व्यक्तीचा रंग, अंगकाठी, बाह्य स्वरूप यावर विनोद योग्य आहे का?

Submitted by अनुश्री_ on 13 August, 2018 - 09:51

मी काल एक मराठी विनोदी नाटक बघितले, या नाटकामध्ये टीव्हीवर येणारे प्रसिद्ध कलाकार आहेत, हे नाटक बऱ्यापैकी हाउसफ़ुल्ल होते, प्रेक्षक सर्व वयोगटातले होते. पण या नाटकातला सत्तर ते ऐंशी टक्के विनोद व्यक्तीचा रंग, अंगकाठी आणि बाह्य स्वरूप यावरच होता, या विनोदावर थिएटर मधले सगळेच हसत, दाद देत होते, माझ्या शेजारी एक शाळकरी मुलगा त्याच्या आईवडीलांबरोबर आला होता, त्याला ही हे विनोद आवडत होते. आपण जर अजूनही व्यक्तीचा रंग, अंगकाठी, बाह्य स्वरूप यावरच विनोद करत असू, हसत असू, दाद देत असू तर हे दुर्देवी आहे का?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणसांना त्यांच्या रंगावरून बोललेले रेसिस्ट असते म्हणे. >> हो आणि नाही दोन्ही. आधी म्हणालो तसे कंटेक्स्ट महत्वाचा.>>>

Ok. संदर्भ महत्वाचा आहेच. हिनवण्यासाठी काळे म्हणणे व ब्लॅक ब्युटी म्हणणे यात फरक आहेच.

हो आहे !! जर तो विनोद स्वतः च स्वतः वर केला असेल तर
>>>
हे शाहरूख नेहमी करतो. तो मला आवडायचे हे एक कारण आहे. मी सुद्धा हे जमेल तितके करतो. स्वतःच्या व्यंगावर वा कमतरतेची टिंगल उडवायला भयानक कॉन्फिडन्स लागतो Happy

_/\_
आता माझा धाग्याला रामराम

तोतरेपणावर कॉमेडी करणे सुद्धा चुकीचे आहे. पण आपल्याकडे सवयीने तो इतका ट्रेंड झालाय कि कुणाला त्यात काय वावगे वाटतच नाही.

तुषार कपूरचे अख्खे करियर तोतरे बोलून केलेल्या कॉमेडीवर झाले.

रसेल पीटर्स सारखा जागतिक कीर्तीचा स्टॅण्डप कोमेडिअन रेशिअल स्टीरिओटाईप वापरूनच विनोद करतो. यात स्वभाववैशिष्टे (कंजूस पणा, नियम तोडणे इ.) बरोबरच शारीरिक फीचर्स (डोळे, नाक, लिंग यांचा आकार, बहिरेपणा इ.) वर विनोद केलेले असतात.
मला तरी अशा विनोदात काही वावगं वाटत नाही

मला तुषार कपूर चे मुके पात्र आवडलेय. क्युट आहे.आणि प्रत्यक्ष व्यंगावर बोचरा वाटला नाही विनोद.अर्थात इतर कोणाला ओफेंडिंग वाटला असल्यास माहीत नाही.
त्याच्या करियर मध्ये गोलमाल सीरीज आणि मुझे कुछ कहना है चा रोल त्याने पोटंशियल ने केलाय असे मत.

विल & ग्रेसमध्ये ग्रेस ज्यू आहे, आणि त्यात ज्यू लोकांवर विनोद आहेत.
Oh you’re jewish”

“How do you know!?”

“Cheap underwear!”

हे आपल्याकडच्या कंजूष मारवाड्यांवरच्या आणि बिनडोक सरदारजींवरच्या जोक्स सारखं झालं.

भिनलैंगिकांवर आहेतच.
पण ते ऑफेन्सिव्ह वाटलेले नाहीत. त्या त्या लोकांना वाटलेत का कल्पना नाही.

आमच्या गावी शेतातील मुकादमाची बायको मूकी व बहिरी होती. तिचे नावच बहिरी असे पडले होते. तिची मुले पण तिला बहिरी असेच हाक मारी. आमच्या कडे सोमवारी गावचा बाजार असे. गड्यांचे आठवडी पगारही त्याच दिवशी व्हायचे.. त्यातही तिची नोंद सौ बहिराबाई अशी आजोबा व त्यानंतर वडीलही करीत. यात कुणालाच काही गैर वाटत नसे.

