मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा किती घसरलाय ?

Submitted by विचारजंत on 28 November, 2017 - 12:14

शहरात नवे तर गावात सुद्धा आता लोक इंग्लिश माध्यमात जात आहेत , आणि मराठी माध्यमाचे commercial benefits तसे काही फार नाहीत . जिकडे अतीव स्पर्धा आहे तिकडे मराठी माध्यमाची मुले - ते पण गेल्या -१०-१२ वर्षात आहेत का ? या विषयावरून माझा वाद झाला तेव्हा मी काही प्रश्न विचारले होते -

बाय दि वे गेल्या १५ वर्षात मराठी माध्यमातून किती मुले IIT / IIM ला गेली ? यावर एकदा दुसरीकडे वाद झाल्याने मी हि माहिती मागितली होती . तसेच मी recruitment मध्ये काही काल होतो , त्यामुळे अनेक bio data बघायला लागायचे त्यावरून हा निष्कर्ष काढला आहे . २००० सालापूर्वी मराठी medium दर्जा खूप चांगला होता पण आता तो घसरला आहे . मागे काही कारणासाठी मी भारतातील top १०० startups बघत होतो , त्यात मराठी नावे खूप कमी होती आणि त्यांच्य्ही profiles linkedin वर बघितल्या तर मराठी शाळांचे असावे असे वाटले नाही .

तरुण मुलांबाबत प्रश्न

१) गेल्या १२ वर्षात मराठी माध्यमातून IIT/IIM सारख्या संस्था मध्ये किती जण गेले ? ( पूर्वी काही जण होते , पण त्यावेळी शाळेचा दर्जा हि चांगला होता

२) मेडिकल बद्दल खरेच माहिती नाही पण गेल्या १२ वर्षात मराठी माध्यमातून किती जण चांगल्या मेडिकल कॉलेज ला गेले ?

३) भारतात ३५ शी च्या आसपास आणि १ करोड पर्यंत पगार घेणारी मराठी माध्यमाची किती मुले असावीत ?

४) IAS / UPSC मध्ये मराठी माध्यमातील मुलांची स्थिती काय आहे ? हि चांगली असावी असा अंदाज आहे .

कोठल्याही वयातील मराठी माध्यमाच्या मुलांबद्दल

१) मराठी माध्यमातील किती जण आजच्या टॉप चे पगार असलेल्या नोकरीत आहेत ?
२) मराठी माध्यमातीलअनेक जण IT त आहेत पण त्यापेक्षा हि अधिक पगार देणारी consulting , इन्व्हेस्टमेंट बँकिंग , private बँकिंग मध्य किती आहेत ? (
४) टॉप ५ कन्सल्टन्सी चा सर्व्हे मी केला होता , त्यात काही मराठी लोक आहेत पण प्रोफाईल्स बघता मराठी माध्यमाचा कोणी आढळला नाही .
५) तीच गोष्ट अमेरिकेतील भारतीय वंशांच्या CEO ची . त्यातील जवळपास सर्व मराठी नावांची प्रोफाईल्स मी बघितली होती त्यात मराठी माध्यमातील कोणी आढळला नाही ( कोणी असेल तर जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा).

२-३ वर्षांपूर्वी आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेची अधोगती का होत आहे आणि यावर काय करता येईल याची एक समिती बसली होती . त्या वेळी मी मराठी माध्यमाच्या शाळेतील चमकल्या विद्यार्थ्यांवर संशोधन केले . तसेच मी त्या वेळी recruitment मध्ये काम करीत असल्याने अनेक वरिष्ठ प्रोफाईल्स रोज बघत होतो आणि अनेक प्रोफाईल्स खास करून इंजिनीरिंग आणि management च्या पालथ्या घातल्या . ४० च्या वर काही मराठी मुले चमकत आहेत . पण ४० च्या खाली परिस्थिती वाईट आहे .

तरी माझा data सर्वसमावेशक आहे असे म्हणत नाही . तर वरील विचारलेले काही उदाहरणे असतील तर सांगा . म्हणजे नाव , काय शिकलाय , आणि आता काय करतोय

मराठी लेखनाची स्थिती तर अतिशय वाईट आहे . मराठीतून लिहून तर कोणालाही पोट भरणे शक्य नाही , तेच तिकडे आमिष त्रिवेदी आणि चेतन भागात सारखा लेखक कॉर्पोरेट मधली मोठी नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक बनतात !
आजही मराठी आणि इंग्लिश पत्रकारांच्या पगारात बरीच तफावत आहे . काही वेळा तर ती प्रचंड आहे . मराठीत नियतकालिक चालवणे आत्बात्त्याचे झाले आहे . मराठीमध्ये Fashion or Lifestyle साठी कोणतीही नियतकालिके नाहीत . अशाच एका नियतकालिका च्या ग्रुप मध्ये २ नियतकालीकांचा संपादक असलेल्या माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीस ४० लाखाच्या आस पास पगार आहे आणि तो Mercedes C Class मधून फिरतो . मराठीत एवढा पगार सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्र संपादकास हि मिळत नसावा . ( हे माहितीतील उदाहरण आहे म्हणून दिले आहे )

तसेच आता साईट चालवत असल्याने अतिशय उत्तम इंग्लिश येण्याचे फायदे रोज दिसतात - माझ्या साईट साठी तर ते काम माझा पार्टनर च बघतो . Content लिहिणे हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय आहे , मी यातल्या अनेक लोकांना भेटलो आहे , मला तर मराठी माध्यमाचे कोणी भेटले नाही !

मला सर्वात आधी फक्त मराठी माध्यमातून शिकलेली आणि गेल्या १०- १२ वर्षात Top Institutes ( IIT / IIM / INSEAD / Harverd / Stanferd / Cambridge / Oxford / London School of Economics / Sloan etc) गेलेली मुलांची नावे पाहिजे आहेत .

Group content visibility: 
Use group defaults

मराठीतून लिहून तर कोणालाही पोट भरणे शक्य नाही ,
*
३) भारतात ३५ शी च्या आसपास आणि १ करोड पर्यंत पगार घेणारी मराठी माध्यमाची किती मुले असावीत ?
*

असली भोंगळ विधाने वाचून डोळ्यांत जंत झाले.

साहेब, करोडोत पगार घेण्यासाठीच्या पदव्या देणारं कॉलेज (११वी नंतर) विंग्रजी माध्यमाचं अख्ख्या होल इण्ड्यात होतं. तुम्ही करोडोत पगार देणारे मराठी भाषिक व्यवसाय सांगा, (महाराष्ट्र सरकार सोडून. तिथे सगळे मंत्री संत्री पासून सगळे करोडोत कमवतात, अन कित्येक कारकूनही मराठी शाळेत शिकून नोकरीत येतात.) मी तुम्हाला तिथले टॉप सीईओ कोणत्या माध्यमात शिकले ते सांगतो.

प्लस, जितके इंजिनियर गेल्या १२ वर्षांत (महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमातून) पास झाले त्यापकी किती लोकांना १ करोडचं प्याकेज आहे, त्या लोकांचं पर्सेंटेज किती? अन किती इंजिनियर्स बीई/डिप्लोमा करून २-५ हजारावर नॉन इंजिनेरींग नोकर्‍या करताहेत, त्याचं पर्सेंटेज किती, ते लिवा पाहू?

रच्याकने.

मराठीत लिहून पोट भरणारे अनेक लोक ठाऊक आहेत. कुठल्याही तालुक्याच्या गावी जाऊन कोर्टाबाहेर बसलेले स्टँप वेंडर कोणत्या भाषेत लिहितात, अन कसं पोट भरतात त्याचा जरा "रिसर्च" केलात तर बरे.

प्रत्येक गोष्टीचा संबंध पैशाशी का जोडलाय? एखादा मराठीत शिकलेला काही हजार-लाखांचं पॅकेज असलेला माणूस इंग्लीश माध्यमात शिकलेल्या कोट्यवधी रुपये कमविणाऱ्या माणसापेक्षा जास्त आनंदी आणि समाधानी असला तर ....

आ.रा.रा.
सभ्य मार्गाने सर्व भरून हि व्यवस्थित पैसे कमवता येतात - मला अशा प्रकारचे उत्पन्न अपेक्षित आहे . आणि एक बर्यापैकी संख्या करोड च्या आसपास package घेणाऱ्या ३५ वयातील पर्यांच्या मुलांची आहे . फार अधिक नसतील पण अगदीच ५-६ अशी कमी पण नाही .Consultancy , Investment Banking , Venture Funding मध्ये असे पगार आहेत.
मी अन्गीतले आहे कि मी एका top end recruitment कंपनी साठी काम केले होते . त्यामुळे असे लोक काही कारणाने मी पहिले आणि त्यात मराठी मुले होती पण मराठी माध्यमाची कोणी नव्हती . किंवा मी असे समजतो कि मला सापडली नाहीत . त्यामुळे मी काही एका जबाबदारीने तर्क करीत आहे .
माझ्या दहावीच्या batch मध्ये ( १९८९ ) बरीच मराठी माध्यमाची मुले हि बर्याच चांगल्या कॉलेज मध्ये जात होती आणि त्यातले आज काही उच्चपदस्थ आहेत . पण मला असे मराठी माध्यमातून आलेले Ultimate Performers कोणी आढळत नाही . होय मोठ्या प्रमाण सर्वत्र engineer / MBA होत आहेत पण ultimate institutes मध्ये मराठी माध्यमाचे कोणी आढळत नाही
सध्या तरी माझा उद्देश माहिती गोळा करण्याचा आहे पण ५-६ वेळा या विषयांवर वेगवेगळ्या ग्रुप मध्ये वाद झाले ( फेसबुक , whatsapp , वेब साईट ) तेव्हा मला स्वार्थी , मूर्ख आणि बरेच काही म्हटले गेले पण कोणीही एक हि Top Performing तरुण मराठी माध्यमाच्या मुलाचे नाव सांगू शकले नाही .
आणि लोकांनी सांगितले कि नवीन मुले नोकरीत नाही धंद्यात येतात म्हणून मी new business / top startups data बगीतला त्यातही मला तरुण मराठी माध्यमाची मुले दिसली नाहीत .
तर इतर फाटे फोडण्यापेक्षा माझ्या तोंडावर काही नावे मारा !
दुसरा मुद्दा आहे मराठीत लिख्नानाचा , म्हणजेचम्हणून मराठी लेखक / पत्रकार म्हणून उपजीविका करण्यचा . तुम्ही या विषयाचे हि केलेले interpretation बघून धन्य झालो . होय कोर्टाबाहेर बसलेले स्टँप वेंडर हि पोट भरतात पण मला नाही वाटत कि ते पोट भरण्यासाठी कोठ्लाय पंचतारांकित हॉटेल मध्ये कधीतरी जात असतील .. मी मराठी लेखकांची कामैची इंग्लिश लेखकांबरोबर करीत होतो , तुम्ही तर या गरीबंबरोबर करून त्यांच्या गरिबीचा मजाक उडवला आहे .

माझ्या शिक्षिकेचा मुलगा1 iit- खरगपूर मधुन शिकलाय. 30च्या आसपास वय असेल. 10 पर्यन्त मराठी माध्यमात.
माझी भाची iit-rourkee मधून. 27-28 वय असेल. 10वि पर्यन्त मराठी.
नावगाव privacy कारणाने देणार नाही.

धन्यवाद राजसी , म्हणजे iit त अजून मराठी माध्यमाची मुले जातात हि आनंदाची बातमी आहे .
बाकीच्या institutes मध्ये पहिले पाहिजे
पण top च्या management consulancies / investment banking मध्ये मराठी माध्यमाची मुले आएत का ? Linkedin वर तरी कोणी दिसले नाही .

आणि कोपऱ्यावरचा किराणामाल दुकानदार सगळ्यात श्रीमंत असतो ? तुम्ही हा कोणता दुकानदार म्हणत आहात ? आपण कोठे राहता ? हा आपला दुकानदार कोठे राहतो ? म्हणजे हा दुकानदार Ferrari / Porsche / Maserati अशी गाडी घेवून फिरतो ? १०-१२ करोडोंच्या Flat मध्ये राहतो ? सुपर !!

राहुल UPSC मध्ये काय ? UPSC चा दर्जा वर असतो न ? पण मला वाटते कि UPSC / MPSC हेच मराठी माध्यमाच्या लोकांसाठी उरले आहे काय ? Awaiting Data

माझा क्लासमेट, दहावीपर्यंत पूर्ण मराठी (सेमी-इंग्लीशही नाही). पदव्युत्तर बीट्स, पीलानी. सध्या जॉब गुगल अर्थ व मॅप्सचा डिव्हिजनल मॅनेजर म्हणून हेड ऑफिस, कॅलीफोर्निया येथे करतो.
आपण म्हणता तसा मराठी माध्यमांच्या शाळांची सध्याची अवस्था हा चिंतेचा विषय आहेच. तसे ते मान्यच न केल्यास डोळे मिटून दूध पिणार्या मांजरासारखे असेल. परंतू त्यासाठी आपण फक्त कॉर्पोरेट वर्गाचेच दाखले दिलेत. कोण किती कमावतोय अथवा कोणत्या पदावर आहे यावरुन कोणत्याही माध्यमातील शिक्षणाची तुलना एकांगी वाटतेय.

