लढाई कोरोनानंतरची (आर्थिक मंदी आणि बेरोजगारीशी)

Submitted by Cuty on 31 March, 2020 - 07:21

एकवीस दिवसांचे लाॅकडाऊन. ते संपले किंवा थोडे अजून काही दिवस वाढले,तरी ही कोरोनाविरोधी लढाई आपण नक्की जिंकू. पण गेले दोनतीन दिवस टीव्हीवरती जरा वेगळी चर्चा कानावर पडते आहे. बहुतेक तज्ञांच्या मते 2009 पेक्षा जास्त भयानक अशी आर्थिक मंदीची लाट येईल. 2009 मध्ये इतर अनेक देशांच्या तुलनेत भारतात मंदीचा तितका प्रभाव पडला नव्हता. मात्र यावेळी परिस्थिती बिकट आहे. कोरोनानंतर आपल्याला यादेखील लढाईला सामोरे जावे लागेल. अशावेळी प्रत्येक पातळीवर, घरीदारी या मंदीवर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो. आपल्या जीवनावर काय परिणाम होतील आणि आपल्याला काय बदल करावे लागतील. परवा शरद पवार म्हणाले,काही महिने काटकसर करा.ती तर करावीच लागेल. पण माझ्या मते, अनेकांच्या नोकरीवर गदा येणे,व्यवसायात नुकसान या संकटाशी सामना करताना महिलांचा रोल ही महत्वपूर्ण राहिल. खेडोपाडी,तालुकाभागात जिथे महिलांचे नोकरी करण्याचे प्रमाण कमी आहे तिथे महिलांनीच घराबाहेर पडून छोटे व्यवसाय, गृहोद्योग किंवा एखादा पूरक व्यवसाय करून संसाराला हातभार लावला पाहिजे. शेवटी एकएक संसार उभा राहिला तरच देश उभा राहिल.
याशिवाय येत्या काळात मंदीचे काय परिणाम होतील आणि आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील यावर चर्चेसाठी हा धागा काढला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि एखादी खरेदी plan केली होती, ती खरेदी करायला पाहिजे.
गेले एकवीस दिवस बऱ्याच चांगल्या गोष्टी पण शिकवणारे आहेत. आपण बाहेरचं खाणं पूर्ण बंद केलंय, ते continue करू शकतो. प्रकृतीला आणि खिशाला दोघांना परवडेल.
मोलकरणी परत आल्या तरी लगेच त्यांना येऊ द्यायचे का हा माझ्यासमोर यक्षप्रश्न आहे. कारण दोघी आंध्राला गेल्या आहेत. आणि तिथे आता नवाच उद्रेक झालाय कोरोनाचा. बिचाऱ्या मोलकरणी! त्यांना कळणार पण नाही त्या अश्या कोणाच्या संपर्कात आल्या असतील Sad मी पुढचा महिना -दोन महिने पूर्ण पगार देऊन येऊ नका सांगायचा विचार करत आहे. मी परत चवळीची शेंग होईन अशी स्वप्न पडायला लागली आहेत Happy
Dishwasher विकत घेईन जर deal चांगलं मिळालं तर! तेवढाच मार्केट मध्ये माझा खारीचा वाटा!

राजसी, खरेच दोन महिने तरी मोलकरणी ठेऊ नका.
मला पडलेले प्रश्न 1- कोणत्या बाबी स्वस्त होतील.उदा. वीजबील कमी करणार आहेत.
2-काय महाग होईल? उदा. भाज्याफळांपासून कपड्यांपर्यंत.इ.

उत्तम, समयोचित धागा!
कोरोनाची ही एकमेव महासाथ असेल असे गृहीतक सोडून पुढील साथीच्या/महासाथीच्या तयारीला लागायला हवे. निदान वर्ष-दोन वर्ष हा आजार दर हिवाळ्यात सतावणार असा एक्स्पर्टसचा अंदाज आहे. वर्ष-दोन वर्षात औषधोपचार जनसामान्यास मिळेल. साथीला तोंड देण्याची तयारी दोन टप्प्यात करता येईल - अल्पकालीन आणि दिर्घकालीन. काही महिने काटकसर करून विस्कटलेली घडी चटकन परत बसेल अशी आशा करू. कुणाचे मोठे नुकसान, जीवितहानि झाली असेल तर त्यांना अधिक धडपड करावी लागेल पण २-४ महिन्यात पूर्वपदावर आलो तर पुढची वाटचाल सोपी होईल. मग पुढील साथीच्या तयारीला लागणे. ह्यात अनेक गोष्टी येतात -जसे थोडे तरी काम घरून करता येईल असे जॉब प्रोफाईल मिळवणे, नसेल शक्य तर घरबसल्या एखादा रोजगार उर्फ 'साईड-हसल' मिळवणे, शेजार-पाजारी 'शुक्रवारी दही मागितले' अशा कारणांवरून बिघडलेले संबंध सुधारणे, वैद्यकिय विमा, जीवन विमा इ आर्थिक बाबी, रोज थोडा वेळ स्वतःला देवून स्वतःचे शरीर निरोगी राखणे इ इ.

