पाकिस्तान-४

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 17 February, 2024 - 07:58

पाकिस्तानला एकत्र करत होता ईस्लाम आणि त्याला तोडत होती विविधता. प्रत्येक प्रांताची संस्कृती वेगळी होती. बरं, भौगोलिक अंतरही पूर्व पाकिस्तान नी पश्चीम पाकिस्तानात बरंच होतं आणी मध्यभागी होता भारत. आता दिल्लीहून ट्रेन पकडून पाकिस्तानी मुत्सद्दी किंवा सैनिक कलकत्ता आणि ढाक्याला कसे जाऊ शकनार होते? मात्र, सामान्य नागरिक भारतीय रेल्वेनेच सीमा ओलांडून पूर्व पाकिस्तानात जात असत. एका पाकिस्तानी माणसाच्या म्हणण्यानुसार, हे खूप महाग पडायचे, नी गरजही नव्हती.व्यापारी ट्रक भारतामार्गेच पाकिस्तानात जात असत. मोहम्मद अली जिना यांनी भारतातून 800 मैलांच्या पाकिस्तानच्या हक्काची कॉरिडॉरची मागणी केली होती, परंतु भारताने ते कधीच मान्य केले नाही. या मागणीवर वल्लभभाई पटेल म्हणाले होते, "हा एक सुंदर मूर्खपणा आहे, ज्याला गांभीर्याने घेऊ नये". बिहार-उत्तर प्रदेशातून जाणारी भारताचे दोन तूकडे करनारी पाकिस्तानी जमीन, हे खरोखरच मूर्खपणाचे होते.
भाषा आणि संस्कृतीची विविधता भारतात कितीतरी जास्त होती, पण भारताने एक महत्त्वाची गोष्ट पटकन केली. संविधानाची निर्मिती. पाकिस्तानला संविधान तयार करायला एक दशक लागले आणि ते तयार होईपर्यंत लोकशाहीच नाहीशी झाली होती. त्यापूर्वी, त्यांनी गवर्नमेंट ओफ इंडीया एक्ट (1935) संविधान म्हणून वापरला, त्यानंतर काही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. सध्या अस्तित्वात असलेली पाकिस्तानची राज्यघटना 1973 मध्ये झुल्फिकार अली भुट्टो यांच्या काळात बनवण्यात आली होती. अनेक दशके संविधानाशिवाय देश चालला!
संविधान बनवण्यात एक अडचण होती. कोणत्या कायद्यांनूसार संविधान चालनार? इस्लामच्या शेकडो वर्षे जुन्या कायद्यांप्रमाणे? की आधुनिक जगाच्या कायद्यांनूसार? भारतीय राज्यघटना ही आधुनिक लोकशाहीची छापील राज्यघटना होती.
पाकिस्तानचे मुस्लिम पिढ्यानपिढ्या भारतात राहत होते, जिथे हिंदू, शीख आणि इतर धर्मीयही त्यांच्यासोबत राहत होते. त्यांची तुलना अरब देशांतील मुस्लिमांशी करणे अशक्य होते. भलेही धर्मावर आधारित राष्ट्रवादातून पाकिस्तानची निर्मिती झाली असली तरी प्रत्येकाला शरिया कायद्याची समज नव्हती. त्यांनी ब्रिटिशांचा कायदा पाहिला होता.
पुरोगामी, सुशिक्षित मुस्लिमांचा देखील पाकिस्तानात एक मोठा वर्ग, त्यापैकी बरेच साम्यवादी विचारांचे होते, ते पूर्णपणे धर्माला समर्पित नव्हते. नमाजी मुसलमान फार कमी होते मात्र त्यांनी वाचलं सगळं होतं. एक घटना आहे की फैज अहमद फैज तुरुंगात असताना ते इतर कैद्यांना कुराण शिकवायचे. जेलरने टोमना मारला होता की तू ला-मजहबी (नास्तिक) आहेस, तुला कुराण-शरीफची काय समज?
पूर्व पाकिस्तानात सुमारे वीस टक्के लोकसंख्या हिंदू होती, तर पश्चिम पाकिस्तानमध्ये ती दोन टक्क्यांहून कमी होती. साहजिकच पुर्व पाकिस्तानात इस्लामिक राज्यघटना आणणे अवघड होते. एकीकडे अगोदरच भाषा आंदोलन सुरू असताना ह्या दुसर्या धक्क्याने देश हादरला असता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांनी ही समस्या सोडवली. अयुब खान संरक्षणमंत्री झाल्यावर कम्युनिझमशी लढण्यासाठी हातमिळवणी करण्याच्या अटीवर अमेरिकेने पाकिस्तानला लाखो डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले. कम्युनिझमशी लढणे म्हणजे केवळ सोव्हिएतांशी लढणे नव्हे, तर त्या तमाम विकासप्रेमी मुस्लिमांशी लढणे ज्यांच्या हातात मासिके, वर्तमानपत्रे, साहित्य यासारख्या गोष्टी होत्या त्या सर्व पुरोगामी विचारांच्या मुस्लिमांशी लढणे. ज्यांच्या मनात आधुनिक लोकशाहीवादी पाकिस्तान होता.
करोडो अमेरिकन डॉलर्सने पूर्व पाकिस्तानच्या ज्यूट उद्योगालाही छोटे केले. आता त्यांना दाबणे सोपे झाले होते. अमेरिका पाकिस्तानला त्या हुकूमशाहीत रूपांतरित करणार होता जिथे हे मेहनतीने मिळवलेले स्वातंत्र्य संपनार होते.
(क्रमशः)
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults