शाळांविषयी माहिती हवी आहे: अक्षरनंदन आणि लॉयला,पुणे

Submitted by अतरंगी on 18 December, 2017 - 04:00

माबोची सर्च सुविधा सध्या काम करत नसल्याने आणि मुलांचे संगोपन/ माहिती हवी आहे या विषयातली असंख्य पाने चाळण्यासाठी वेळ आणि संयम नसल्याने हा नवीन धागा.

सध्या आमची गाडी आयुष्यातली जन्म, शिक्षण, नोकरी, लग्न अशी महत्वाची स्टेशन पार करून मुलांच्या शाळा या अतिमहत्त्वाच्या स्टेशन वर अडकली आहे. बाकी सर्व पालकांप्रमाणे आम्ही पण ही शाळा की ती शाळा या विषयावर तासंतास शिक्षणतज्ञ असल्यासारखे निष्फळ चर्चा करत आहोत.

आमच्या शॉर्टलिस्ट मध्ये अक्षरनंदन आणि लॉयला ह्या दोन महत्त्वाच्या शाळा आहेत. दोन्ही शाळा माझ्या माहितीप्रमाणे अगदी परस्पर विरोधी आहेत. लॉयला कॉन्व्हेंट/अक्षर नंदन मराठी, लॉयला स्पर्धात्मक आणि अक्षर नंदन स्पर्धेपेक्षा सहकार्यावर भर देणारी, लॉयला अनुदानित आणि अक्षर नंदन विना अनुदानित. मला या दोन्ही शाळांची माहिती हवी आहे.

मायबोली वर मराठी शाळांविषयी आणि चांगल्या शाळांविषयी जेव्हा चर्चा होते तेव्हा पुण्याच्या अक्षरनंदन शाळेचे नाव निघतेच.
सर्व जण म्हणतात की शाळा चांगली आहे प्रयोगशील आहे. मी शाळेविषयी भरपूर ऐकलेले/ वाचलेले आहे पण ज्यांची मुले त्या शाळेत जातात अशा एकाही व्यक्तीला मी वैयक्तिकरित्या ओळखत नाही.मायबोलीवर अनेक जण आहेत ज्यांची/ज्यांच्या ओळखीच्यांची मुले या शाळेत आहेत. त्यामुळे काही first hand reviews हवे होते.

लॉयला कित्येक वर्षे पुण्यातल्या प्रतिष्ठित शाळांमध्ये नाव राखून आहे. खरे तर ह्याच शाळेला माझं प्राधान्य होतं.
पण लॉयलाविषयी आमच्या एका नातेवाईकांकडून जरा निगेटिव्ह मत ऐकले आहे.
शाळेत extra curriculum activities खूपच आहेत, त्यात खूप वेळ जातो, होमवर्क खूप देतात, मुलांना अभ्यासाचे आणि बाकी activitiesचे फार प्रेशर देतात, मुलांनी शाळेत मराठीत बोलायचे नाही वगैरे असे काय काय नियम आहेत. हे सर्व खरे आहे की ते ज्या पद्धतीने पाहत आहेत ते चुकीचे आहे ते कळत नाही. So again we need some first hand reviews....

माझ्या डोक्यात काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे हवी आहेत पण ते प्रश्न लिहिले की चर्चा त्या पुरती सीमित राहील म्हणून ते इथे लिहित नाही.

ज्यांची/ज्यांच्या ओळखीच्यांची मुले या शाळेत आहेत त्यांनी शाळा कशा आहेत याविषयी डिटेल मध्ये लिहा प्लिज

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षरनंदन मधे माझ्या बहिणीची दोन्ही मुलं आहेत पहिल्यापासुन. आता मुलगा ७वीत आहे. ती फार खुश आहे शाळेवर व मुलांनाहि खुप आवडते शाळा.

मैत्री च्या मेळघाटातील आनंद मेळाव्या करता अक्षर नंदन शाळेतील काही मुले आणि काही पालक (काही पालक आणि मुलेही एकेकटी देखिल आलेली आहेत. ) गेली काही वर्षे सातत्याने येत आहेत. मागील वर्षी मला ही मंडळी भेटली होती.

मला अक्षरनंदन शाळेबद्दल शाळा म्हणून ती कशी आहे हे नीट सांगता येणार नाही.
पण हे नक्की सांगू शकतो की त्या शाळेत शिकत असलेली मुले आणि त्यांचे पालक शाळेवर मनापासून प्रेम करतात.

चैत्राली आणि हर्पेन,

अक्षरनंदन मधील मुले आणि बाकी इंग्रजी माध्यमात/स्पर्धात्मक वातावरणात वाढणारी मुले यांच्यात काही सकारात्मक/नकारात्मक फरक जाणवतो का ? अक्षरनंदन ही मराठी शाळा आहे आणि स्पर्धेपेक्षा सहकार्यावर अधिक भर आहे म्हणून विचारतो आहे.

@ अतरंगी : मी अक्षरनंदनला ४-५ वेळा भेट दिली आहे आणि संचालिका विद्याताई पटवर्धनांनासुद्धा २-३ वेळा भेटलो आहे. मला तरी शाळा फार आवडली. माझ्यामते तुम्ही विद्याताईंना भेटा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते त्यांना विचारा. त्या रोज शाळेत नसतात तेंव्हा फोन करुन आणि अपॉईंटमेंट घेउन जा.

चैत्राली आणि हर्पेन,

अक्षरनंदन मधील मुले आणि बाकी इंग्रजी माध्यमात/स्पर्धात्मक वातावरणात वाढणारी मुले यांच्यात काही सकारात्मक/नकारात्मक फरक जाणवतो का ? अक्षरनंदन ही मराठी शाळा आहे आणि स्पर्धेपेक्षा सहकार्यावर अधिक भर आहे म्हणून विचारतो आहे.

मला असं काही सांगता येणार नाही, कारण मी म्हटले तसे त्या शाळेबद्दल त्याप्रकारची / तितकी माहिती नाही.
मी अक्षरनंदनच्या एका पालकांशी बोललो आहे त्यांच्याशी बोलून घेतलेले चांगले राहील.

माझी मुले अक्षरनन्दनचे विद्यार्थी आहेत. मोठा आता दहावी होऊन बाहेर पडला आणि धाकटा शाळेत आहे. शाळा अनेक अर्थांनी वेगळी आहे. पुर्ण मराठी माध्यम आहे. विज्ञान व गणितही मराठीतून आहे. भाषा म्हणून इंग्रजीची तयारी उत्तम केली जाते. मुले फाडफाड इंग्रजी बोलत नसली, तरी शाळेतून बाहेर पडल्यावर इंग्रजीचा न्युनगंड असत नाही. पुस्तकी शिक्षण न देता ते समाजाशी, अनुभवांशी, जगण्याशी जोडले जावे असे प्रयत्न केले जातात. वाचनसंस्कृती जोपासली जाते. सांगण्यासारखं खूप आहे.
हा शाळेच्या एका माजी विद्यार्थिनीने लिहिलेला ब्लॉग नकी वाचा:
http://muktaangan.blogspot.in/2017/02/blog-post.html

>>अक्षरनंदन मधील मुले आणि बाकी इंग्रजी माध्यमात/स्पर्धात्मक वातावरणात वाढणारी मुले यांच्यात काही सकारात्मक/नकारात्मक फरक जाणवतो का ?>>
सकारात्मक फरक नक्कीच जाणवतो. इथून बाहेर पडणारी मुले कारिअरच्या ठराविक वाटा न चालता स्वतःला काय आवडतंय त्याचा विचार नक्कीच करतात. त्या वेगळ्या वाटा असल्या तरी त्यावरून जाण्यचे धैर्य दाखवतात.
शाळेतून मुलांना चौथीपर्यंत कोणत्याही स्पर्धा परिक्षेला बसवत नाहीत. पाचवीनन्तर पुढे मुले (आपापली तयारी करून) बसू शकतात.
विनाअनुदानित आणि वेगळ्या वाटेवरची शाळा असल्याने शाळेच्या काही मर्यादाही आहेत, पण शाळा कमी पडते तिथे पालक पुढे होऊन मुलांसाठी प्रयत्न करतात.

