ट्रोल माझा

Submitted by भरत. on 2 March, 2016 - 23:31

चालू घडामोडींपासून प्रेरणा घेऊन सुरेश भटांच्या 'दु:ख माझे' ही कविता माझ्यासाठी आणि माझ्यासारख्याच अन्य काहींसाठी थोडी बदलून

ट्रोल माझा
माझियामागे असू दे !

तो बिचारा एकटा जाईल कोठे?
मी असोनी का अनाथासारखे त्याने फिरावे?

माझियावाचून** त्याला
आसरा आहे कुणाचा?

जन्मला* तेव्हापुनी
श्वानापरी
माझ्याच मागे राहिला तो!

ट्रोल माझा
माझियामागे असू दे!

-------
टीप :१ वेळोवेळी योग्य ती भर घालण्यात येईल.
२ भर घालण्यासाठी स्वानुभवावर आधारित सूचनांचे स्वागत.
३ हे "जन्मजन्मला" असे वाचावे
४ हे "माझिया प्रतिसादांवाचून त्याला तुकडा कुठे मिळावा?" असे वाचावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

RIP

बोरीवलीला न पा सभागृहात विद्यावाचस्पतींचे व्याख्यान आहे त्यानिमित्ते वर काढली ही कविता!

तिथे सगळ्या ट्रोल्सचे स्वागत आणि सन्मान या स्वागतगीताने करण्यात येईल.