जनजाति संग्रहालय, भोपाळ

Submitted by नीधप on 1 October, 2018 - 02:23

काही कामानिमित्ताने भोपाळला जाणे झाले गेल्या तीनचार दिवसात. आज पहाटे निघून उद्या पहाटे परत अशी घाईगर्दीचीच ट्रिप होती. पण तिथल्या संयोजकांच्यामुळे भोपाळचे बहुचर्चित जनजाति संग्रहालय (ट्रायबल म्युझियम) बघता आले. जेमतेम २-३ तास मिळाले. त्यामुळे त्यात तिथली माहिती वाचू की फोटो काढू असे झाले होते.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागातल्या विविध आदिवासी जमातींचे जीवन, कला, समज, धारणा अश्या अनेक गोष्टींचा तिथे समावेश आहे. संग्रहालय म्हणले की आपण आणि वस्तू यामधे एक काचेचा पडदा आणि माहिती लिहिलेला एक ठोकळा असा एक साचा आपल्याला माहिती असतो. हे संग्रहालय या संकल्पनेला छेद देते.
विविध आदिवासी जमातींच्या घरांची रचना, वातावरण याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल अश्या प्रकारे इथली रचना केलेली आहे. त्यामुळे एखाद्या झोपडीतून आपण फिरून येऊ शकतो. लग्नासाठी केलेल्या मंडपामधे वर्‍हाडी म्हणून उभे राहू शकतो, आदिवासी जमातींच्या कल्पनेतले देव, दानव आणि इतर सृष्टी यातून फेरफटका मारू शकतो.
यातल्या वस्तू, जागा वगैरे सर्वच गोष्टी त्या त्या जमातीतील पारंपरिक काम करणार्‍या कलाकारांकरवी पारंपरिक वस्तू वापरून आणि त्या त्या गोष्टीच्या पूर्ण सांग्रसंगीत रिवाजांनुसार बनवून घेतलेल्या आहेत.
या संग्रहालयातले काही फोटो दाखवते आहे. फोटोंच्या बरोबर माहिती वगैरे फारशी देत नाही कारण ती माझीच पाठ झालेली नाही. Happy

संग्रहालयाच्या प्रवेशद्वारापाशी
entrance.jpg

साधीशीच खिडकी तिची भिंत सजवलेली
TM02.jpg

निळ्या आभाळाखाली? नाही.. संग्रहालयाच्या दालनातच.
TM01.jpgTM03.jpgTM09.jpg

सुंदर सजवलेली भिंत
TM04.jpg

अशीच गंमत
TM08.jpg

आदिवासी जीवन, धारणा आणि कडे
TM05.jpg

जीवन धारणा आणि कडे वगैरे असले तरी मला वेस अ‍ॅण्डरसनच्या सिनेमात असल्यासारखंच वाटलं इथे.
TM09.jpg

भिऊ नको मी तुझ्या पाठिशी आहे! Happy
TM06.jpg

कवट्या?
TM11.jpg

भू...त आलं!
TM12.jpg

देवाच्या उत्सवाच्या रथाचे लाकडी चाक
ITM12.jpg

काथ्या, सुतळी आणि गोणपाटाची मुले..
TM13.jpgTM17.jpgTM14.jpgTM15.jpg

असाच एक अवकाश
TM10.jpg

मुखवटे
TM16.jpg

एक जागा.. महुआ के पेड के तले!
TM18.jpg

गोंड कलाकार चित्रनिर्मिती करताना
TM19.jpg

भोपाळला भेट दिलीत तर नक्की जा. किमान ३-४ तासांचा वेळ ठेवून जा. अजून बर्‍याच ओपन स्पेसेस पण आहेत फोटोग्राफीयोग्य पण मी गेले होते तेव्हा टळटळीत दुपार होती त्यामुळे अर्थातच ते फोटो वाईट आलेत. तर फोटोग्राफीची खुमखुमी असेल तर बाकी सगळे म्युझियम ४ - ४:३० पर्यंत पाहून घेऊन मग ओपन स्पेसेसचे फोटो काढायला जा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच आहेत फोटो! Happy
आणि मला वाटलं नव्हतं भोपाळ सारख्या ठिकाणी एव्हढं सुरेख रित्या मेन्टेन केलेलं म्युझीयम असेल असं.

थँक्यू सगळे!
गेलात भोपाळला तर नक्की जा. वेळ काढून जा.
हर्पेन, माझी पहिली ट्रिप होती भोपाळला. हे म्युझियम आणि भारत भवन अशी धावती ट्रिप केली. एका दिवसात एवढं कळलं की अजून बरंच भारी भारी आहे भोपाळमधे. परत जाणे नक्कीच आहे आता अजेंड्यावर.

सशल, हो. खरंय.

सुंदर आहेत सगळ्या कलाकृती.
तो कवट्याचा? फोटो पाहुन हॅरीमधली एक फ्रेम आली डोळ्यांसमोर.
ते छोट बसलेले मुल आहे ते ही छान.

छान फोटो. मुझियम पहाण्याची उत्सुकता निर्माण झाली. Happy

भोपाळ शहर पण फार सुंदर आहे. गेल्या वेळेस गेलो होतो तेंव्हा पुण्याहून तिकडे शिफ्ट होता आले तर बरे असे वाटले. Happy

एका दिवसात एवढं कळलं की अजून बरंच भारी भारी आहे भोपाळमधे.
>>>> हो खूप भारी काय काय आहे भोपाळमधे

परत जाणे नक्कीच आहे आता अजेंड्यावर. >>> मी पण एकदाच आणि असाच दोन दिवसांकरता गेलो होतो मलाही परत एकदा जायचंय

विकीकाकांसारखं मलाही भोपाळला शिफ्ट व्हावं असं झालं होतं पण मला असं अनेक ठिकाणी होते Proud

अंकु, कवट्या नाहीयेत त्या. पण दिसतेय की नाही कवट्यांची रास?
ती मातीची भांडी आहेत. विचित्र आकाराची. त्या दालनाचे नावच देवलोक असे आहे.

मलाही भोपाळला शिफ्ट व्हावं असं झालं होतं पण मला असं अनेक ठिकाणी होते<<
मला शिफ्ट व्हावेसे वाटलेल्या इतक्या जागा आहेत. मी होईनही कुठेतरी शिफ्ट मुंबईतून. माहिती नाही. पण लिखाण करताना एकेका नायिकेला त्या एकेका ठिकाणी शिफ्ट करून टाकायचं असं ठरवलंय. बघू कधी जमतंय. Happy

अंकु, कवट्या नाहीयेत त्या. पण दिसतेय की नाही कवट्यांची रास?>>>>कळले गो.तु फोटोचे नाव तसे दिले म्हणुन प्रश्नचिन्हासहित मी ही तसेच लिहले.