जलदुर्ग खांदेरी ...

Submitted by सेनापती... on 9 October, 2010 - 15:34

जलदुर्ग खांदेरी... समुद्री मार्गाने मुंबईच्या मुखाशी असणारा एक अत्यंत महत्वाचा असा जलदुर्ग शिवरायांनी राजापुरी येथील सिद्दी आणि मुंबई मधील इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारला.

उदिष्ट्ये होती २ . एक म्हणजे सिद्दीला जमिनीपाठोपाठ आता समुद्री मार्गाने सुद्धा कोंडीत पकडायचे आणि मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखायचे. तसेच दुसरे म्हणजे थेट मुंबई वर तलवारीचे टोक ठेवायचे. इंग्रजांना धाकात ठेवायचे. मराठ्यांनी इंग्रजांशी केलेल्या राजकारणाचा हा एक मोठा भाग होता.

पाहूया काही महत्वाच्या घडामोडी ज्या सप्टेंबर महिन्यातल्या होत्या...

२८ नोव्हेंबर १६७० रोजी ३००० फ़ौज सोबत घेउन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची शिवरायांकडून ३ दिवस पाहणी झाली होती. खांदेरी बेत पूर्णपणे ताब्यात घेऊन पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरू झाली.

९ सप्टेंबर १६७१ - इंग्रजांच्या मुंबई येथील गवर्नरने त्याच्या साहेबाला शिवरायासंदर्भात पत्र लिहीले. पत्रात तो म्हणतो,"शिवाजीच्या हाती खांदेरी असणे म्हणजे मुंबईवर टांगती तलवार आहे."
"khanderi in the hands of shivaji is a dagger pointed at the heart" (Mumbai)"

७ सप्टेंबर१६७९ - सिद्दी आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यान्नी खांदेरी भोवती १ मी. उंचीचा तट उभारून पूर्ण केला.

११ सप्टेंबर१६७९ - दर्यासारंग दौलतखान कुमक घेउन इंग्रजांबरोबरच्या लढाईसाठी माईनाक भंडारीच्या मदतीला खांदेरी येथे पोचला. इंग्रजांची 'हंटर', 'रिवेंज' आणि इतर ३ लढाउ जहाजे खांदेरीला वेढा टाकून उभी होती. दौलतखानाने इंग्रज अधिकारी 'केग्विन'चा पाडाव केला, माईनाक भंडारीला रसद पोचती केली आणि 'नागाव'ला पुन्हा रसद घेण्यासाठी परत गेला.

७ सप्टेंबर १८१४ - दुसऱ्या बाजीरावने पांडुरंग कोल्हटकर मार्फ़त 'उंदेरी - खांदेरी'चा ताबा पुन्हा मिळवला.

शिवरायांनी खांदेरीच्या बांधणीपासून ते आंग्र्यांनी इंग्रजांना पाणी पाजेपर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी खांदेरी बाबत घडल्या. त्या संदर्भात एक विस्तृत पोस्ट मी लवकरच लिहेन...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवरायांनी खांदेरीच्या बांधणीपासून ते आंग्र्यांनी इंग्रजांना पाणी पाजेपर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी खांदेरी बाबत घडल्या. त्या संदर्भात एक विस्तृत पोस्ट मी लवकरच लिहेन...>> नक्कीच आवडेल वाचायला... :उत्सुकतेने वाट बघणारी बाहुली:

खांदेरीबद्दल खूप कुतूहल आहे. आता फक्त वादळात सांपडलेल्या मच्छीमार होड्यांच्या संदर्भातच खांदेरीचं नांव वाचनात येतं. तुमच्या विस्तृत पोस्टबरोबर फोटो असणारच ! वाट पहातोय.

नक्कीच... आजच्या लोकसत्तामध्ये आलेली बातमी वाचा...

'शिवछत्रपतींच्या आरमाराविषयीची यथार्थ कल्पना देणारा ‘शिवछत्रपतींचे आरमार’ हा ग्रंथ १६ ऑक्टोबरला प्रसिद्ध होतो आहे..'

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106...

भाऊ... अजून तरी मी स्वतः खांदेरीला गेलेलो नाही... Sad तेंव्हा फोटो नाहीत... लिखाण मात्र नक्की येईल... Happy

अजून तरी मी स्वतः खांदेरीला गेलेलो नाही... >> पक्क्या मी सुद्धा गेलेलो नाहीये.. खांदेरी-उंदेरी इथे जाण्यात आता परवानगी काढावी लागते.. तसेच तेवढा परिसर दाखवण्यास बोटवाले अव्वाच्या सव्वा भाव सांगतात.. त्यामुळे तिथे जाणे फार दुर्मिळ झाले आहे.. नेटवरही सध्या वर्तमानकाळात कोणी गेलेल्याचे वाचनात आलेले नाहीये..

बाकी मित्रा लिहीत रहा.. आम्ही वाचण्यास उत्सुक आहोत.. Happy

शिवरायांनी खांदेरीच्या बांधणीपासून ते आंग्र्यांनी इंग्रजांना पाणी पाजेपर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी खांदेरी बाबत घडल्या. त्या संदर्भात एक विस्तृत पोस्ट मी लवकरच लिहेन...>> नक्कीच आवडेल वाचायला...
अनुमोदन !
Happy

होय रे योगेश... तिकडे जायचे म्हणजे बरीच नाटके आहेत... कोणी आहे का ओळखीचा असा जो परवानगी काढू शकतो... मी पण बरेच महिने झाले तिकडे जायची संधी शोधतोय. मागे एकदा निनाद बेडेकर यांच्याबरोबर तिकडे जायची संधीहुकली होती.

अरे रोहन.. मी बराच प्रयत्न केलाय.. नि अजून सुरु आहे.. बघू.. तिकडे कोणाची तरी ओळख निघायला हवी.. तर काम सोप्पे होईल आपले... आपण जाऊ नक्की... ! (जल्ला कुठ कुठ जायचं बाकी आहे..)

जल्ला कुठ कुठ जायचं बाकी आहे..

>>>>> जल्ला एवढी मोठी यादी तर पंचवार्षिक योजना करणाऱ्यांची पण नसेल... Lol

कोणी आहे का ओळखीचा असा जो परवानगी काढू<< अरे इतकेही अवघड नाहीये तिथे जाणे. फक्त भरती ओहोटी च्या वेळा संभाळाव्या लागतात.
जिएस बरोबर मी पण गेलो होतो, तेव्हा तिथे किनार्‍यावरिल ऑफिस मधून परवानगी घेतली होती. थळ येथे सकाळी लवकर जाऊन पोहोचावे लागेल.

Done Happy

मी सुद्धा, पण सर्वांना माझ्या वाढदिवसानिमित्त ट्रेकला येताना केक व भेटवस्तु घेउन याव्या लागतील... आहे कबुल....

जाणार तूम्ही लोक, आणि उत्सुकता मला !!
खांदेरी आणि उंदेरी अशी जोड नावे घेतात ना नेहमी ?

Pages