१६ वर्षात जे कमावले ते जवळ-जवळ सर्व पुरंदरच्या तहात राजांनी गमावले होते. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. नोव्हेंबर १६६६ मध्ये आग्र्याहून स्वतःची सुटका करून परत आल्यावर शिवरायांनी औरंगजेबाच्या दख्खन सुभेदाराला म्हणजे शहजादा मुअझ्झम याला 'आपण झालेला तह मोडणार नाही' असे पत्र लिहून स्पष्ट कळवले होते. ह्या मागचे राजकारण साधे सरळ होते. लढण्याची ताकद पुन्हा एकदा निर्माण करायला काही अवधी जावा लागणारच होता.
जलदुर्ग खांदेरी... समुद्री मार्गाने मुंबईच्या मुखाशी असणारा एक अत्यंत महत्वाचा असा जलदुर्ग शिवरायांनी राजापुरी येथील सिद्दी आणि मुंबई मधील इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारला.
उदिष्ट्ये होती २ . एक म्हणजे सिद्दीला जमिनीपाठोपाठ आता समुद्री मार्गाने सुद्धा कोंडीत पकडायचे आणि मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखायचे. तसेच दुसरे म्हणजे थेट मुंबई वर तलवारीचे टोक ठेवायचे. इंग्रजांना धाकात ठेवायचे. मराठ्यांनी इंग्रजांशी केलेल्या राजकारणाचा हा एक मोठा भाग होता.
पाहूया काही महत्वाच्या घडामोडी ज्या सप्टेंबर महिन्यातल्या होत्या...
संदर्भ ग्रंथ - 'सह्याद्री' - स. आ. जोगळेकर.
सम्भाजी राजे.
.
लहानपण
संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
तसे लहानपणापासुनच अवकाश आणि परग्रहवासी यांचे मला प्रचंड आकर्षण, पृथ्वीचि निर्मिती ,मनुष्याचा जन्म, सजीवस्रुष्टी, एक ना विविध प्रश्न आणि तितकेच जबरदस्त कुतूहल. त्यामुळे डिस्कवरी चॅनल वर पुरातन शास्त्र किंवा मध्यंतरी सुरु असलेली डर्विन वरची मालिका अशा विषयांवर अजुन विचार करायला भाग पाडते पण मनासारखे ऊत्तर नाहि मिळाले की चुकचुकल्यासारखे वाटत राहते..... असेच माहिती मिळवत असताना एक दिवस एक अफलातुन पुस्तक हाती लागले... डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे "पृथ्विवर माणुस ऊपराच".
१० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या अफझलखान वधाने हादरलेल्या आदिलशहाने दुप्पट मोठी फौज देऊन 'रुस्तुम-ए-जमा' याला पुन्हा मराठ्यांवर हल्ला करायला धाडले. त्याच्यासोबत होता बापाच्या वधाचा सूड उगवायला आलेला अफझलखानाचा मुलगा 'फाझलखान'. ह्या प्रचंड फौजेचा शिवरायांच्या नेतृत्वखाली पराभव करत मराठ्यांनी कोल्हापूर पावेतो मजल मारली आणि आदिलशाहीचा सर्वात बळकट असा 'पन्हाळगड' काबीज केला. खुद्द राजे मिरजेच्या किल्ल्याभोवती वेढा टाकून बसले. आता स्थिती अजून हाताबाहेर जायच्या आधी आदिलशहाने 'सिद्दी जोहर'ला त्याहूनही अधिक फौज देऊन मराठ्यांवर पाठवले.
आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख...

१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले.