इतिहास

युगांतर- आरंभ अंताचा भाग ६

Submitted by मधुरा कुलकर्णी on 21 July, 2019 - 06:22

ब्रह्मदेवांचा क्रोध ! ज्यामुळे त्यांनी स्वपुत्री मृत्यूलोकात धाडली! देव - देवतांना भोगाव्या लागलेल्या या शापप्राप्त यातनांच्या अग्निकुंडात बळी पडला अजून एका अप्सरेचा! अद्रिका! मृत्युलोकी मस्य रुप धारण करण्याचा ब्राह्मदेवांचा शाप भोगण्यासाठी ती धरेवर अवतरली. धरेवरून पहटेच्या काषायवर्ण सुर्यदेवांचे रुप पाहून तिला मनोमन आनंद झाला. सुर्यदेवांचे प्रतिबिंब यमुनेच्या जलप्रतलावर पडलेले होते. नदी प्रवाहावर येणाऱ्या अलगद लाटांनी त्या प्रतिबिंबाला अस्थिर करत सर्व जलास केशरी छटा दिली होती. सुर्यदेवाच्या त्या लोभस रुपाकडे पाहत अद्रिकेने भानूदेवाला नमन केले आणि यमुनेच्या जलप्रवाहात प्रवेश केला.

शब्दखुणा: 

युगांतर - आरंभ अंताचा भाग ५

Submitted by मधुरा कुलकर्णी on 21 July, 2019 - 00:11

चंद्रदेवाने त्याची ताऱ्यांची सभा आकाशात मांडली आणि महाल दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला. महाराजांचा रथ पोचला आणि दास-दासी लगबगीने आरती आणि गुलाब पुष्प घेऊन आले. आरतीने महाराजांचा त्यांच्या भावी पत्नीसोबत प्रवेश झाला. महाराज्यांच्या नावाचा जयघोष झाल्यावर भावी महाराणींचे नाव सर्वत्र घोषित करण्याकरिता दासांनी नावाची विचारणा महाराजांना केली. शंतनूने क्षणभर चकित होऊन सुंदरीकडे पाहिले. जिला जीवनसंगिनी बनवायचे, तिचे नावही त्याने विचारले नव्हते. दिलेले वचन तत्परतेने पाळत होता की तिचा परिचय त्याला तिच्या नेत्रांतून मिळाला होता.... कोण जाणे!

शब्दखुणा: 

युगांतर - आरंभ अंताचा भाग ४

Submitted by मधुरा कुलकर्णी on 20 July, 2019 - 12:13

पुर्वेला लाली शिंपडत पहाट हरित तृणांवर दवाचा वर्षाव करू लागली. पक्षांनी किलबिलाट सुरु केला आणि हस्तिनापुर नगराला जाग आली. महालात दास-दासींचा वावर चालू झाला. महाराज दास महराजांच्या कक्षेत फलाहार घेऊन गेला. पण महाराज तिथे होतेच कुठे?

लढली अशी कि ती जणू झुन्जीतच वाढली

Submitted by सिद्धेश्वर विला... on 20 July, 2019 - 10:30

तृण वेचून खोपा बांधला

वर्तीकेने इवलासा संसार थाटला

शस्य शोधावया नर भ्रमणास जाई

जननी आगंतुकांच्या सोहळ्याची वाट पाही

कालानुपरत्वे सोहळे झाले

खोप्यामध्ये इवलेशे जीव आले

किलबिलाट उपवनी माजे

काकांची मत्सरी ईर्ष्या जागे

चिऊ सज्ज रक्षणास ठाकली

झुंज नाही सोडली

लढली अशी कि ती जणू झुन्जीतच वाढली

निष्ठुर काक नि ती इवलीशी पिल्ले

घरट्यावर त्यांनी सुरु केले ते हल्ले

जननी उभी सरसावुनी चोच ,

चोचीला अशी काही धार जी चढली

पडली धडपडली पण लढली अशी कि

काकांवर जणू विद्द्युल्लता कडाडली

विषय: 
शब्दखुणा: 

युगांतर - आरंभ अंताचा भाग ३

Submitted by मधुरा कुलकर्णी on 20 July, 2019 - 07:57

हस्तिनापुरात आनंद वार्ता पसरली. सम्राट प्रतिप यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. पुरुवंशाचा दिपक! बाळाला हातात घेउन सम्राटनी प्रेमाने त्याच्या तेजस्वी मुखकमलावरून हात फिरवला. "शंतनू....!" त्यांच्या मुखातून नाव बाहेर पडताच सर्वांनी युवराज शंतनू च्या नावाने जयघोष सुरु केला. ढोल-नगारे वाजवत जल्लोषाचे ध्वनी हवेच्या लहरींसोबत सर्वत्र पसरले.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग-२