>> यात कुणालाच काही गैर वाटत नसे.

हो. पूर्वी असे सर्रास चालायचे. शाळेत वर्गात काळ्या, लंगड्या, चकण्या, कैण्या, लुल्ल्या, लांबड्या, चपण्या अशा नावांनी बोलवले जात होते व त्याचे कुणालाच काही वाटत नसे.

1) इतरांच्या व्यंगावर विनोद करणं हें बहुतेक षेळां विनोदबुद्धीच उथळ असलयाचंच लक्षण असूं शकतं ;
2) स्वतःवर विनोद करणं आत्मविश्वासाचच नव्हे तर प्रगल्भतेचंही लक्षण असावं;
3) सोशल मिडीयामुळे विनोदबुद्धीला चालनाच मिळाली आहे, असंही माझं वैयक्तीक मत

4) 'The first black President' हा निशचितच व्यंगावरचा विनोद नाहीच. 'Now White House will be a Black House' , हा व्यंगावरचा घाणेरडा विनोद होवूं शकतो.

रसेल पीटर्सची स्टँड अप कॉमेडी, जोक्स ऑफेन्सिव वाटले नाहीत कधी पण आता तेच तेच ऐकण्याचा कंटाळा आला आहे नी बघणं सोडलं आहे.

काँमेडी नाटकामध्ये जास्तितजास्त विनोद ह्याच्यावरच आधारित असतात.
कधी सुधारतील हे लोक God knows

We are indeed a society full of prejudice and bias !

'जाडी बाई धपकन पडली' असे नुसते ऐकूनही खदखदून हसू येणारे बघितले आहेत. काळ्या रंगावरून, बऱ्या-वाईट दिसण्यावरून, बारीक-जाड शरीरावरुन शेरेबाजी इतकी कॉमन आहे की त्यात काही चुकीचे आहे असे पण अनेकांना वाटत नाही. दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नये हे फक्त पुस्तकात Happy

टोकाचे शारीर विनोद आणि पुरुषांनी ओंगळ स्त्री वेष घेतल्याशिवाय 'विनोदी' काही घडू शकत नसल्याचा ठाम विश्वास नाटक-सिनेमा-मालिकांमध्ये Sad

१) सुशिक्षित व्यक्तींना असा प्रश्न पडू नये खरे तर. अशा विनोदावर हसणे योग्य नाही हे एकच उत्तर आहे.
२) दुस-यांच्या हसण्याला आपण आक्षेप घेऊ शकत नाही. मॅनर्स ठाऊक नसल्याचा आणि एक्स्प्रेस कसे व्हावे या माहितीच्या अभावी असे घडते. ते समर्थन नाही.
३) मात्र हसणारी व्यक्ती त्याच्या व्यंगाबद्दल असंवेशनशील असते असे नाही. अनेकदा अशा व्यंग असलेल्या व्य्कतींना जेव्हां आवश्यकता पडते तेव्हां अशीच मंडळी त्यांना डॉक्टरांकडे / घरी पोहोचविणे अशी कामे विनामूल्य करत असतात. अशा प्रसंगी मॅनर्स असणे अथवा नसणे याचा संबंध येत नाही.

तुम्हाला शाहरुख म्हणायचंय का.. क क क क किरण...
>>>>>>

शाहरूख तोतरा नसून त्याने ते पात्र साकारले होते. तेच एक पकडून जो तो त्याची थर्डक्लास मिमिक्री करतो. नेहमी नेहमी तेच बोअर होते त्याची मिमिक्री बघून मला. काही वेगळे करायचा प्रकारच नाही.

त्याच्या करियर मध्ये गोलमाल सीरीज आणि मुझे कुछ कहना है चा रोल त्याने पोटंशियल ने केलाय असे मत.
>>>>
तुषारसाठी गोलमाल आणि उदय चोप्रासाठी धूम या रोजगार हमी योजना आहेत.

