रॅपी हंग्री म्हण णारा हॅमिल्टन प्रौढ होतो. आपली मुले आपली स्टोरी सांगतील असे म्हणत मद्याचे चषक उंचवणारे रेज अ ग्लास टु फ्रीडम नो वन कॅ न टेक इट अवे म्हणणारे त्याचे समकालीन पण वयस्कर होतात.

एलायझा ची बहीण पण हॅमिल्टनच्या प्रेमात असते पण त्याचे लग्न झाल्यावर लंडन ला निघून जाते. त्यांच्याती ल केमिस्ट्री कधीच कमी होत नाही. हिच्या गाण्यांमधून त्याकाळातील स्त्रीवादाची ओळख होते. मोठ्या मुलीने श्रीमं ताशीच लग्न करायचे म्हणून ती गरीब हॅमिल्टन ला बहिणीकडे सोपवते व तिच्या संसार सुखावर टुकत बसते. हे पात्र साकारणारी गायिका नटी एक दम फुल ट थ्रोटेड गाउन आपली पॅशन व्यक्त करते ते ऐकण्या बघण्यासारखेच आहे. पुढे अनेक नाट्यमय घटना आहेत. हॅमिल्टन्च्या मुलाचा मृत्यु, त्याचे अफेअर पब्लिक डोमेन मध्ये येणे व बाय्कोने त्याला नाकारणे, पुढे परत स्वीकारणे, राजकी य घडामोडी व पडद्यामागचे राजकारण, व स्वतः त्याचा जुन्या सहकारी बर बरोब र ड्युएल कर ण्याचा निर्णय .

शेवटी एलायजा न्युयॉर्क मध्ये अनाथ पोरक्या मुलांसाठी पहिले प्रायवेट अनाथाल य उभे करते. त्याचे कार्य जमेल तसे पुढे नेते. हा असा सर्व नाट्य मय जीवन प्रवास. आपण हे बघताना थकून जातो. कारण सो मच इज हॅपनिन्ग ऑन द स्टेज!!!

व्यक्तिरेखा गोर्‍या व्हाइट असल्या तरी कलाकार सर्व रंगांचे आहेत. व संगीताची शैली आफ्रिकन अमेरिकन समाजाचा सांस्कृतिक वारसा जे रॅपसंगीत, व तत्सम त्यातून घेतली आहे. सिनेट मधील प्रश्नोत्त्तरे रॅप बॅ टल स्वरूपात घेतली आहेत. एक एक शब्द चपखल निवडून घेतला आहे व कलाकार अचूक समेवर येतात तेव्हा फार आनंददायक सीन्स आहेत. ह्यात इंग्लंडच्या राजाचे दोन तीन प्रवेश आहेत. ते बघण्या सारखे आहेत. चुकवू नका. राजा एकदम तिरस्करणीय व्यक्तिमत्व उघड करतो.

सर्व कलाकारांची वेषभूषा बारकाईने काळाला धरून केलेली आहे. आर्मी ऑफिसरांच्या कोटांची बटने. मुलींचे गाउन्स, सर्वाचे बूट व केश कलाप, वय वाढत जाईल तसे चश्मे, राजाचा पोषाख एक एक बघण्याजोगे आहे. फार मस्त डि टेलिंग केले आहे. हॅमिल टन चे पुस्तक, स्क्रिप्ट व विकी संदर्भ उपलब्ध आहेत. एक तर ते वाचून मग कलाकृती बघावी किंवा एकदा बघून मग हे वाचन करावे.