लेखातील काही मुद्दे पटले.
मराठी माध्यमात शिकून पुढे चांगले करीअर घडवणे अवघड होत चालले आहे हे खरे आहे.
याला कारण आहे ते अपवाद वगळता मराठी शाळांचा घसरलेला दर्जा.
अन्यथा मातृभाषेत दहावीपर्यंत शिक्षण घेत सोबत ईंग्लिश पक्के केले तर अडचण येऊ नये. तसेच मातृभाषेत शिकल्याने कन्सेप्ट क्लीअर होतात असेही ऐकले आहे.
करोडोंचा पगार घ्यायला मॅनेजमेंत स्किल लागते. त्यातही अश्यांमध्ये जर धमक असेल तर तो स्वत:चा व्यवसाय सुरू करून काही करोड जास्त कमावू शकतो. मुळात शालेय शिक्षणावरच अवलंबून जे नोकर्‍या करतात ते काही हजार लाख करोड पगाराची नोकरीच करत राहतात. जे त्यापलीकडे जात आपल्यातील ईतर स्किल वापरतात तेच आयुष्यात पुढे निघून जातात.
भारतासारख्या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशात तर ज्या हे जमते तो आणखी कमावू शकतो. उदाहरणार्थ मी स्वत:च. म्हणजे मी डिग्री केली आहे, पण माझ्यासोबत डिप्लोमाला असणारे काही मित्र जास्त कमावत आहेत कारण ते बीएमसीत आहेत आणि मी एमेनसीत.

मराठी लेखकांची तुलना काही पटली नाही. याचे कारण म्हणजे मराठी पुस्तके वा चित्रपट यांचा वाचकवर्ग आणि प्रेक्षकवर्ग मराठीच असणार म्हणजे लिमिटेड आहे. एखाद्या मराठी माध्यमात शिकलेल्याने ईंग्रजी पक्के करत त्या भाषेत साहित्यनिर्मिती केली तर त्याचे मराठी माध्यमात शिकणे कुठे आड येऊ नये.

माधुरी दिक्षित मराठी माध्यमात शिकली असती तरी ती सुपर्रस्टार झाली असती, लता मंगेशकर वा सचिन तेंडुलकर यांनी जे आयुष्यात आपल्यातील कलागुणांवर कमावलेय त्यात शिक्षणाच्या माध्यमाचा काही संबंध नाही.

या देशात चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर एखादी मराठी माध्यमात शिकलेली व्यक्ती व्हायला काही हरकत नसावी. पवारसाहेब कोणत्या माध्यमात शिकले आहेत कल्पना नाही पण त्याचा त्यांनी कमावलेल्या संपत्तीत काही फरक पडला नसता. छगन भुजबळ हे आमच्या दक्षिण मुंबईतील एका मराठी माध्यमाच्या म्युनिसिपालटी स्कूलमध्ये शिकले होते. त्यांनीही बरीच माया कमावली होती.

मुळात आपल्याकडे मुलांना शिक्षण यासाठीच देतात की त्याने पुढे जाऊन पैसा कमवावा. ही विचारसरणी कुठेतरी थांबायला हवी. मुलांना मुलच समजा. आज गुंतवणूक उद्या रिटर्न्स अशी पैसा कमवायची मशीन समजू नका.

माझा हा धागा सुद्धा जरूर वाचा - तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण का देता? https://www.maayboli.com/node/63167
पटलं तर तिथेच प्रतिसाद देऊन त्याला वर काढा.

शिक्षणाचा हेतू मुलांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवणे असावा. यश म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी नव्हे हे सुद्धा त्यांना योग्य शिक्षणासोबत समजवावे. वर मी म्हटलेय की माझ्यासोबत डिप्लोमाला असलेली मुले आज जास्त कमावताहेत तर त्याबद्दल मला असूया वा असामाधान जराही नाहीये ते याचसाठी की माझ्या शिक्षणाने मला काय दिले हे मी जाणतो.

>धन्यवाद राजसी , म्हणजे iit त अजून मराठी माध्यमाची मुले जातात हि आनंदाची बातमी आहे .
थोडे पुण्यामुंबईच्या पलिकडे बघा. माझ्याच माहितीत ३-४ वर्षांपूर्वी आधी नांदेड मग औरंगाबाद मग आयआयटीतून बाहेर पडलेले काही थेट फेसबुक , गुगलमधे नोकरीलाही आहेत. भारतात अजून किती आहेत ते माहिती नाही.

