पाकिस्तानला एकत्र करत होता ईस्लाम आणि त्याला तोडत होती विविधता. प्रत्येक प्रांताची संस्कृती वेगळी होती. बरं, भौगोलिक अंतरही पूर्व पाकिस्तान नी पश्चीम पाकिस्तानात बरंच होतं आणी मध्यभागी होता भारत. आता दिल्लीहून ट्रेन पकडून पाकिस्तानी मुत्सद्दी किंवा सैनिक कलकत्ता आणि ढाक्याला कसे जाऊ शकनार होते? मात्र, सामान्य नागरिक भारतीय रेल्वेनेच सीमा ओलांडून पूर्व पाकिस्तानात जात असत. एका पाकिस्तानी माणसाच्या म्हणण्यानुसार, हे खूप महाग पडायचे, नी गरजही नव्हती.व्यापारी ट्रक भारतामार्गेच पाकिस्तानात जात असत.

कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता. आम्ही सगळे जण मग सकाळी लवकरच पुण्याहून अलिबागला निघालो.
पाकिस्तान हा ब्रिटिश भारताचा एक छोटासा भाग होता. डिस्कनेक्ट होताच गाडी पुढे सरकू लागेल, अशी स्वतःची यंत्रणा नव्हती. तिथली अर्थव्यवस्था हिंदूच्या हाती होती जे फाळणीनंतर भारतात आले होते. रावळपिंडी नक्कीच मोठी छावणी होती, पण संपूर्ण सैन्य मुस्लिम सैन्य नव्हते. प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या घेतली तर सुमारे बाराशे अधिकाऱ्यांपैकी शंभर अधिकारी मुस्लिम होते, त्यापैकी वीस जणांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. बाकीच्या अधिकार्यांचे मत बदलण्याआधीच 'ऑपरेशन पाकिस्तान' अंतर्गत ब्रिटिश विमाने दिल्लीला पाठवण्यात आली नी त्यांना ऊचलन्यात आले.
शालेय इतिहासात कोणती घटना घडली, केव्हा आणि कुठे घडली हे शिकवले जाते. पण, एखादी विशिष्ट घटना का घडली, कुठे चूक झाली, हे कमी शिकवलं जातं?
हे विधान ॲडॉल्फ हिटलरने लिहिलेल्या 'माईनकाम्फ' मधील आहे, पण ते अर्थपूर्ण आहे. मी हिटलरला पाकिस्तानच्या इतिहासात असाच आणत नाहीये. तर त्याला मुख्य पात्रांत स्थान देतोय.
दरबार-ए-वतन में जब इक दिन सब जाने वाले जाएँगे
कुछ अपनी सज़ा को पहुँचेंगे, कुछ अपनी जज़ा ले जाएँगे
-फ़ैज अहमद फ़ैज
16 ऑक्टोबर 1951. कंपनी बाग, रावळपिंडी.
त्या दिवशी, लियाकात अली खान एक लाखाच्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मंचावर जात असताना आपल्या समोर संपूर्ण देश जमलेला पाहत होते. जे स्वप्न त्यांनी, मोहम्मद अली जिना, सुहरावर्दी, अल्लामा इक्बाल आणि इतर अनेकांनी एकत्र पाहिले होते. ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी एक पाकिस्तान.
पण पाकिस्तान हा शब्द कसा अस्तित्वात आला?
सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही. पुढच्या काळात या सोहळ्याविषयी कुतुहल वाढत गेलं आणि कधीही न चुकता या सोहळ्याचं फक्त दूरदर्शनवरच थेट प्रसारण पाहण्याचा पायंडा पडला.

Sea Harrier and Ka-25
आज प्रत्येकाला सत्ता हवी आहे, मग तो महासत्ता होऊ पाहणारा एखादा देश असो,वा आपल्याच विचारांचं घोडं नाचवणारा तालिबान सारखा दहशतवादी गट.सत्तेची भूक प्रत्येकाच्याच उदरात उसळलेली आहे.पण क्षणभूंगुर असणारी ही सत्ता सहसा मिळत नाहीच मुळी.ज्यांच्या हाती ती सत्ता आहे त्यांच्याकडून ती हिसकावून घ्यावी लागते.तिच्यासाठी रक्तार्पणाचा महायज्ञ करावा लागतो. या सत्ता ग्रहाणासाठी मग एकच मार्ग उरतो... युद्ध...ज्यामध्ये लाखो निरपराधी लोक हकनाक मारले जातात.युद्ध... जिथे सारं काही माफ असतं, अगदी सामान्य जणांच्या मुंडक्यांचा थर रचण्यापासून ते एखाद्या सात वर्षाच्या कोवळ्या मुलीचं शरीर ओरबडण्यापर्यंत.
भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.