हो. पूर्वी असे सर्रास चालायचे. शाळेत वर्गात काळ्या, लंगड्या, चकण्या, कैण्या, लुल्ल्या, लांबड्या, चपण्या अशा नावांनी बोलवले जात होते व त्याचे कुणालाच काही वाटत नसे.
>>>
ईथे लिहू नयेत अश्या एकेक नावांवरून चिडवले जायचे.
माझेच घ्या, लहानपणी मी एकदा महिन्याभरासाठी खूप आजारी पडलेलो, तब्येत पुर्ण उतरलेली. त्यावरून मला मुडदूस हे नाव पडलेले. पुढे दोन चार महिन्यात ठणठणीत झालो. पण नाव दोनचार वर्षे चालू राहिले.

माझ्या ओळखीत दोन जुळे आहेत, एक थोडा उजळ व दुसरा थोडा काळा. त्यांना भुऱ्या व काळ्या ही नावे जन्मदात्यांनीच ठेवली. कागदोपत्री ते अनिल सुनील आहेत. आता त्यांना मुले झाली तरी ते भुऱ्या व काळ्या आहेत.

मुझे कुछ कहेना मध्ये घाणेरडी ओव्हरअकटिंग आहे तुषार ची.
>>>>>>>>>
घाणेरड्या ओव्हरअकटिंग वरून आठवलं तो कुठला चित्रपट शाखा चा ज्यात तो मुका असतो आणि अमरीश पुरी आणि माधुरी दीक्षित असते?

जबराट हिडीस होता

माझ्या ओळखीत दोन जुळे आहेत, एक थोडा उजळ व दुसरा थोडा काळा. त्यांना भुऱ्या व काळ्या ही नावे जन्मदात्यांनीच ठेवली. >>> ह्यावरून आठवलं. सौ. एकदा सायन हॉस्पिटलमध्ये गेली असता तिथे एका हिंदी भाषिक बाईने आपल्या दोन जुळ्या (बाळ) मुलींना लस टोचण्याकरिता आणले होते. त्यातील पहिली मुलगी अगदी काळी होती तर दुसरीसुद्धा काळीच पण पहिलीपेक्षा थोडीशी उजळ होती. त्यांची तिने नांवे सांगितली. पहिलीचं नांव 'काली' तर दुसरीचं नांव 'कालीगोरी'. कारण दुसरी पहिलीपेक्षा थोडीशी गोरी होती.

हो, तोच

कोळशाने भिंतीवर रेघोट्या मारल्यावर कसा आवाज येईल तसा आवाज अमरिशपुरीला दिल्यामुळे ते नाव दिले असावे

घाणेरड्या ओव्हरअकटिंग वरून आठवलं तो कुठला चित्रपट शाखा चा ज्यात तो मुका असतो आणि अमरीश पुरी आणि माधुरी दीक्षित असते?
कोळशाने भिंतीवर रेघोट्या मारल्यावर कसा आवाज येईल तसा आवाज अमरिशपुरीला दिल्यामुळे ते नाव दिले असावे
>>>>>

या दोन वाक्यांनी कनफ्यूज केलेय. नक्की कोणाची ओवरऎक्टींग होती? शाहरूख की अमरीश पुरी?
अमरीश पुरी येस्स. आचरट कॅरेक्टर, गेट अप आणि संवाद होते त्याचे.
कोयला नाव मात्र शाहरूखच्या तोंडात कोळसा टाकल्याने तो मुका बनतो यावरून होते.

त्यांना भुऱ्या व काळ्या ही नावे जन्मदात्यांनीच ठेवली. कागदोपत्री ते अनिल सुनील आहेत.
>>>>>>>>

अनिल सुनील सुद्धा तशी ओल्ड फॅशनच नावे आहेत.
आपल्याकडे मुलांना साधारण आठ दहा वर्षांचे झाले की आपले नाव बदलायची संधी द्यायला हवी.
मुलींना लग्नानंतर ती संधी मिळते, पण मुलांना मात्र आपले नाव आवडो न आवडो आयुष्यभर तेच सोबत घ्यावे लागते.
जसे की बाबा असतात सचिन तेंडुलकरचे फॅन, म्हणून मुलाला उगाच त्यावरून ठेवलेले सचिन हे जुने आणि टिपिकल नाव आयुष्यभर वाहावे लागते.

येनीवेज, भुन्या काळ्यावरून आठवले.
माझ्या मित्राच्या बाबांचे नाव दगडू आहे. काय तर त्यांच्या जन्माआधी दोन बाळ दगावले. हे नंतर झाले. ते सुद्धा जाउ नये म्हणून दगडू, धोंडू अशी नावे ठेवा ही अंधश्रधा