प्रकारची आनंद्क्शण शाळा आहे असं ऐकल आहे.. कर्वेनगर मधे..त्या शाळेबद्दल कोणाला माहिती आहे का?>>>>>

आमच्या समोरच्या बंगल्यातच ही शाळा चालू झाली होती,
तिला "शाळा" म्हणता येणार नाही कारण पटसंख्य खूपच कमी होती, काही लोकांनी एकत्र येऊन चालवलेले फॉर्मल होम स्कूलिंग असे वर्णन जास्त बरोबर राहील.

पण गेल्या जून पासून त्या बंगल्यात दुसरे लोक राहत आहेत, शाळा रेलोकेट झाली की बंद झाली माहीत नाही.

पण याच पद्धतीची एक शाळा डहाणूकर soc मध्ये आहे, नाव विसरलो.

धन्यवाद .. आनंदक्षण आता कर्वेनगर मधे स्थलांतरित झाली आहे. पुर्वि क्शिप्रा जवळ होती.. आणि हो.. पट्सम्ख्या कमी वाट्ली.. पण एकंदरित फीड्ब्य़क काहि मिळत नाहिय..

शुध्द्ले़खणा बद्द्ल क्श्मस्व.. लिहितोय हळुहळू.. फार पुर्वि माबो सदस्य होतो..२००३-४ वैगैरे असेल..नंतर फक्त वाचना साठि यायचो..आता नाव आणि पासवर्ड दोन्हि विसरलोय..असो..

लंपन,
विद्याताईना जानेवारीत भेटणार आहोत.

चैत्राली, तुमचा ईमेल आला नाही. स्पॅम आणि इनबॉक्स दोन्ही चेक केले. मी तुम्हाला माझा ईमेल आयडी संपर्कातून कळवतो.

हर्पेन ,पालकांचा रेफरन्स दिल्याबद्दल धन्यवाद, लवकरच त्यांना संपर्क करतोय.

अदीजो,
प्रतिसदाबद्दल आणि ब्लॉगच्या लिंक साठी धन्यवाद. मला तुमच्याकडून अधिक माहिती हवी आहे. तुम्हाला संपर्कातून ईमेल करतो.

धन्यवाद .. आनंदक्षण आता कर्वेनगर मधे स्थलांतरित झाली आहे. पुर्वि क्शिप्रा जवळ होती.. आणि हो.. पट्सम्ख्या कमी वाट्ली.. पण एकंदरित फीड्ब्य़क काहि मिळत नाहिय.. >> maazee mulagi grammangal la jate. Gram mangal ani anandkshan chi concept same ahe. Amaraja (mukhyadhyapika) khup passionate vatali bolalyavar. shalela donada bhet dili, vatavaran, mulancha vavar, vargat chalaleli shikavani paddhat avadali.
Grammangal, anandkshan, wai madhali kirloskaranchi shala, waimadhil anandghar - rachanatmak shikshan paddhateene chalate.
mala attaparyant tari grammangal khup avadali ahe. palakansathi shikshakanche training compulsory asate - tyat pratyek goshti mage shastriy vichar kelela disato.
8 varshache hoi paryant mulanchya brain madhe jodanya hot asatat, toparyant, tyanni satat eka jagi basun nahi shikale pahije. Ganit, bhasha, vachan poorva tayari, lekhan poorva tayari, parisar abhyas, shastra hya sagalyat khel, ganee, actual anubhav hyatun goshti vhavyat hyasathi shala prayatnashil asate.
gross ani fine mortar skills develop vhavet mhanun khel, activities asatat.
mul sujan nagarik vhavit, jababadar vyakti vhavit mhanun prayatn asatat.