>कोठल्याही वयातील मराठी माध्यमाच्या मुलांबद्दल
>१) मराठी माध्यमातील किती जण आजच्या टॉप चे पगार असलेल्या नोकरीत आहेत ?
हजारो. पण त्यांना आपला पगार टॉपचा आहे हे सांगायची गरज भासत नाही. जवळच्या मित्रांमधे ३ कंपन्या काढून , त्या विकून , ४० व्या वर्षाच्या आधी निवृत्त झालेलेही आहेत. म्हणजे त्याना पोटापाण्यासाठी नोकरी करायची गरज नाही, छंद म्हणून , मदत म्हणून ते काम करतात. किंवा मस्त जगभर हिंडत असतात.
आणि तुम्ही नोकरी याच एका निकषावर का पाहता? अतुल कुलकर्णी , अजय अतुल, नाना पाटेकर हे यशस्वी नाहीत?
>२) मराठी माध्यमातीलअनेक जण IT त आहेत पण त्यापेक्षा हि अधिक पगार देणारी consulting , इन्व्हेस्टमेंट बँकिंग , private बँकिंग मध्य किती आहेत ? (
>४) टॉप ५ कन्सल्टन्सी चा सर्व्हे मी केला होता , त्यात काही मराठी लोक आहेत पण प्रोफाईल्स बघता मराठी माध्यमाचा कोणी आढळला नाही .
इथे आपल्या मायबोलिवरचाच एक सभासद मॅकेंन्झीमधे होता आता त्याने ती सोडली.
माझा एक औरंगाबादचा मराठी शाळेतला (सरस्वती भुवन) मित्र बरीच वर्षे गोल्डमन सॅक्स मधे होता.

>५) तीच गोष्ट अमेरिकेतील भारतीय वंशांच्या CEO ची . त्यातील जवळपास सर्व मराठी नावांची प्रोफाईल्स मी बघितली होती त्यात मराठी माध्यमातील कोणी आढळला नाही ( कोणी असेल तर जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा).
पुन्हा नोकरी या निकषाच्या पलिकडे पहा.
हिंदूस्तान लिवर आणि आता युनीलीवरचे नितीन परांजपे.
टिबको चे विवेक रणदिवे (हे नक्की माहिती नाही. पण त्यांनी येरे येरे पावसा या कवितेबद्दलच्या त्यांच्या आठवणी सांगताना मी ऐकल्या आहेत).
मराठवाड्यातल्या वायगावचे असलेले आणि आता लेकशोअर इंजिनियरींगचे CEO अविनाश रचमाळे
(हे मी ज्यांच्या कंपन्यांची उलाढाल बिलीयन डॉलर्स मधे आहेत त्यांच्याबद्दल लिहितोय. मिलियन डॉलर्स मधे उलाढाल करणार्‍या कंपन्यांचे मराठी माध्यमात शिकलेले CEO जगात 100-200 तरी असतील.)

आणि CEO च्या पलिकडे जग असतं हो.
१) अगदी गेल्या आठवड्यात बोस्टनला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या CTO बरोबर जेवलो. ते फलटणला मुधोजी हायस्कूलमधे मराठी माध्यमात शिकले.
२) वोडाफोन इंडीयाचा CTO मराठी माध्यमात कराड आणि सातार्‍याला शिकलाय.
३) रिलायन्स टेलिकॉम च्या महाराष्ट्र आणि गोवा या भागाच्या मार्केटींगचा मुख्य माझ्या बरोबर मराठी इयत्ता ३ ते ६ होता.

राजकारणात (भारताबाहेर)
आयोवा राज्याच्या सिनेटर स्वाती दांडेकर
वेस्ट विंडसरचे मेयर हेमंत मराठे

मराठी माध्यमातले सर्जन/ डॉक्टर तर कितीतरी माहीती आहेत (भारताबाहेर आणि भारतातही). म्हणजे हे नुसते डॉ करतात असे नसून त्या त्या गावात किंवा राज्यातल्या सर्वोच्च पदाला पोहोचले आहेत.

तुमच्या माहितीत हे आले नसतील, त्यामुळे तुम्हाला असे वाटू शकते. काही जणांशी जवळचे संबंध असल्याने त्यांच्या परवानगी शिवाय नावे लिहिणे योग्य होणार नाही. तुम्ही म्हणता ते कदाचित आता पुण्यामुंबईत असू शकेल. पण त्या बाहेर मराठी माध्यमातून येऊन आजही चांगले यश मिळवणारे आहेत. (तुमची यशाची व्याख्या थोडी व्यापक करायला हवी मात्र)

>कोण किती कमावतोय अथवा कोणत्या पदावर आहे यावरुन कोणत्याही माध्यमातील शिक्षणाची तुलना एकांगी वाटतेय.
लाख बोललात.

लेख चांगला आहे, खंत चांगली मांडली आहे. सध्या लोक मराठी माध्यमात घालत नाहीत तर तुम्हाला IIT आणि IIM मध्ये त्यांचे पेरसेंतेज कमीच सापडणार. याच्यात मराठी माध्यमाच्या दर्जाचा काही संबंध नाही.
उदाहरण देतो. चाणक्य मंडळातून खूप लोक upsc, mpsc सिलेक्ट होतात, आता समजा उद्या लोक तिथे प्रवेश घेणे बँड करू लागले, तर आपण असे थोडीच म्हणू शकतो की त्यांचा दर्जा खालावलाय. तिथे 100 ऐवजी 10च लोक प्रवेश घेतायत, मग सेलेक्टड लोक कमीच असणार ना?

म्हणजे हा दुकानदार Ferrari / Porsche / Maserati अशी गाडी घेवून फिरतो ? १०-१२ करोडोंच्या Flat मध्ये राहतो ? सुपर !!>>> एक भाबडा प्रश्न, वरील सर्व असणे हेच श्रीमंतीचे मोजमाप असते काय? मी तर समजत होतो ती गती सारखीच सापेक्ष असते. Uhoh
तुमची मराठी माध्यमातील शाळांची सद्यस्थिती बद्दलची काळजी कितीही रास्त असली तरीही त्याचे यशापयश मोजायला घेतलेली एकाच मापाची पट्टी नाही पटत. एक गोष्ट माझ्यासारखे मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले बरेचजण मान्य करतील की, जेव्हा त्यांची खरी स्पर्धा इंग्रजीतून शिकून आलेल्या मुलांबरोबर सुरु होते (विशेषतः ११ वी सायन्स. कॉमर्स, आर्ट्स बद्दल फार माहिती नाही.) तेव्हा खरंतर कमीपणाची भावना तयार होते, त्यांच्या आकलनतेशी स्पीड मॅच करताना बहुतेकांची भंभेरी उडते कारण बर्याच गोष्टी ज्या ते पूर्वीपासून शिकले आहेत त्यांना इंग्रजीत काय म्हणतात हेच माहिती नसते. परंतू नंतर कधीही कोणताही फरक पडत नाही. तिथून पुढची वाटचाल आपापल्या कर्तुत्वावरच असते.
(रच्याकने: तसेही आपल्या देशात सार्वत्रिकपणे जगाची भाषा म्हणून उदोउदो केल्यानेच आपला स्पर्धेत टिकाव रहावा म्हणून इंग्रजीचा वापर केला जातोय. नाहीतर जपान, चीन, जर्मनी, रशिया तसेच युरोपमधील बहुतांश देश मात्रुभाषेतूनच शिक्षण व व्यवहार करतात, त्यांचे का बरे कोठे आडत नसावे?)

जगाची भाषा म्हणून उदोउदो केल्यानेच आपला स्पर्धेत टिकाव रहावा म्हणून इंग्रजीचा वापर केला जातोय. नाहीतर जपान, चीन, जर्मनी, रशिया तसेच युरोपमधील बहुतांश देश मात्रुभाषेतूनच शिक्षण व व्यवहार करतात, त्यांचे का बरे कोठे आडत नसावे?)
>>>>भारताला एक मातृभाषा नाहीय, त्यामूळे हे शक्य नाही.

आत्मप्रौढी वगैरे म्हणून नाही, पण मराठी माध्यमाबद्दल आहे म्हणून सांगतो. मी स्वतः १०वी पर्यंत मराठी माध्यमातून शिकलो. मराठी माध्यमातून शिकलेले माझ्या वयोगटातील किमान ५ गणितज्ञ माझे जवळचे मित्र आहेत. हार्वर्ड, कोलंबिया, युसीएलए, गॉटींजन अश्या ठिकाणांहून त्यांची पीएचडी आहे.

अतिशय भोंगळ लेख, लेखकाला स्वतः ठरवलेल्या निष्कर्षावर यायचे आहे, त्यासाठी सोयीस्कर अशा पुराव्यांची खरतर अरगुमेंट्स चे जुळवाजुळव करणे सुरू आहे.

आरारा आणि अजय यांनी उत्तम प्रतिसाद दिले, त्यानन्तर लिहिण्यासारखे काही नाही इथे.

तुमचा प्रॉब्लेम तुम्हांला भारी गाडी दिसली नाही तर तुम्ही यशस्वी नाही किंवा श्रीमंत नाही हा निष्कर्ष काढून वेगळे होताय. गरीब किराणावाला शोधून सांगा. औरंगाबाद मध्ये म्हणे gst च्या आदल्या दिवशी 200 bmw विकल्या गेल्या. हे काय दारिद्य्र चे लक्षण आहे कस?

gst च्या आदल्या दिवशी 200 bmw विकल्या गेल्या. हे काय दारिद्य्र चे लक्षण आहे कस?>>>>
आता ते विचारतील यातल्या किती गाड्या मराठी माध्यमाच्या लोकांनी घेतल्या? Wink

अजय, तुमचा प्रतिसाद छान आहे, पण तसाच्या तसा लागू होत नाही,
कारण तुम्ही दिलेली बहुतेक नावे 2000 च्या आधी शाळेतून बाहेर पडली असतील, लेखक एक गोष्टीत क्लिअर आहे की 2005 नंतर मराठी माध्यमातून बाहेर पडणाऱ्या किती लोकांना प्रीमियम इन्स्टिट्युट मध्ये ऍडमिशन मिळाल्या,

या साठी चरप्स चा मुद्दा पटतो, की मुदलात मराठी मिडीयम मध्ये अडमिशच कमी झाल्याने पुढच्या सॅम्पल स्पेस मध्ये अशी उदाहरणे कमीच येणार.

आणि 2005 किंवा नंतर 10वि झालेला मुलगा 2010 ला पदवी पूर्ण करेल 2012 ला पोस्ट ग्रॅड पूर्ण करेल ,
त्या नंतर केवळ 7 वर्षात पर्यंत तो हाय पेयींन्ग जॉब ब्रॅकेट मध्ये यावा अशी अपेक्षा करणे चूक आहे.
किती तरी लोक तुम्ही म्हंटल्या संस्थांमध्ये खालच्या पदावर (7yrs experience) काम करत असतील, आणि अजून 10 -15वर्षात CXO होण्याचे त्यांची क्षमता असेलही.

या लेखावर उतारा म्हणून किस्त्रीम दिवाळी अंकात 'इंग्रजी माध्यममुक्त महाराष्ट्र' हा लेख वाचा.
त्यात इंग्रजी माध्यमातून शिकण्याचे भरपूर तोटे दिलेले आहेत.

मराठी माध्यमाचे commercial benefits तसे काही फार नाहीत . जिकडे अतीव स्पर्धा आहे तिकडे मराठी माध्यमाची मुले - ते पण गेल्या -१०-१२ वर्षात आहेत का ?
>>
Rofl

अजय
धन्यवाद , गोल माटोल लिहिण्यापेक्षा तुम्हीच नावे दिलीत .
परांजपे आमचे alumni आहेत . ते St Xaviers Boys Academy ला होते . हि मराठी शाळा नाही .
विवेक रणदिवे - जुहू ला राहायचे आणि अतिश्रीमंत होते . बहुदा मराठी माध्यमात नाही .
हेमंत मराठे - पास .
अविनाश रचमाळे - मराठी मध्यम

बाकी मॅकेंन्झीमधे मध्ये कोण होते ? आणि ते मॅकेंन्झीमधे नॉलेज मध्ये होते का ?

जंतोबा,
पैका देणारी नोकरी इतकाच यशाचा क्रायटेरिया असेल तर ती इतकी टिप्पीकल मराठी शहरी मध्यमवर्गीय मानसिकता आहे ना, की सो कॉल्ड मराठी माध्यमासोबत तीही मेलेलीच बरी.

१०वी पर्यंत मराठी माध्यमात शिकून, नंतर यत्नपूर्वक इंग्रजी शिकून, स्पेशालिस्ट डॉक्टर झाल्यानंतर, प्रॅक्ट्समधे पेशन्ट शी बोलण्यासाठी लोकल बोलीभाषा यत्नपूर्वक शिकलेला(कारण त्याने धंदा सोपा होतो, अन वाढतो.) अन भ र पू र कामावणारा मी, हे वरचे विधान छातीठोकपणे करू शकतो.