2009मधे IT आणि रिअल इस्टेटला मोठा फटका बसला होता. यावेळी कोणत्या क्षेत्रांना जास्त नुकसान होईल याचा अंदाजही येत नाही. नोकरी करणार्या लोकांनीदेखील हवी तर थोडी गुंतवणूक बाजूला काढून कुटुंबातील लोकांना मदतीला घेऊन एखादा साईडबिझनेस सुरू करण्याबाबत विचार केला पाहिजे. कारण पुढे काय परिस्थिती येईल आपण आताच सांगू शकत नाही.
आपले सणसमारंभ, लग्नसराईचा काळ दिवाळीपर्यंत असल्याने किरकोळ मार्केटमधे मात्र जरा तेजी राहिल अशी आशा वाटते.तरीपण किती जणांच्या नोकर्या, व्यवसाय शाबूत राहतात त्यावर सगळे अवलंबून आहे.
ग्रामीण भागात मात्र लोकांच्या गरजा कमी असल्याने अन शेतीवर अर्थकारण अवलंबून असल्याने हा भाग जरा लवकर सावरेल असे वाटते.

मंदीचे परिणाम दिसणारच.
आयटी वगैरे समृद्ध सेक्टर्स साठी हे तसे सौम्य
1. मोठे क्लायंट पैसे वाचवायला बघणार.आधी भरपूर हेड काऊंट भरपूर बिलिंग अशी स्थिती होती तसं राहणारा नाही.प्रत्येकाला आपल्यावर होणाऱ्या बिलिंग ला पात्र बनायला, असत राहायला झोकून देऊन काम करावं लागेल.नवा अभ्यास आणि कामाचे तास वाढणार.
2. स्वस्त कामगार म्हणून परदेशी नोकऱ्या जाऊन काम भारतात आल्यास परदेशी लोकांबरोबर काम करताना थोड्या तुटकपणाचा, क्वचित रेसिझम चा अनुभव.
3. जिथे नोकऱ्या टिकणं भाग्याची गोष्ट तिथे इन्क्रीमेंट वगैरे मुद्द्यांवर भांडून चालणार नाही.

मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मोठ्या कंपन्या मंदी मुळे खर्च वाचवणार.मोठ्या कंपन्या ज्यांना काम देतात त्या लहान सप्लायर्स चा बिझनेस गेल्यास लहान बिझनेस तात्पुरते/कायमचे बंद.

बाकी सेक्टर्स लोकांच्या खर्च करायच्या इच्छेनुसार चालत असल्याने त्यात काही काळ मंदी.

नोकऱ्या फार सुरक्षित न वाटल्यास लोक घर घेण्याची घाई करत नाहीत त्यामुळे रिअल इस्टेट मध्ये मंदी.

आपण सगळे एकमेकांना मदत करून वर येऊ.
2001, 2009,2013 चे स्लो डाऊन तारून नेले तसा हाही नेऊ.जवळच्या गरजुना यातून वर यायला मदत करू.

याआधी रियल इस्टेट मध्ये मंदी आली तरी पुण्या मुंबईत काही घराचे भाव फारसे पडले नव्हते. त्यात मोक्याच्या ठिकाणी तर नाहीच. फार फार तर किंमत वाढण्याची गती कमी झालेली किंवा स्थिर राहिलेली. यावेळी पुण्यनगरीमध्ये सॅच्युरेशन झालेले असल्यामुळे घरांच्या किमती खाली येतील असे वाटते का?

एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून असेही घडेल की घरगुती व्यवसाय जोर पकड़तील. घरचीच हक्काची मंडळी हां कंपनी स्टाफ गृहीत असल्याने पुन्हा एकत्र कुटुंब व्यवस्था बळकट होऊ शकेल. एकमेकांतील नातेसंबध बळकट होतील. रोजंदरीसाठीचे अनावश्यक मनुष्यबळ कमी करत जास्तीत जास्त काम ऑटोमेशनने करायला सुरु झाले तर रोबोटिक्स वगैरे तत्सम क्षेत्र वृद्धिन्गत होईल. जुगाड़ थिअरी मोठ्या प्रमाणात वापरात येत राहील तर लोकांची वैचारिक प्रगल्भता वाढती राहून कन्सट्रक्टिव्ह माइंड जास्त डेवलप होऊन समाज प्रगती करेल. हे सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणात घडत राहील तेव्हा डिस्ट्रक्टिव्ह माइंड / हिंसक कारवाया करणारी मंडळीना मिळणारा पाठिंबा आपोआप कमी होत राहतील. शहरातील दोलायमान जीवनाचा अनेकवेळी आपत्काल फटका बसलेले जे लोक गावी परतले आहेत त्यांनी ठरवले की जर चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण गावी राहायचं आणि काहीतरी शेतीपूरक करायचं तर शहर आणि गावं असे दोन्हीतील आर्थिक दरी दर्शवणाऱ्या गोष्टी संपुष्टात येत हळूहळू का होईना कमाईच्या वाटा योग्य दिशेने खऱ्या समृद्धीच्या मार्गावर राहतील. लोकांना शहरी क्षणिक आकर्षणपेक्षा गावातील लॉन्ग टर्म सिक्युरिटी जर मनात ठसवून योग्य प्रबोधन करत आर्थिक आणि तांत्रिक मार्गदर्शन केले तर वाइटातून चांगलं शोधत खुप मोठी मजल मारता येईल.
सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांना निव्वळ पैसा पैसा करत राहण्यापेक्षा सुदृढ़ जीवन आणि त्याअनुषंगाने शारीरिक फिटनेसचे महत्व पटेल. हाय प्रायोरिटीने ओबेसिटी आणि त्यामुळे होऊ घातलेल्या व्याधी कमी करणे, इम्युनिटी वाढवणारे काही कमर्शियल प्रॉडक्ट्स, डाइट प्लान्स आणि त्यासाठीचे कन्सल्टन्ट अशी एक लाट घाबरलेल्या मानसिकतेचा फायदा घेत जोर पकडू शकते.

करोना व्हायरसवर लस किती लवकर निघते, त्याच्यावर बरेच काही अवलंबून आहे. प्रत्येक दिवसाची जितकी दिरंगाई होईल तितकी ही मंदीची लाट अधिकाधिक तीव्र होणार आहे. कुणी कितीही म्हटले की ही कोरोनाविरोधी लढाई आपण नक्की जिंकू तरी माझ्या मते चित्र अजिबात आशादायक नाही. लस यायला कमीत कमी ५-६ महिने तरी लागणार.तोपर्यंत किती लोकांचे मृत्यू होणार काय माहीत? येणार्या मंदीत जगभरात खूप जणांच्या नोकर्या जाणार किंवा बहुतेक सर्वांचे पगार कमी होणार, असे चित्र आहे. लहान उद्योगांचे किंवा ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे तर खूप हाल होणार. मुंबईत गिरण्या बंद पडल्यावर कामगारांवर जी पाळी आली, तसेच काहीसे पण पूर्ण जगात होणार असे दिसू लागले आहे आत्ताच.

अमेरिकेत जास्त मनुष्यहानी झाली तर जनमत असे होऊ शकते की चीनवर अवलंबून राहण्यापेक्षा इथेच अमेरिकेत कारखाने काढा. शिवाय तिथे जर बेकारी वाढली तर अमेरिकन लोकांनाच नोकर्‍या नाहीत आणि आय.टी. मध्ये घरून काम करू शकतो म्हणून H1B वगैरे लोकांविरुद्ध पण आरडाओरडा वाढू शकेल किंवा कंपन्या आउटसोर्सिंग स्वस्त देशात वाढवू शकतील आणि अमेरिकेतील लोकांनाच मॅनेजर म्हणून ठेवतील. भारतात आय.टी. क्षेत्रात जे हँड्स-ऑन काम करतात त्यांचे एकवेळ ठीक आहे, पण सगळ्या कंपन्यांमध्ये जे खंडीभर मॅनेजर भरलेले असतात किंवा जे ४५-५० वर्षे वयाच्या पुढे आहेत, त्यांची नोकरी गेली तर त्यांना दुसरी त्याच तोलामोलाची नोकरी मिळणे खूप कठीण जाणार, असे व्यक्तिशः मलातरी वाटते.

घरांच्या किंमती लगेच पडतील असे वाटत नाही, कारण लोक स्वस्तात घरे विकणार नाहीत, अगदीच गरज असल्याशिवाय. ऑनलाइन शॉपिंगला तेजी येईल, असे वाटते कारण लोकांना घरपोच आणि स्वस्तात माल घ्यायला आवडेल. पण सरकार स्वस्तात कर्ज्/भांडवल उपलब्ध करून देईल आणि त्यामुळे भारतात स्टार्टअप जास्त जोरात सुरू होतील, असे आशादायक चित्र दिसेल, असे पण मला वाटते. वरील सर्व अंदाज आहे, बघू माझा अंदाज कितपत खरा ठरतो ते.

हम्मम...

ही चर्चा आपण खूप लवकर करतोय असे एकदम वाटले. लॉकडाऊन मेच्या शेवट पर्यंत हटणार नाही असे वाटतेय. Covid च्या साईट वर भारताचा आकडा ज्या वेगाने वर जातोय ते पाहता काळजी करायची नाही हे वारंवार स्वतःला सांगावे लागतेय.

माझ्यासारखे लोक जे रिटायरमेंटचा विचार करत होते आणि त्यासाठी कंपनीकडून मिळणाऱ्या व आजवर इन्व्हेस्ट केलेल्या पैश्यांवर अवलंबून राहणार होते त्यांना निश्चितच धडकी भरली असेल. कारण स्टोकमार्केटातिल इन्व्हेस्टमेंट मातीमोल झालेली आहे. जी सुरक्षित आहे असे वाटत होते तीही आडवळणाने शेवटी मार्केटवरच अवलंबून असणार.
कंपनीकडून जे मिळेल त्यातील पीएफ सरकारी असल्यामुळे सुरक्षित असावा हा अंदाज. आजच्या घडीला काहीही सांगता येणार नाही हेमावैम.

बाकी तरुण लोकांना परत एकदा कंबर कसून कामाला लागावे लागणार हे निश्चित..

नोकरी करणार्यांनाच असुरक्षित वाटते, तिथे फ्रेशर्सचे तर काय हाल होतील. तरी सुद्धा यामुळे स्टार्टअप जोरात सूरू होतील व इतरही काही सकारात्मक परिणाम दिसतील ही आशा.

खरेदीची क्षमता बाळगुन असलेला देशातील मध्यम वर्ग, ग्रामीण भागातील कृषी आधारित अर्थव्यवस्था, वेळप्रसंगी ऋण काढुन थाटात विवाह करण्याची मानसिकता, येणारे गणपती दिवाळी दसरा यासारखे सण, लॉकडाउन मुळे पुढे ढकलली गेलेली खरेदी यासारख्या कारणांमुळे भारताला मंदीचा फारसा फटका बसणार नाही असं वाटतं. अर्थात निसर्गराजाची साथ मिळायला हवी.

मला पर्सनली नाही वाटत अमेरिका भारत कुठेही मंदी येईल.
उलट आता सर्व देशांनी चायनाशी व्यापारी संबंध तोडून आपसात व्यापार वाढवावा व सहकार्य करावे. विशेषतः भारत, अमेरिका, युरोप , जपान यांनी.

अज्ञानी, उपाशी बोका आणि सर्वच प्लस १
वेतन कपात आणि नोकरीकपात होणारच. पण रिकामपणामधे काही जणांना भन्नाट कल्पनाही सुचू शकतीलं. काही इनवेनशन, इनोवेशन, इंप्रोवाय्झेशनस ना चालना मिळू शकते. शहरातून नवे जीवनमान आणि जीवनपद्धती पाहिलेले लोक गावी गेल्यास तिथेही बदल घडू शकतील. गेल्या शतकातल्या कापडगिरणी संपात असे थोड्या प्रमाणात घडले होते. पण पुढचे अनेक दिवस वाईट आहेत हे खरे.

सर्वात जास्त फटका सेवा क्षेत्र आणि त्यातही ग्राउंड लेवल च्या लोकांना बसेल असं वाटतंय. विमान कंपन्यांना जबरदस्त फटका बसला आहे, त्यातून सावरायला बऱ्यापैकी वेळ जाईल.
मंदीची तीव्रता ह्यावर्षीच्या मोसमी पावसावर अवलंबून राहील. गावातून शहरात पोटापाण्यासाठी आलेले बरेचजण परत आपापल्या गावाला गेले आहेत. तसेच सध्याची परिस्थिती पाहता इतक्यात शहरात कामासाठी येणं अवघड आहे, त्यामुळे पाऊस समाधानकारक पडल्यास शेतीसाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो व उदरनिर्वाह सुद्धा होऊ शकतो.

>> घरांच्या किंमती लगेच पडतील असे वाटत नाही, कारण लोक स्वस्तात घरे विकणार नाहीत, अगदीच गरज असल्याशिवाय>> नोकरी गेल्यावर घराचा हप्ता भरता आला नाही की बॅंका सध्याच्या परिस्थितीत काही महिने फारतर सूट देतील. मग घराची किंमत स्वस्त आहे का महाग! घर विकायचं का नाही का चॉइस रहाणाराच नाही.
चीन अमेरिका व्यापारी वादात भारताने फायदा करून घ्यावा असं मला खूप वाटतं होतं, पण सगळे उद्योग व्हिएतनाम, तैवान ते अगदी थायलंड, फिलिपीन्स लाच गेलेले ऐकलं. भारत काही कोणाला आकर्षित करू शकला नाही, तुरळक अपवाद वगळता.
इलेक्ट्रॉनिक पार्ट बनवणाऱ्या कंपन्या ८० टक्के लेव्हल वर प्रोडक्शन ऑलरेडी करत आहेत आता चायना मध्ये.
बाकी ठिकाणी लवकर पीक आणि प्लाटू येऊन जाऊ दे!

आज ABP माझा वर सांगितले, अमेरिकेत 1 कोटी नोकर्या धोक्यात (जवळपास गेल्यात जमा ) आहेत.
भारतात काय होईल काय माहित !

काळजी नको. कदाचित त्यांनी राजीनामे दिले असतील. सनव यांच्यामते >> मला पर्सनली नाही वाटत अमेरिका भारत कुठेही मंदी येईल. <<
Light 1

मंदी येवो न येवो.. हा एप्रिल महिना ईंक्रीमेंटचा होता. पण आता ईंक्रीमेंट दूर. कंपनी नक्कीच डिक्रीमेंट करणार..
आहे तो पगार रहिलेले परवडते. पण कमी झाले की हिशोब गडबडतो. भले यावर कोंणी म्हणेल नोकरी वाचतेय तेच खूप... पण तसा विचार करता जीव वाचला तेच खूप असेही म्हणता येईल... असो. तरी आता कमाई खर्चाशी सर्वांनच झगडावे लागणारच. गरीब असो वा मध्यमवर्गीय.. प्रत्येकाची सेट लाईफ बिघडणार .. तसेच अश्या परीस्थितीत काही जणांचा ज्यादा फायदा होतो, कारण त्यांच्या मालाला जास्त डिमांड येते. त्यामुळे आर्थिक विषमताही वाढेल.

पण खरे सांगयचे तर माझे जे काही व्हायचे ते होईल.. आर्थिक् महसत्ता असलेल्या अमेरीकेचे काय होणर या काळानंतर हा प्रश्न मला जास्त भेडसावत आहे. तिथे खुद्द अमेरीकेची लागलीय तर आपण कोण मोठे शहाणे हा एक दिलासा असतो

<< आता कमाई खर्चाशी सर्वांनच झगडावे लागणारच. गरीब असो वा मध्यमवर्गीय.. प्रत्येकाची सेट लाईफ बिघडणार .. >> +९९९

अमेरिकेतल्या एका मित्राचा पगार (कन्सल्टंट आहे) 30% कमी केला आहे आणि दुसऱ्या एकाला महिन्यात 5 दिवस सक्तीची रजा घ्यावी लागणार, सुट्टी शिल्लक नसेल तर बिनपगारी रजा.

आजची अपडेट. भारताबद्दल.
Tv9 वर सांगितले भारतातील 1 कोटी 6 लाख लोकांच्या नोकर्या जाणार. यात पर्यटन,हाॅटेलिंग आणि मॅन्युफॅक्चर क्षेत्र प्रामुख्याने असतील.