शून्य असे मी ओढुनताणुन
नुसता पोकळ रिक्ताकार
पोकळीत कण भरण्यासाठी
कुरतडतो अंतरी विचार
रिक्त भासते परी तिथे मग
राजस तामस तगमग नूतन
कशास पुनरपि रेटा द्यावा
नव्या दमाने प्राणच ओतुन?
शून्य म्हणुनी का व्यर्थ जगावे
का शून्यातच विरूनि जावे
शून्यभावनें राख कुडीची
व्योमाकाशी विखरत जावे?
पण..
क्षुद्र तृणावर सावरलेला
दवबिंदू जणु प्रकाशयात्री
अस्तित्वाचे अगम्य उत्तर
नित्य वसतसे त्याच्या गात्री
काही कामानिमित्ताने भोपाळला जाणे झाले गेल्या तीनचार दिवसात. आज पहाटे निघून उद्या पहाटे परत अशी घाईगर्दीचीच ट्रिप होती. पण तिथल्या संयोजकांच्यामुळे भोपाळचे बहुचर्चित जनजाति संग्रहालय (ट्रायबल म्युझियम) बघता आले. जेमतेम २-३ तास मिळाले. त्यामुळे त्यात तिथली माहिती वाचू की फोटो काढू असे झाले होते.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागातल्या विविध आदिवासी जमातींचे जीवन, कला, समज, धारणा अश्या अनेक गोष्टींचा तिथे समावेश आहे. संग्रहालय म्हणले की आपण आणि वस्तू यामधे एक काचेचा पडदा आणि माहिती लिहिलेला एक ठोकळा असा एक साचा आपल्याला माहिती असतो. हे संग्रहालय या संकल्पनेला छेद देते.
आयुष्य आणि जिंकणं दोणीही
एकमेकास समांतर रेषे प्रमाणे असावे
असं प्रत्येकास वाटत .
म्हणजेच त्या रेषा मध्ये सुखाची हवा खेळती राहील .
पण नेहमीच रेषा समांतर राहतील असं नाही
एखादा प्रसंग असा येतो, रेषा एकमेकांना विभागतात
मग , विभागणाच्या बिंदू वर कधी कमी तर कधी जास्त काळासाठी दुःखाची आहट लागते.
या प्रसंगात माणसाला धीर देणार व मार्गदर्शन करणार लाभतो गुरु तो कोणत्याहि रुपात असू शकतो...
या वळणावर मार्गदर्शक गुरुजन रेषांचे खेळ बरोबर करावयास मदत करतात .
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#दीव
पाहताक्षणीच आवडला म्हणून हा ट्रक घेतला होता. पण गेली कित्येक वर्षं नुसता पडून आहे. कारण त्यात कुठला फोटो लावू शकतो तेच कळत नाहीये!
घरातल्या व्यक्तिचा फोटो लावला तर ती ट्रक ड्रायव्हर झाली आहे असं वाटतं!
फुलंपानं, नेचर सीन्स, देखावे याच्यात विसंगत वाटतात.
'बुरी नजर वाले' किंवा हॉर्न ओके प्लीज वगैरे कॉमेडी डायलॉग नकोय!
कृपया या ट्रकची कूस उजवा.
किंवा फोटो फ्रेम म्हणून नाही तर आणखी कशा प्रकारे वापरता येईल?

मी काल एक मराठी विनोदी नाटक बघितले, या नाटकामध्ये टीव्हीवर येणारे प्रसिद्ध कलाकार आहेत, हे नाटक बऱ्यापैकी हाउसफ़ुल्ल होते, प्रेक्षक सर्व वयोगटातले होते. पण या नाटकातला सत्तर ते ऐंशी टक्के विनोद व्यक्तीचा रंग, अंगकाठी आणि बाह्य स्वरूप यावरच होता, या विनोदावर थिएटर मधले सगळेच हसत, दाद देत होते, माझ्या शेजारी एक शाळकरी मुलगा त्याच्या आईवडीलांबरोबर आला होता, त्याला ही हे विनोद आवडत होते. आपण जर अजूनही व्यक्तीचा रंग, अंगकाठी, बाह्य स्वरूप यावरच विनोद करत असू, हसत असू, दाद देत असू तर हे दुर्देवी आहे का?