Mother and child candle ( inside candle break out)

Submitted by BLACKCAT on 29 April, 2020 - 05:30

जापनीज कँडल चा आज एक नवीन पेटर्न पाहिला

अनेक नावांनी हा ओळखला जातो
Mother and child candle
Mother and son candle
Mother and daughter candle
Mother and kid candle
Inside candle break out

यात आधी मदर कँडल दिसते , मोठी असते , तिच्यानंतर लगेच लहान कीड कँडल येते , कीड चे हाय , लो , ओपन , क्लोज मदरच्या आतमधे असतात.

दोन्ही कँडल चे रंग काहीही असू शकतात.
पण कीड कँडल झाल्यानंतर मदर कँडल चे हाय लो जर ब्रेक झाले तर मार्केट त्या दिशेने जाते. ब्रेक आउट लगेच पुढच्या काही कँडल मध्ये मिळतो.

IMG_20200429_145011.jpg

ह्यात बाण दाखवलेली हिरवी कँडल मदर आहे , त्याच्या लगेच पुढे लहान कीड कँडल आहे , नंतर लगेच बुलीश ब्रेक आउट आहे
असाच बेरिष ब्रेक आउट मिळू शकतो

पण कीड कँडल अगदी मदर च्या आत मध्ये असावी , हाय लो थोडे जरी मदरच्या बाहेर जात असेल , तर ते कन्सिडर करू नये.

IMG_20200429_145011.jpg

नेट वर याची रिलायलिबिटी 99% दिली आहे. यु ट्यूब वर व्हिडीओ आहेत

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रेक औटला तिसऱ्या किंवा पुढच्या कँडल ची क्लोजिंग बघायची असते, ती क्लोज झाली की मग त्यानंतर व्यवहार,

तुम्ही गोल दाखवला तिथे त्याचा क्लोजिंग नाही,

रिलायबिलिटी 99 % आहे म्हणे , म्हणजे कधी तरी फॉल्स होणार , त्यासाठी मदर कँडल चे हाय लो पैकी विरुद्ध टोक हेच स्टॉप लॉस होतात

माझे आजचे दोन्ही ट्रेड प्रॉफिट झाले
रिलायन्स 10 मिनिटात , ए सी सी मात्र 2 तास लागले , अर्थात स्टॉप लॉस आला होता, पण मी सोडला नाही, ए सी सी व सिमेंट सेकटर कच्चा माल स्वस्त झाला म्हणून न्यूज आली अन एकदम फटकन वाढले
मी शॉरट करून बसलो होतो , पण माझ्या मते ह्या बातमीने फार काय सोन्याचे पत्रे लागणार नव्हते , तसेही बांधकाम सगळीकडे बंदच पडले आहे Proud
मग दोन तासाने खाली आला, मार्केटनेही ओळखले , ह्या बातमीत फार दम नाही , नंतर खूप खालीच क्लोज झाला

IMG_20200429_211253.jpg

1 च्याही पूर्वी मी शॉर्ट केले होते
2. मोठा हिरवा बांबू - कच्चा माल स्वस्त झाला म्हणे -
3. कव्हर केले

झिरोडा मध्ये प्रत्येक शेअर च्या मध्ये एक न्यूज म्हणून लिंक असते , तिथे क्लिक केले की सगळ्या न्यूज ओपन होतात , मी हिरवे दांडके बघून मग न्यूज ओपन केली
आता इथून पुढे आधी न्यूज लिंक बघणे

ब्रेक औटला तिसऱ्या किंवा पुढच्या कँडल ची क्लोजिंग बघायची असते, ती क्लोज झाली की मग त्यानंतर व्यवहार,
>>>>>>>>>>>>
ओके, कलोजिंग महत्त्वाची आहे.धन्यवाद.

कधी कधी मदरला भरपूर किड्स असतात , एक कीड नंतरही अजून काही कीड होतात.
त्यानंतर मग ब्रेक आउट मिळतो
आज इन्ड्स इंड मध्ये दिसला

IMG_20200430_145231.jpg

एकापेक्षा जास्त किड्स असतील , तर थोडा वेळ लागतो , पण ब्रेक आउट चांगला मिळतो , असे म्हणतात,
इथे मदरला 9 किड्स आहेत , शेवटचा नववा कीड रेड मोठा कँडल आहे , मग ब्रेक आउट आहे,

त्यानंतर 462 पर्यंत खाली आला

हवा तसा ब्रेक आऊट मिळाला नाही. बहुतेक ५ मि. Candles
मध्ये reliability कमी असेल.

IMG_20200504_150504.jpg

2nd arrow ला breakout मिळाला