जेविश कॉम्मुनिती सेंटर JCC

Submitted by रमाराघव on 18 September, 2017 - 16:23

तुम्ही मुलांना JCC मध्ये टाकले असेल तर कृपया आपली मते सांगा. तिथल्या jewesh पद्धतीचा वाईट परिणाम होतो का मुलांवर?
शिक्षण कसे आहे ?सवयी योग्य लागतात का?
मी माझ्या ३ वर्षे मुलाला तिकडे टाकण्याचा विचार करते आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही Jewish Community Center पक्के ठरवले आहे का एक ऑप्शन म्हणून विचार करता आहात? इतर काही पर्याय आहेत का?

सॉरी मी Jewish Community Center बद्दल सांगू शकत नाही पण तुमच्या शंका आम्हाला कॅथलिक स्कूल बद्दल होत्या. माझी मुलगी लहान होती तेंव्हा कॅथलिक स्कूल आणि Local YMCA असे पर्याय होते. आम्ही Local YMCA असे निवडले आणि आम्हाला त्याचा चांगला अनुभव आला.

मला ज्युइश कम्युनिटी सेंटरचा अनुभव नाही. पण कुठलेही डे केअर निवडताना तिथे एकदा तरी जाऊन सर्व रुम्स, टीचर्स , नॉन टीचिंग स्टाफ, स्वच्छता, खेळायची जागा, जेवाखायची सोय , सेक्युरिटी हे स्वतः पाहून घ्या. माझ्या ओफिसपासून जवळ म्हणून सोयीच्या वाटणार्‍या डेकेअर मधे ४ वर्षाच्या वरच्या मुलांना नॅप टाइम मधे हॉल वे मधे झोपायला लावत होते .

तुम्ही जे कुठलं डेकेअर शॉर्ट लिस्ट कराल तिथे जाणार्‍या मुलांच्या पालकांशी बोलून घ्या.

असं जेनेरिक कसं काय सांगणार पण?
ज्युईश पद्धतीचा वाईट परिणाम म्हणजे काय? तीन वर्षाच्या मुलाला/ मुलीला योग्य सवयी म्हणजे कुठल्या? पॉटी ट्रेन करणे आणि मॅनर्स शिकवणे सोडून आणखी काय अपेक्षित असणारे?

धन्यवाद मेधा,अजय आणि अमितव. हि माहिती मला कामात पडेल.
मी टूर घेतला आणि सगळं ठीक वाटले.फक्त दर friday ला त्यांच्याकडे शबाथ चे रीतुअल आहे .आम्हाला जरा त्याची थोडी काळजी आहे कि आमचा मुलगा त्याला कसे interpret करेल. तो गोंधळून जाऊ शकेल असे वाटले.त्यांचा शिक्षणामध्ये जुई सणाची माहिती पण शिकवतात.
बाकी ते daycare सारखे एन्विओर्न्मेन्त नाही ,शाळा आहे ९ ते २ आणि मग २ ते ६ क्लास्सेस. थंक्स पुन्हा.

कुठल्याही पब्लिक स्कूल मध्येही हानुका, दिवाळी बद्दल सांगतातच की! गेल्यावर्षी पोराने मला मनोला (मनोरा ) आणि त्यात कशा 7 मेणबत्त्या रोज एक एक करून लावतात ते सांगितलेलं. शाळेत एका ज्यु मुलाची आई आर्ट करायला आलेली. मला भारी वाटलेलं ते.
टीचरने आम्हाला पण एक दिवस येऊन दिवाळी बद्दल सांगायला आणि एक अ‍ॅक्टीव्हीटी घ्यायला सांगितले होते.

त्या वर्षी मग आम्ही आवर्जून रांगोळी आणि पणत्या लावून दिवाळी साजरी केलेली Proud

कुठल्या कुठल्या धार्मिक गोष्टी शाळेत शिकवतात / करुन घेतात याविषयी शाळेच्या प्रिन्सिपलशी / मुलाच्या टीचरशी बोलून घ्या. त्यातल्या कुठल्या शाळेपुरत्या मर्यादित आहेत आणि कुठल्या मुलांनी घरी पण करणं अपेक्षित आहे हे विचारुन घ्या. या विषयी पालक म्हणून तुमची काय काय ऑब्लिगेशन आहेत तेही विचारा. हे सगळं पटलं तर जरुर घाला.
माझी भाची कॅथलिक डे-केअर मधे जायची. घरी येऊन कायकाय अगम्य बडबडायची. एका टोपलीत बाहुली ठेवून, त्यावर टॉवेल किंवा हे(गवत) टाकून , ती टोपली हातात घेऊन "मी मदर मेरी आणि हा बेबी जीझस आहे" असले खेळ खेळायची. मधून मधून "आमेन" म्हणायची. पण पहिलीला पब्लिक स्कूलला गेली आणि तिची ती फेज संपून गेली.

<<<<कुठल्या शाळेपुरत्या मर्यादित आहेत आणि कुठल्या मुलांनी घरी पण करणं अपेक्षित आहे>>>>
नि वेळीच सांगून टाका की आम्ही ज्यूइश नाही, आम्ही हे घरी करणार नाही.
हिंदू रिच्युअल्स करताना मारामार - आणखी ज्यूइश कशाला पाहिजेत?