"महाकारूणिक बुद्ध!"

Submitted by चंद्रमा on 26 May, 2021 - 10:51

माझ्या शब्दांमध्ये नाही इतके सामर्थ्य
की मी गावी 'गौतमाची' महती!
यत्न हा दिशा मिळावी पांथस्थाला;
कळावी जगण्याची गूढ नीती!!

जेव्हा दुःख जाणवले गौतमाला,
मुक्ती मार्गाची लागली चाहूल!
शोधण्यास ते सत्य निघाले;
त्यागिले त्यांनी यशोधरा अन् तान्हा राहुल!!

दुःख-मुक्ती मिळावी संसाराला,
हा एकच होता त्यांचा ध्यास!
दमन व्हावे दु:ख-तृष्णेचे;
दरवळावा शांती अहिंसेचा सुवास!!

गूढ उकलले या मर्मबंधाचे,
बोधिवृक्षाखाली बुद्ध झाले निर्माण!
दिपवून टाकला समस्त संसार;
उजळल्या दाही दिशा झाल्या गतिमान!!

नीरव शांततेची ती मूर्ती,
दयेचा तो महासागर!
वंदन करीतो त्या गौतमाला;
भरली ज्याने सुखाची घागर!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

nice