नीला आसमा सो गया...

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
<1’

आज दिपवाळीनिमित्त भारतीयांना इथे ४:३० वाजता घरी परत जायला अनुमती दिलेली असते. भराभर ओस पडलेल्या कुबीकल्सकडे पाहताना त्यावेळी मी 'नीला आसमा सो गया' हे गाणे ऐकत होतो आणि तो रिकामा क्षण एकदमच काळजावर चरचरत गेला. काही सांगितीक गोष्टी ह्या एकट्यानीच ऐकायच्या असतात त्यापैकी 'नीला आसमा सो गया' हे अमिताभने गायलेले एक गाणे मला फार बरे वाटते. केवढे क्षणभंगूर वाटणारे शब्द आहेत ह्या गाण्याचे आणि अमिताभने ते किती सार्थपणे गायले आहेत.

nila asama1.jpg

मला शास्त्रिय संगीत शिकवणारे शिक्षक एकदा म्हणाले अमिताभ बच्चनने जर शास्त्रिय संगीत शिकले असते तर तो काय असता कुणास ठावूक!!!

विषय: 
प्रकार: 

बी
खरयं! नीला आसमा सो गया.. हे गाणं भन्नाटच आहे.
'हवा का गीत मथ्थम है, समय की चाल भी कम है' हे आपल्यालाही जाणवतं गाणं ऐकताना!

काही सांगितीक गोष्टी ह्या एकट्यानीच ऐकायच्या असतात त्यापैकी 'नीला आसमा सो गया' हे अमिताभने गायलेले एक गाणे...>> अगदी सहमत.
आत्ताच ऐकणार.

फार सुंदर गाणं -- मनाला भिडणारे शब्द आणि तेवढं आर्त संगीत!

नील आसमां सो गया, नीला आसमां सो गया

ओssss.. कोस बरसे रात भीगे होठ थर्रा ये
धडकने कुछ कहना चाहे, कह नहीं पाये
हवा का गीत मथ्थम है, समयकी चाल भी कम है, नीला आसमां......

ओssss.. मेरी बाहोंमें शरमाते लजाते ऐसे तुम आये
के जैसे बादलोंमें चाँद धीरे धीरे आ जाये
ये तनहाई ये मैं और तुम, जमीं भी हो गई गुमसुम, नीला आसमां....

अमीताभ + रेखा + लोधी गार्डनचा परीसर + रोमँटिक रात्र + अमिताभचा खर्जातला अवाज + जावेदचे शब्द + शिवहरीचं संगीत...... हाय !!!!!

क्या याद दिलाया !!!!

मी ७-८ वीत असताना सिलसिला आला होता. ते वेडं वय आणि त्यातला हा रोमँटिझम.... हे गाणं म्हणजे माझ्या रोमँटिझमचा कडेलोट होता....

रच्याकने.... जेंव्हा कॉलेज मधे असताना दिल्लीला गेले होते तेंव्हा उगाचच लोधी गार्डन ला जाउन आले.... उगाचच काही खुणा सापडतात का त्या बघायला.... ह्या गाण्या साठी सिलसिला कीमान २५-३० वेळा पाहिला आहे !!!!

धन्य तो यश चोप्रा.... ह्या गाण्या येवढा रोमँटिझ इतर कुठल्या गाण्यात नंतर त्यालाही देता आला नाही....