Submitted by मधुरा कुलकर्णी on 19 July, 2019 - 11:01

वशिष्ठ मुनींच्या आश्रमात एकच गोंधळ माजला होता. त्यांची आवडती गाय नंदिनी नेहमीच्या स्थानी दिसत नसल्याने ऋषीमुनी हैराण झाले होते. रानात, डोंगरावर, नदीकाठी, झाडाजवळ, सर्वत्र परिचित ठिकाणी शोधणे व्यर्थ ठरले. नंदीनी कुठेच नव्हती. वशिष्ठ ऋषींच्या मनात कोलाहल माजला. शेवटी ते ध्यान लाऊन बसले. आपली दिव्य-दृष्टी जागी करत त्यांनी नंदिनीला शोधायला सुरवात केली... क्षणातच त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. नंदिनी हरवली नव्हतीच! वशिष्ठ ऋषींच गोधन खुद्द प्रभास नामक एका वसूनेच पळवून नेलं होतं. एव्हडच नव्हे!

विषय: 

इथे जोत दगडाचा अन वासा लोखंडाचा

Submitted by सिद्धेश्वर विला... on 12 July, 2019 - 05:38

इथे जोत दगडाचा अन वासा लोखंडाचा

गेला गेला तो जमाना विटेवर जगण्याचा

उभा पर्वत तो भात आणि मातीची आमटी

तरीही ढेकर तो नाही , अशी कशी हि भामटी ?

त्याला बसवून विटेवर , उभा तिथेच डाम्बला

कोंबला त्या राऊळात , माझ्या ईठूला कोंबला

लोक नादावती सारे , झेलुनी उनपाऊसवारे

मागे राहिला तो प्रपंच ,बायका अन पोरे

कधी भेटला का कुणा तो , गराड्यात बडव्यांच्या

फुका नाम ते श्रीहरी , गळ्या माळा त्या तुळशीच्या

पुण्य भेटत का कधी , घेऊनि विठूचे दर्शन

सोडूनि प्रपंच तो सारा , उगा देहाचे घर्षण

मी पहिला विठूला, आत मनमंदिरात

विषय: 

मुत्सद्दी क्रांतिकारी - रंगो बापूजी गुप्ते

Submitted by भागवत on 10 July, 2019 - 03:42

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या सर्वस्वाची आहूती दिली पण काळ ओघात त्यांची स्मृती इतिहासाच्या पटलावरून काहीशी पुसून गेली. अनेकांचे कार्य हे चमकत्या हिऱ्या प्रमाणे होते पण इतिहासाच्या पुस्तका मध्ये त्यांच्या स्मृती हरवून गेल्या आहेत. मी खूप दिवसापूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकातील प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखेचे नाव होते "रंगो बापूजी गुप्ते". पुस्तक वाचल्या नंतर त्यांच्या पासून मी खूपच प्रभावित झालो. स्वातंत्र्याच्या यज्ञात असंख्य व्यक्तींनी तण, मन आणि धनाने स्वत:ची आहूती दिली.

विषय: 
शब्दखुणा: 

नाशिककर्स!!!

Submitted by अज्ञातवासी on 29 April, 2019 - 22:35

फ्रॉम नाशिककर, फॉर नाशिककर्स!!!

द्राक्षाचा गोडवा, नाशिक....
वाईनची झिंग, नाशिक...
चित्रपटसृष्टीचा बापमाणूस, नाशिक...
मिसळीचा झटका, नाशिक...

काळारामाचा नाद, नाशिक...
तपोवनाची साद, नाशिक...
त्र्यंबकची गाज, नाशिक
महिंद्राचा बाज, नाशिक

तर...
तुज हृदयंगम रवे विहंगम-भाट सकाळी आळविती
तरु तिरिचे तुजवरी वल्ली पल्लवचामर चाळवीती
तुझ्या प्रवाही कुंकुम वाही बालरवि जणू अरुणकरी
जय संजीवनी जननी पयोदे श्रीगोदे! भवताप हरी
(आभार - भारत)

नाशिकविषयी चर्चेसाठी हा धागा!

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास