कॅलीफॉर्नियाची राजधानी!! हरे राम(आ)

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
<1’

गेल्या रविवारी कॅलीफॉर्नियाच्या राजधानीचे शहर सॅक्रमँटोला गेलो होतो. तिथल्या स्टेट कॅपीटल वास्तूच्या प्रांगणात मॅरेथॉनच्या शेवटचा टप्पा होता. त्यामुळे सर्व स्पर्धक तिथे येऊन पदकं, खाऊ, मिळालेल्या भेटवस्तू यांचा स्विकार करून विश्रांती घेत होते. त्यांच्या मनोरंजनासाठी एक बँडदेखील होता. ते कुठलं गाणं गात होते ते या व्हीडीयोमध्ये पहा :) व्हिडीयो Iphone 4S ने घेतला आहे.

व्हिडीयो दिसत नसल्यास या दुव्यावर पहा: http://www.youtube.com/watch?v=lJW_TN9rPNk

विषय: 
प्रकार: 

कॅलिफोर्नियाला आता जीझस, महम्मद कुणीच वाचवू शकणार नाही, तिथे हरे राम, कृष्णच पाहिजेत!! असे आपले त्यांना वाटते.
जाउ दे मी त्याला चुकीचा किनारा म्हणतो, यातच सर्व काही आले!

Biggrin आता काय म्हनावं यान्ला!!!! राम-किस्नालाही आंग्लाळलं की!

मागे ओसीबीसावाल्यांनी 'रघुपती राघव राजाराम' खास उच्चारात म्हटलेलं आठवलं.
इथे बघा : http://www.youtube.com/watch?v=VLbk5AluQE0

आहाहा....अप्रतिम !!

अवघेचि लाभ होति या कीर्तने | नामसंकीर्तने गोविंदाच्या ||

तुकारामांच्या काळात चिपळ्या अन तंबोरा होता ...आज गिटार अन ड्रम्स आहेत ...बस्स इतकेच

|| नाम घेता उठाउठी | होय संसाराची तुटी | होय संसाराची तुटी ||
ऐसा लाभ बांधा गाठी | पडे हरिचरणे मिठी | पडे हरिचरणे मिठी ||
हाकारोनि सांगे तुका | नाम घेता राहो नका | नाम घेता राहो नका ||

हरे रामा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे !!

मस्त!

बर्कलेच्या इस्कॉन टेंपल मधे अनेकांना हरे राम हरे कृष्णा करताना पाहिले होते.
याशिवाय गिलरॉय जवळच्या हनुमान टेंपल मधे मुख्य पुजारी हे गोरे आहेत असे ऐकले.
नापाजवळ श्रीमां टेंपल मधील गोरा पुजारी संस्कृत मधील मंत्र खणखणीत आवाजात म्हणत होता.

तुम्ही रॉक भजन नावाचा प्रकार ऐकलाय का? आंग्लाळलेल्या चालीवर हरे राम हरे कृष्ण म्हणत रहायचं हे वरती आहे तसच. एका श्री श्री वाल्याने घरी दिवाळी फराळाला असे सांगून बोलावले आणि ही असली भजने ऐकवून पकवलं होतं. वर फराळ पण दिला नाही. Proud

हात तिच्या!
अहो
हिक्डं इंड्यात कोंत्यापन लोकल गाण्याच्या चालीवर आर्त्या अन भजनं बन्तात
कोन्त्या जगात र्‍हाता राव तुमी!

भजनांचा फराळ असेल Happy

एकदा बंगाली माणसाने "भोजनको आना" म्हणजे भजनाला या हे तेथे गेल्यावर कळलं. Happy