lahan mulansathi vyavahar shikshan asate. Dar guruvari, balawaditali mule, khau tayar karane aaNi khane hya activities karatat, jyat nivadane, solane, chirane asha vividh goshti asatat. hyache gharihi changale parinam disatat.
Palak hi khup vegavegala prayog karanare asatat personal life madhe.. ghisepite karanare nasatat ase mala disale. school activity madhe palakancha hi bharapur sahabhag asato.
shaleche ekandar vatavaran relax aahe. mul zadakhali, dorichya shidivar vagaire basunahi abhyas karatana disatat.
Prathamik shikshanakarata hee paddhat changali ahe ase ekandarit mat aikale. anek palakanchi mule pudhachya vargatahi ahet. They are happy.
so far we are happy with the school (duration 6 months - junior kg).

अक्षरनंदन विषयी वर दिलेला ब्लॉग अतिशय आवडला. अश्या शाळेत शिकायला नक्की आवडले असते. अगदी मनापासून लिहिलेय मुक्ताने.

चांगला धागा व चर्चा.
तुम्हाला शुभेच्छा , कुठे प्रवेश घेतला ते नन्तर इथे लिहा.

अक्शरनंदन मधे शिकलेला एक आर्किटेक्ट आमच्या ऑफिस्मधे काम करायचा. त्याच्या वयाच्या इतरांपेक्षा व्यवधान , जाण , अन विषयाची सखोल माहिती , त्याच्याकडे जाणवण्या इतकी जास्त होती. !
माझ्या मैत्रीणीची दोन्ही मुल तिथे शिकतायत. पालक अन मुल दोघेही खूष आहेत.
लोयोला अन अक्षरनंदन मधे तुलना कर्ण्या इतकेही साम्य नाही. माझा लेक लोयोलात शिकला , अत्यंत सुंदर मैदान , स्विमींग पूल वगळता तिथे काहीही नावाजण्यासारख उरलेल नाही. फार पूर्वी मिशनरी वृत्तीनी शिकवणारे शिक्षक होते. आता ची खोगिर भरती पहाता तो दर्जाही घसरलेला आहे. स्पर्धात्मक वगैरे तर अजिबातच नाही. पालकच काय ते हौस म्हणून कोण्कोणत्या परिक्षाना बसवतात. शाळेच सहकार्य शून्य! अनुदानित शाळा आहे त्यामुळे बरेच आर्क्षणाबद्दलचे नियम पाळता पाळता , शिक्षकांची योग्यता हा गुण गौण झालाय दुर्दैवानी. सॉरी हे फारच निगेटिव्ह झाल , पण लोयोला ऐवजी ऑर्किड , भारतिय विद्या भवन , एन सि एल , चा विचार करता येइल.

नानबा,
अक्षर नंदन, आनंद निकेतन, ग्राम विकास या सारख्या शाळा खरेच मुलांना योग्य पद्धतीने शिकवत आहेत असे वाटते.

बाकी ठिकाणी चाललेली इंग्रजी बोलणारे रेसचे घोडे बनविणाऱ्या सो कॉल्ड शाळा बघितल्या की यांची शिकवायची पद्धत जास्त उठून दिसते आहे.

इन्ना,
लॉयलाचा फीडबॅक दिल्याबद्दल धन्यवाद.

मा.स.गोळवलकर गुरूजी प्रशाला पण चांगली आहे मराठी माध्यमासाठी, पाचवीपासुन गणित आणि विज्ञान इंग्रजीमधे आहे.

Sb road

आनंदक्षण माहित नाही. आनंदनिकेतन' आहे नाशिकला, अक्षरनंदन सारखीच...
हे मीच लिहीलं होतं 2019 मधे..

आता 2022 मधे माझी मुलगी आनंदक्षण मधेच जाते.
तिला शाळेत घालायच्या वेळी शोध घेताना ह्या शाळेचे नाव परत समोर आलं. चौकशी केल्यावर बरेच चांगले reviews मिळाले.
व प्रिंसिपल madamला ही भेटलो.
मग ईथेच प्रवेश घेतला.