अर्थकारण

तडका - कांद्याचा भाव

Submitted by vishal maske on 17 December, 2016 - 08:55

कांद्याचा भाव

लोकांना कांदा चारणाराही
आज कांद्यानेच खचला आहे
राब-राब राबुनही शेतकर्याला
कष्टाचा घास ना पचला आहे

विक्रमी ऊत्पादन करूनही
मार्केटींगमध्ये तो हरू लागला
कारण घसरता कांद्याचा भाव
डोळ्यात पाणी भरू लागला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

नोटबंदी चे आर्थिक परिणाम

Submitted by सिम्बा on 16 December, 2016 - 02:02

राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे

एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.

त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.
त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.
मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.

तडका - कायद्याचा खुटा

Submitted by vishal maske on 15 December, 2016 - 07:23

कायद्याचा खुटा

वेग-वेगळ्या ठिकाणी
रोज धाडी पडू लागल्या
रोकड जप्तीच्या घटना
दिवसें-दिवस वाढू लागल्या

काळा पैसा पांढरा करण्या
कित्तेकांचा आटा-पिटा आहे
पण गैरव्यवहार टाळण्यासाठी
कायद्याचा आडवा खुटा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नोटाबंदीच्या रडारवर

Submitted by vishal maske on 14 December, 2016 - 07:20

नोटाबंदीच्या रडारवर

या नोटाबंदीच्या निर्णयाला
कुणी म्हणे डोळ्यात धूळ आहे
तर हे गरिबांविरोधातील युध्द
अशी राहूल यांचीही हूल आहे

आप-आपल्या विचारांनुसार
कुठे विरोध कुठे समर्थन आहे
मात्र नोटाबंदीच्या या निर्णयात
रडारवरती काळे धन आहे,...?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - डिजिटल धोका

Submitted by vishal maske on 12 December, 2016 - 08:38

डिजिटल धोका

व्यवहार डिजिटल होऊन
कॅशलेस ठरू लागले
पैशांऐवजी व्यवहारात
आता आकडेच फिरू लागले

व्यवहारात आकडे फिरवणे
हा डिजिटल झरोका आहे
मात्र या डिजिटल व्यवहारांना
डिजिटलचाच धोका आहे...?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

लिहीते व्हा

Submitted by संजयb on 12 December, 2016 - 04:26

शब्द शब्द सांभाळा
पण लिहीते व्हा
कधी दूधावरली साय सांगा
कधी दर्याच्या लाटा बोला
कधी पत्नी प्रियसी वर्णा
कधी फूलांचा रंग सुगंध वाटा
कधी तरी वेचा शंख शिपंले किनारी
कधी कवडसे सोनेरी
कधी ऊसासे
हास्य स्मिते फूलवा कधी
कधी हेरा आश्रूंची टपटप
कधी विरश्रीचे दर्शन घडवा
कधी करूणेची पाखर
कधी वर्णा तांडव भयंकर
अन्यायाची कधी फेडा पैरण
कधी कैतूकाची थाप पाठीवर
कधी हात धरूनी दाखवा वळण
स्वत:ची ठसठस कधी तरी....
कधी दुसऱ्याची ओळख
कधी आईची माया सांगा
कधी जयपराजय आपले वर्णा

शब्दखुणा: 

तडका - पैशाचा ताळा

Submitted by vishal maske on 5 December, 2016 - 08:08

पैशाचा ताळा

सर्वांना समजेल असं
सर्वकाही ठळक आहे
आजकाल पैशालाही
रंगाची ओळख आहे

कोणाकडे पांढरा तर
कोणाकडे काळा आहे
वाट दावतो किंवा लावतो
पैशाचा हा ताळा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तुम्ही, तुमचे आप्तमित्र केवायसी कंप्लायंट आहात का?

Submitted by अमा on 28 November, 2016 - 02:57

परवा मंगळवारी २२.११.२०१६ एक एस एम एस आला. खालील प्रमाणे :

अर्जंट आणि महत्वाचे, आर बी आय गाइडलाइन्स नुसार तुमच्या आय सी आय सी आय बँके च्या अकाउंटचे केवायसी पेपर्स सबमिट करा सबमिशन करायची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. नाहीतर हे अकाउंट व त्याच्याशी संलग्न डीमॅट अकाउंट ब्लॉक होईल. के वायसी पेपर्स साठी खालील लिंक बघा.

निश्चलनीकरण/निर्धनीकरण (demonetization) - सर्जिकल स्ट्राईक की घोळ? - काही विचार

Submitted by भास्कराचार्य on 26 November, 2016 - 12:47

प्रस्तावना

.................................................................................................................................

Submitted by .... on 26 November, 2016 - 07:41

मायबोलीवर बरेच मागे चाळून पाहीले तरी मोदीजींच्या कामगिरीबद्दल कौतुकाचे दोन शब्द आढळले नाहीत. ( निर्णयाचे कौतुक करणारे धागे आढळत नाहीत . प्रतिसाद आहेत).

विरोधकांचे मुद्दे चुकीचे आहेत असे माझे म्हणणे नाही. तक्रार देखील नाही. पण फक्त विरोध एके विरोध यामुळे एकसुरी वातावरण निर्माण झाले आहे असे वाटते. या पार्श्वभूमीवर परदेशात मोदीजींबद्दल काय बोलले जाते हे आपल्याला पहावयास हवे. एका व्हिडीओची लिंक खाली देतेय. फ्रान्स हा काही भाजपला मत देणारा देश नाही. तरी पण तिथल्या मीडीयाची मने मोदीजींनी जिंकून घेतली आहेत. व्हिडीओच इतका प्रभावी आहे कि आणखी काही लिहीण्याची आवश्यकता नाही.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अर्थकारण