एकाच वेळी, गायन नाच, हालचाल, संवाद फेक श्वास संभाळत करणे किती अवघड आहे ह्याची प्रचिती प्रयोग बघुन येते. पण सर्व कलाकारांनी अप्रतिम कामे केली आहेत. परवा चार जुलैला आम्ही सकाळीच हा नाट्यप्रयोग( त्याची फिल्म ) घरबसल्या बघितली व शेव टी कोण होतास तू काय झालास तू असे वाटले. मी डिस्ने प्लस हॉट स्टा र प्रिमिअम ची वर्गणी भरून बघितला . आता ब्रॉडवे वर कधी फिरायला मिळेल कोण जाणे. एकदा ते डिनर व नंतर नाट्यप्रयोग हा कार्यक्रम बकेट लिस्टित आहे. सध्या प्रयोग जानेवारी २०२१ परेन्त बंद आहेत लॉकडाउन व करोना मुळे. एक महान रा ष्ट्राची उभारणी, व एक वैयक्तिक शोकांतिका ह्यांचा मनोहारी संगम म्हणजे हॅमिल्टन चा प्रयोग. तुमची राजकीय भूमिका कोणतीही असली तरी एक कलाकृती म्हणून नक्कीच उच्च दर्जाची ही फिल्म आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा मुलगा रिपीट मोड वर बघत आहे. Alexander Hamilton हे गाणं माझ्या तोंडात सुद्धा सतत येत आहे. लेख आवडला. Happy . मीही पाहिले सुरवातीचे... पूर्ण नाही पाहिले अजून. I just love the energy of a Broadway musical !!

व्यक्तिरेखा गोर्‍या व्हाइट असल्या तरी कलाकार सर्व रंगांचे आहेत. व संगीताची शैली आफ्रिकन अमेरिकन समाजाचा सांस्कृतिक वारसा जे रॅप संगीत, व तत्सम त्यातून घेतली आहे........अमेझींग rap, वेशभूषा सुंदर, पूर्ण टीम आकर्षक दिसली आहे. सुरवातीचे अलेक्जेंडर चे दुर्दैव बघून हळहळले अगदी. त्या नटाचे डोळे खूप बोलके वाटले.

I just love the energy of a Broadway musical !!>> हा प्रयोग प्रत्यक्ष बघण्याजोगा आहे. मी तिकीट काढले तर तुला मेसेज करेन. Happy

आमच्या गावात लाईव्ह परफॉर्मन्स बघायला मिळाला. मोठी रांग लावून तिकीट काढले होते पण पूर्ण बघताना खुपच मजा आली. नेहमीच्या म्युझिकल्स पेक्षा थोडा हटकेच केलेला आहे. त्यात हिप-हॉप वापरल्याने गाणी फास्ट झालेली आहेत. सगळ्यांचे नाच तर अगदी एनर्जेटीक आहेत. स्टेजवर लाईव्ह बघताना आपण एका वेगळ्याच दुनीयेत गेल्यासारखे वाटते.

कुठे बघायला मिळालं हॅमिल्टन? आम्ही दोनेक वर्षापूर्वी तिकीटं ओपन होताना खूप फिल्डींग लावून बसलो होतो पण नाहीच मिळाली तिकीटं.

मस्त लिहीले आहे! परवा आमच्या घरी मी सोडून सगळे खिळून बसले होते. मी थोडीफार पाहिली आणि प्रत्येक वेळेस थबकलो - साधारण मध्यंतरा आधी व नंतरचा थोडा भाग, ते "नॉन-स्टॉप" गाणे वगैरे पाहिले.. आता नीट पाहणार आहे. एक वेगळाच अनुभव आहे.

भारतात डिस्ने प्लस हॉट स्टार असे एक आहे त्यात प्रिमि अम ऑप्शन घेतली की पार गेम ऑफ त थ्रोन्स पण दिसते. प्रत्येक गाणे व संवाद सुद्धा इतके शब्द आहेत की मन लावुन बघावे लागते. इंग्रजी असूनही मी सबटायटा ल वाचत होते. अनेक वेळा पॉज व री रन केले. समजून घ्यायला.

जेफरसन चे काम केलेला नट बहुतेक करेबिअन ओरिजिन्स चा आहे. त्याची व लाफायेत ची एनर्जी बघण्याजोगी आहे. इतक्या उड्या मारत श्वास सांभाळत सुरात गायचे म्हणजे खाय्चे काम नाही.

इलायझा वाली नटी नवृयावर्चे प्रेम काढून घेते तेव्हाचा तिचा साधा गाउन पण फार सुरेख आहे. मुलगा लहान असतो तेव्हा त्याला एक दोन तीन शिकवते व तो मरतो तेव्हा एक दोन तीन उलट्या क्रमाने. वा वा काय दिग्दर्शन आहे. अश्या जागा जागो जागी विखुरलेल्या आहेत.