चीन शी व्यापार करावा की नाही ?

Submitted by नितीनचंद्र on 19 April, 2020 - 02:52

चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.

आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.

शिवाजी महाराज शुर होते, मुत्सद्दी होते, राजकारण निपुण होते इ अनेक गुण अनेकांना माहित होते. पण शिवाजी महाराज कसलेले व्यापारी होते हा गुण अनेकांना माहित नसेल. याचे कारण आजवर इतिहास लिहीला गेला त्याचा आधार बखरी, नोंदी किंवा पत्रव्यवहार जो महाराजांनी केला किंवा इतरांनी महाराजांशी केला या माध्यमातून आहे.

मी इंग्लडला गेल्यावर मुद्दाम एका संग्रहालयात गेलो जिथे इस्ट इंडीया कंपनीचा पत्रव्यवहार साल आणि महिन्यांनुसार संग्रह केलेला आहे.
मी शिवाजी महाराजांच्या कालखंडातील एक ईस्ट इंडीया कंपनीचा कालखंड उघडला आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एक पत्र मिळाले. ज्यात भारतातील एका ईस्ट इंडीया अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांशी तांबे विकुन व्यापार करताना ईस्ट इंडीया कंपनीला ३२% नुकसान का सोसावे लागले याची कहाणी आहे.

तेंव्हा आणि आजही तांबे भारताला आयात करावे लागते. शिवाजी महाराजांनी ईस्ट इंडीया कंपनी सोबत तांब्याच्या बदल्यात चांदी असा देण्या घेण्याचा करार केला.
यातील शर्ती अश्या होत्या.
१) इंग्रजांनी प्रथम तांबे दाभोळला द्यायचे.
२) बदल्यातली चांदी रायगडावर येऊन घेऊन जायची.
३) शिवाजी महाराज स्वतः चांदी वजन करून देतील.
४) वजनकाटा रायगडावरील असेल.
५) चांदी देताना, चांदीचा exchange rate ज्या दिवशी चांदी दिली जाईल त्या दिवशीचा असेल.

तांब्याची डिलीव्हरी घेतल्यानंतर ईस्ट इंडीया कंपनीला चांदी मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागले. दाभोळ ते रायगड प्रवास करून गेल्यावर अधिकारी शिवाजीमहाराज स्वतः चांदी मोजून देतील अशी शर्त दाखवून ते आत्ता रायगडावर नाहीत असे सांगत. शेवटी एकदा खुप नजर ठेऊन ईस्ट इंडीया अधिकारी शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ वसुली साठी रायगडावर दाखल झाले.

चार दिवसांनी महाराज भेटले आणि एकदाची चांदी दिली. यात शिवाजी महाराजांनी चलाखीने खराब काट्यावर वजनात चांदी कमी दिली तसेच त्या दिवशी चांदी खरेदी रेट वाढल्यामुळे सुध्दा चांदी वजनाला कमी मिळाली. यासर्व व्यवहारात शिवाजी महाराजांनी ३२% तोटा ईस्ट इंडीया कंपनीला सोसायला लावला.

पुढे निनाद बेडेकर म्हणाले जनतेच्या गवताच्या काडीला सुध्दा हात लाऊ नका असे सैन्याला आदेश देणारे शिवाजी महाराज व्यवहारात असे का वागले ? निनाद बेडेकरांच्या मते इंग्रज व्यापाराच्या नावाखाली साम्राज्य विस्ताराची स्वप्ने पहात होते जे पुढे अर्धे जगावर राज्य करून इंग्रजांनी सिध्द केले. अश्या व्यापार्यांना सुरवातीलाच व्यवहारात नुकसान पत्करायला लावले तर तर ते साम्राज्य विस्ताराचे स्वप्न साकार करू शकणार नाहीत ही शिवाजी महाराजांची निती होती.

आता सुध्दा जो माल ( फक्त आणि फक्त ) भारतातच तयार होतो तो चीनला विकताना अनेकपट किंमत वाढवून विकला तर आज खास करून चीन सोबत आयात जास्त व निर्यात कमी ही तुट कमी होईल. भारतीय हुशार व्यापारी आणि मोदींजीचे देशहीताचे सरकार याही पेक्षा काही वेगळे घडवू शकतील. याची चुणूक आपल्याला कोरोनासाठी चे औषध अमेरिकेला देताना पहायला मिळाली.

मांजरी सोबत घोडा फ्री पण मांजर तीन लाख रूपयांना विकायची या पंचतंत्रातील गोष्टी काय फक्त वाचण्यासाठी असतात ?
©नितीन जोगळेकर
नावासकट काॕपी पेस्ट किंवा शेअर करा.

Group content visibility: 
Use group defaults

parts, innovation, assembly and development in electronics या व इतर अनेक क्षेत्रांत भारत चीनच्या बराच मागे आहे. विशेषत लोकशाहीतील राजकीय गोंधळामुळे भारताची झटपट निर्णय घेण्याची क्षमता कुंठित होते. अशा परिस्थितीत जे आहे ते तसेच चालू द्यावे व जेव्हढे जमेल तेवढे स्वतः ला स्वयंपूर्ण बनवावे व मगच काहीतरी साहसे करावीत हा एकच मार्ग भारताकडे आहे असं मला वाटतं.

