माबोची सर्च सुविधा सध्या काम करत नसल्याने आणि मुलांचे संगोपन/ माहिती हवी आहे या विषयातली असंख्य पाने चाळण्यासाठी वेळ आणि संयम नसल्याने हा नवीन धागा.
सध्या आमची गाडी आयुष्यातली जन्म, शिक्षण, नोकरी, लग्न अशी महत्वाची स्टेशन पार करून मुलांच्या शाळा या अतिमहत्त्वाच्या स्टेशन वर अडकली आहे. बाकी सर्व पालकांप्रमाणे आम्ही पण ही शाळा की ती शाळा या विषयावर तासंतास शिक्षणतज्ञ असल्यासारखे निष्फळ चर्चा करत आहोत.
काही दिवसापूर्वी आम्ही आमच्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याचा १०-१२ वर्षाचा मुलगा बॅडमिंटन स्पर्धेत दुसरा आला होता. आम्हीं त्याचे खूप कौतुक करत होतो. थोड्या वेळानी तो मुलगा आपल्या खोलीत निघून गेला आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा तो मित्र म्हणाला "अरे कसलं कौतुक करताय?? बॅडमिंटनचे टूर्नामेंट वगैरे काही नव्हती. २ मुलांच्या मॅचमध्ये हा हरला म्हणून दुसरा आला!!!" मित्र पुढे म्हणाला "मुलांना तुम्ही हरलात हे म्हणायचे नाही असे शाळेने सांगितले आहे. तसे म्हटले की मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणून तो त्याच्या खोलीत गेल्यावर हे तुम्हाला सांगितले" मी अवाकच झाले.

सविनय नमस्कार,
मातृभाषा शिक्षणाचं जगभर निर्विवाद सिद्ध झालेलं महत्व, महाराष्ट्रातील मराठी शाळांचं संवर्धन, पालकांच्या मनातील समज-गैरसमज, शासनाची धोरणं, शिक्षकांची तळमळ आणि कोंडी, पालकांची संभ्रमावस्था, मुलांवरचा ताण, इंग्रजी भाषा व इंग्रजी माध्यम अशा अनेक विषयांना धरून, मोठ्या प्रमाणावर पालकांचं, शिक्षकांचं आणि शाळांचंही एक महासंमेलन मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेलं आहे. २३-२४ डिसेंबर २०१७ रोजी, मुंबई येथे हे ऐतिहासिक महासंमेलन होईल.
डिजाइन थिंकिंग च्या आधीच्या भागात आपण बघितले की डिजाइन म्हणजे काय असते नक्की. आता बघूया की डिजाइन थिंकिंग म्हणजे नेमकं काय आहे. आणि शालेय शिक्षणात त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या एकूण सहभागाची परिणामकारकता कैक पटीने वाढवण्यासाठी कसा होऊ शकतो.
खरे तर हा सर्व प्रकार मस्तपैकी एखाद्या तासाभराच्या क्रॅशकोर्समध्ये पटकन समजू शकतो, कारण डिजाइन थिंकिंग ही कृतीआधारित विचारपद्धत आहे.
डीबीके अॅकॅडेमी, अहमदनगर
(देसरडा-भंडारी-करडक अॅकॅडेमी, उर्फ डॉ. भारत करडक अॅकॅडेमी!)
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सुरु केलेला हा नवा उपक्रम. महेश ट्युटोरिअल्स ची फ्रँचाईजी! नगर शहरातील दोन ठिकाणी व पाथर्डी या तालुक्याच्या ठिकाणी असे तीन ठिकाणी उत्तमरित्या चालु आहे.
इ. ८-९-१० ला शहरात उत्तम प्रतिसाद आहे.
इ. ११-१२ ला पाथर्डी मध्ये उत्तम प्रतिसाद आहे. नगर शहरात एप्रिल २०१८ ला इ ११ वी नव्याने लाँच करित आहोत!
धन्यवाद!
शिक्षण पद्धतीतील क्रांतीकारी बदलासाठी नगरकरांनो व्हा सज्ज !!!
"अमिबा नाही!! मडीबा! म डी बा!! नेल्सन मंडेला ना प्रेमाने मडीबा म्हणत होते.अमिबा वेगळा.तो प्राणी असतो.मडीबा म्हणजे महात्मा सारखं पेट नेम."
सहामाही म्हणजे हाफ इयरली परीक्षा आणि हिंदी, सामुदायिक जीवन(हल्ली याला इ व्ही एस की कायसं म्हणातात) पेपराच्या आधी आलेली सुट्टी यामुळे उजळणी घेणं चालू होतं.
काल रात्री झोपताना, पडल्यावर स्वनिकची चुळबुळ चालू होती. म्हटलं,"झोप आता सकाळी उठत नाहीस". काही वेळाने म्हणाला,"मी ते शाळेच्या लायब्ररीचं पुस्तक परत दिलं नाही तर मला दुसरं घेता येणार नाही. ". म्हटलं,"मग?". म्हणे,"मग फक्त तिथेच वाचून परत यावं लागतं. घरी आणायला मिळत नाही." त्याला विचारलं,"तू घरी आणलं होतंस का?". आम्हाला तर माहीतही नव्हतं. आम्ही दोघेही त्याला सांगू लागलो की शाळेचं पुस्तक घरी आणायचं नाही, तिथेच वाचून परत करायचं. आता त्याला कारण म्हणजे आमचे आधीचे अनुभव. मुलीने मागच्या वर्षी असंच एक पुस्तक आणलं होतं, सहा महिन्यांनी ने घरात सापडलं.
तुम्ही मुलांना JCC मध्ये टाकले असेल तर कृपया आपली मते सांगा. तिथल्या jewesh पद्धतीचा वाईट परिणाम होतो का मुलांवर?
शिक्षण कसे आहे ?सवयी योग्य लागतात का?
मी माझ्या ३ वर्षे मुलाला तिकडे टाकण्याचा विचार करते आहे.
जगण्याच्या लढाईत तुटला
कधी लुकलुकलेला तारा
पोटापाण्यासाठी झाला
माझ्या बुद्धीचा कोंडमारा ॥धृ॥
पाठीवरले ओझे सरस्वतीचे
खुंटीवरती जाऊनी विराजले
नाजूक कोवळे हात माझे
लोखंड उचलूनी जडावले ॥१॥
स्वप्नं निरागस आशेची
डोळ्यांदेखत कुस्करली
गालांवरती ओघळणारी
आसवं सुकूनी स्थिरावली ॥२॥
हात धरूनी चालणारे
जिवलग सोबती दुरावले
बोल लावती जळणारे
आप्त स्वकीय निर्ढावले ॥३॥
दु:खावेगाला भरती येई
दिसता शाळेत जाणारे
अस्वस्थ मनी हैराण होई
विचार येती 'पोखरणारे' ॥४॥