"स्वातीचे जलबिंदू"

Submitted by चंद्रमा on 25 May, 2021 - 15:18

पुन्हा बरसल्या स्वातीच्या सरी,
जलबिंदू झाले निर्माण!
किमया त्यांची शिंपल्यामध्ये;
शिरुन झाली मोत्यांची खाण!!

युगानुयुगे हा खेळ जलबिंदूचा,
नाही कळला कधी जीवाला!
निसर्गाचे हे कालचक्र;
घेई गिरकी क्षणाक्षणाला!!

आसमंतात रचला खेळ,
झालो आनंदाच्या लाटांवर स्वार!
मागोवा घेती सुख-दु:खाचा;
अन् उघडती आठवणींचे द्वार!!

नव्हतीच कधी अपेक्षा स्वप्नांची,
तरी का करीतो पाठलाग!
ही तर रीत जगण्याची;
फक्त वेड्या मनाला यावी जाग!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद रुपाली!
खरंतर या कवितेचं मर्म फार कमी मायबोलीकरांना कळलं!
आपण आपल्या प्रतिसादाने मन प्रफुल्लित केलं!