त्याशिवाय globalisation मुळेही भारताच्या तुम्ही म्हणताय तसे काही करण्यास बंधने येतात.

भारतात तांब्याची भांडी, नाणी अनेक वर्षे तयार केली जातात. तांबे आणि जस्त ( मराठीत झिंक ) याच्या मिश्रणाने पितळ तयार होते. याची भांडी वापरात होती. या लेखात किंवा कै निनाद बेडेकर यांनी किती किलो तांबे असा उल्लेख नाही. यामुळे नविन इतक्या तांब्याचे काय करत होते हा प्रश्न अप्रस्तुत आहे,

त्या क्लोरोक्वीन प्रकरणातून अपेक्षानच्या बेडकया फारच फुगत आहेत. अमेरिका क्लोरोक्वीन बनवत नाही , कारण त्यांच्याकडे मलेरियाचे हजारभरही पेशंट वर्षभरात नसतात , आपल्याकडे गंभीर मलेरिया होऊन मरणाऱ्यांची संख्या ह्याच्यापेक्षा जास्त असेल आणि मलेरियाची एकूण संख्या लाखात जाते , म्हणून आपल्या कंपन्या क्लोरोक्वीन बनवतात . सरकारी दवाखान्यातही प्रत्येक ताप मलेरिया असू शकतो , या धोरणाने क्लोरोक्वीनच्या गोळ्या पोत्याने लागतात , म्हणून त्याचे उत्पादन करावे लागते

आज करोना आला म्हणून त्याना हवे आहे , तर ते त्याना काही अंशी तरी पुरवावे लागेल , इतर हजारो रोग असे आहेत की ज्यासाठी आपल्यालाही अनेक देश वर्षभर औषधे पुरवत असतात.

तसेही त्या क्लोरोक्वीनचे शेल्फ लाइफ पाच वर्षे आहे , एकदा अमेरिकेला आला अंदाज की ह्या करोनाची वार्षिक व्याप्ति किती असेल तर ते एकदम बफर स्टॉक करून ठेवतील.
आणि शब्द अन वचने क़ाय , अमेरिकाही फिरवू शकतेच , वो तो एक जुमला था !

कोणाशी व्यापार करावा आणि करू नये हे परिस्थिती ठरवेल.
काही वस्तू जर चीन मध्येच उपलब्ध असतील आणि आपण बनवण्यास सक्षम नसू आणि चीन व्यतिरिक्त बाकी देश महाग विकत असतील तर चीन कडून माल घेण्याशिवाय पर्याय नाही.
त्या बदल्यात आपल्या कडच्या वस्तू तिकडे जास्त खपत असतील तर तो व्यापार फायद्याचं आहे.
त्या साठी स्वतः सर्व बाबतीत सक्षम असणे गरजेचे आहे.
दिवाळी साठी लागणारी विजेच्या बलाची तोरणे सुद्धा चीन कडून घ्यावी लागत आहेत
मोबाईल चे सुट्टे भाग चीन कडून
किती तरी उदाहरणे आहेत.
प्रतेक देशाची काही तरी कमजोरी आणि काहीतरी ताकत असते.

ब्लॅक कॅट
अमेरिकेने क्रूड ऑईल चा buffer stock karun ठेवला आहे?
आणि स्वतः कडचे नैसर्गिक साठे वापरात नाही असे ऐकले होते हे खरे आहे का.
जेव्हा गल्फ मधील साठे संपतील तेव्हा अमेरिका क्रूड ऑइल चा किंग असेल.

लेखात तांबे किती किलो वा मण होते, क्लोरोक्वीन (तेही चीनने म्हटल्याप्रमाणे त्यांनी corona आटोक्यात आणला असताना!) यासारखे कुठलेही उल्लेख नसताना काही लोकांना त्याबाबतीत भासमय स्वप्ने पडत आहेत हे पाहून गम्मत वाटली.

शिवकाळात रोजच्या रोज चांदी खरेदी विक्रीचा रेट बदलत होता? आणि हा सगलीकडे लोकांना कसा समजत होता?
का हा रायगडावर चा रेट होता?
तांब्याच्या बदल्यात द्यायला महाराजांकडे इतकी चांदी कुठली होती? मुघल आणि आदिलशाही लुटून मिळवलेली चांदी महाराज तांब्याच्या बदल्यात इंग्रजांना विकत होते?

आणि हे उदाहरण आजच्या काळात कसे वापरणार ? क्लोरोक्वीनच्या 2 स्ट्रिपा कमी भरून की एक्सपायरी झालेले क्लोरोक्वीन भरून ?

लेखाचा विषय नक्की काय?
-------------
चीनशी व्यापार करावा का करू नये यावर मतं द्यायची आहेत का? करावा तर रेट काय लावावा? शिवाजी महाराज आणि बेडेकर शास्त्री प्रवचन हा एक वेगळा विषय आहे.

चीनशी आयात /निर्यात - ७०.४हजार/१६.७हजार दशलक्ष डॉलर्स आहे (इंडिया टुडे India Today मासिक, २३ मार्च). समजा कोरोना फक्त चीनमध्ये होऊन भारतात नसता तरीही ही आयात निर्यात थांबणार होती. मग या वस्तू कोणते देश आपल्याला देणार होते? इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रचंड.

बांगलादेश जीन्स पँट , मलमल निर्यात करतो ,
हे माहीत आहे पण पाकिस्तान फक्त अतिरेकी निर्यात करतो हेच माहीत आहे

पाकिस्तानहुन साखर , कांदे , ड्राय फ्रूट , खजूर , सीमेंट , केमिकल्स , कातड़ी वस्तु येतात म्हणे

गूगल करून बघावे , आम्हीहि तसेच शोधले आहे

आंतरराष्ट्रीय करारात असल्या मुळे आपण आयात थांबवू शकत नाही पण ज्या वस्तू आयात होतात त्या वर टॅक्स लावू शकतो.
त्याच प्रकारच्या देशी वस्तू निर्माण करून बाहेरच्या वस्तूंचा खप रोखू शकतो.
ह्याला जागतिक व्यापार करार रोखू शकणार नाही.

आंतरराष्ट्रीय व्यापारात असलो तरी वस्तूंचा दर्जा भिकार आहे सांगून येणाऱ्या गोष्टी वारंवार नाकारू शकतो.
असाही बऱ्याच चिनो वस्तूंचा दर्जा भिकार असतो.
तुम्हाला कायद्यात हजार पळवाटा शोधता येतात.
आणि तुम्ही बलदंड असला तर जगात तुमचे कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही.
बळी तो कान पिळी हेच शेवटी सत्य आहे.

The cost for Tylenol (paracetamol) oral tablet 325 mg is around $14 for a supply of 50 tablets,
अमेरिका भारतातून औषधे का विकत घेते?

Cipla paracetamol 650 mg 10 tablet cost Rs 10 only.

चीन बाबत आपण असे करू शकू का.
तो लगेच आसाम आमचा आहे,मेघालय आमचा आहे असे दावे तरी करतो .
नाही तर पाकिस्तान च्या गळ्यात गळे तरी घालतो.

चीन बद्दल जगात कुणालाच विश्वास वाटत नाही परंतु केवळ स्वस्त गोष्टी मिळतात म्हणून देश त्यांच्या कडून खरेदी करतात.

ही स्वस्ताई चिनी मजुरांच्या घामावर बेतलेली आहे. तेथे मजूर हे वेठबिगार सारखे काम करतात.
वातावरणाचे प्रदूषण मानवी हक्क इ गोष्टी चीनच्या शब्दकोशात नाहीतच.
चीनने आपली वाहतूक व्यवस्था अत्यंत अद्ययावत ठेवली आहे त्यामुळे कच्च आणि तयार माल याच्या वाहतुकीत कालापव्यय नाहीच. बहुसंख्य उद्योग सरकारी मालकीचे आहेत त्यांना स्वस्त भांडवल पुरवठा होतो. घाऊक प्रमाणावर उत्पादनामुळे(economies of scale) माल अत्यंत स्वस्त विकणे त्यांना परवडते.

चीनशी व्यापार करायचा की नाही हा निर्णय देशाला घ्यायचा आहे. जो निर्णय असेल तो मला मान्य आहे.
सध्या माझ्याकडे फक्त वापरात असलेला मोबाईल चिनी बनावटीचा आहे. बाकी बहुतेक गोष्टी टीव्ही फ्रीज म्युझिक सिस्टीम इ चिनी नाहीत.

चीन विषयी जास्त माहिती बाहेर येत नाही.
गूगल बाबा ला पण जास्त माहिती गोळा करून देत नाहीत चीन वाले.
नागपूर चा एक व्यक्ती आहे जो चीन मध्ये राहतो.
आणि मराठी मधून चीन विषयी vlogs बनवतो.
त्याचे व्हिडिओ यूट्यूब वर बघितले आहेत.
चीन हा अतिशय स्वच्छ देश आहे,रहदारी आणि गर्दी आपल्या सारखी नाही.
नद्या प्रदुषण मुक्त आहेत.
गरीब आहेत पण आपल्या सारखे अती
गरीब नाहीत.
Facebook, whatsapp var bandi aahe.
आपल्या पेक्षा सुंदर आणि सुनियोजित देश आहे तो.
कामगार ची पिळवणूक आपल्या कडे सुद्धा खूप होते ८/९ हजारात बारा बारा तास dutya करून घेतल्या जातात .
आपली कमी झाकण्यासाठी चुकीची माहिती चीन बद्द्ल दिली जाते असे माझे मत आहे.
कामगारांची पिळवणूक होते म्हणून ते वस्तू स्वस्त विकतात ही त्या प्रकारची च एक थाप आहे.

Pages