चैला मद्रासी / कुठली माया इंका बोलून पैके मिळतील तर शिका कि मद्रासी व ती भाषा. मातृभाषा प्रायमरी अन अर्ध्या सेकंडरी शिक्षणास आवश्यक आहे असे जगभरात मान्य आहे. याव्यतिरिक्त दुसरा काही मुद्दा मांडायचा असेल तर बोला. नैतर आवरलेले बरें.

किती विस्क़ळीत लिहिताय ? तुमचा हायपोथिसिस २००० साली किंवा त्यापुढे १०वी पास झालेली मुले आता किती पैसे कमावतात आणि त्यात मराठी माध्यमातली मुले ( वा मुली) कुठे आहेत हा असावा ( असा माझा अंदाज. तुम्ही तो नेमका मांडलेला नाहीच ). तो समजा तुम्ही प्रूव्ह करु शकलात तर पुढे काय ? तुम्ही स्वतः त्याबद्दल नेमकं काय करणार ? इथे हे इतकं विसकळीत लिहिण्यामागे नेमकं उद्दिष्ट काय आहे ?
मराठी / मराठी माध्यमातल्या यशस्वी लोकांची माहिती मिळवणे एवढाच !

महागड्या गाड्या चालवणे / नामांकित कंपनीत मोठ्या पदावर असणे / भरपूर पगाराचे पॅकेज असणे ( नेमका आकडा पण तुम्ही लिहिला नाहीत) हे सर्व यशस्वी असण्याचे वेगवेगळे निकष आहेत. यापेक्षा आणखीही निकष आहेत पण तुम्ही हेच निकष स्पष्ट्पणे मांडलेले नाहीत. तर इतर निकष असू शकतील हे तुमच्या गावीच नसेल.

तुमच्याकडे तुमच्या ( बहुतेक शहरी आणि मोजक्या रिकृटिंग ) अनुभवाखेरीज काही डेटा नाही . तो गोळा करण्याचे तुम्ही काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. २००० साली १० वी पास झालेल्यांमधे ( फक्त महाराष्ट्रात च जरी धरले तरी ) मराठी माध्यमातील लोक किती टक्के होते ? इंग्रजी माध्यमातील किती टक्के होते ? कर्नाटक / केरळ / तामिळनाडू या राज्यांमधे स्थानिक व इंग्रजी माध्यमातील १० उत्तीर्ण लोकांचे प्रमाण काय असेल ? त्यांच्या पॅकेजमधे पण इतकी तफावत आढळते काय ? की फक्त मराठी शाळाच गाळात चालल्या आहेत ?

इंग्रजी माध्यमातले - अगदी झेवियर्स मधून शिकलेल्यांमधे किती टक्के तुमच्या वरच्या क्रायटेरिया मधे बसतात ? बाकीच्यांचे काय - ते अपयशीच ? आणि त्या अपयशाचं खापर काय पत्रिकेवर फोडणार ?

Harverd / Stanferd / >> हे स्पेलिंग नीट लिहा आधी . परदेशातील विद्यापीठामधे शिक्षण हाच जर उद्देश असेल तर मराठी शाळा कितीही चांगली असली तरी त्या शाळेत कोण कशाला जाईल ?
अमेरिकेतल्या सुद्धा अनेक शाळांमधून एकही विद्यार्थी वर लिहिलेल्या विद्यापीठांमधे जात नाहीत. काही शाळांमधे तर वर्षानुवर्षे आयव्ही लीग मधे अ‍ॅडमिशन मिळत नाहीत.

आयआयटी /आयएएम वगैरेंत ऍडमिशन मिळालं म्हणजे ती व्यक्ती यशस्वी झाली ह्या मानसिकतेतून कधी सुटका होणारे ?
सध्या कामाच्या निमित्ताने देशभरातील स्टॉक ब्रोकरशी संबंध येतोय . लोकल शाळेतून शिकलेले पण बिझनेस मध्ये टॉपला , HNI कॅटेगरीत मोडणारे असे प्राणी पहायला मिळत आहेत .

वर उल्लेखल्या गेलेल्या संस्थना कमी लेखण्याचा मानस नाही .पण त्यांच्यातून शिकून बाहेर पडणं म्हणजेच यशस्वी होणं का समजलं जातेय ?

बाकी अजय यांच पोस्ट आवडलं

आ.रा.रा.

तुम्ही पूर्णपणे न वाचता बेचुत शेरेबाजी सुरु केली
मागे काही कारणासाठी मी भारतातील top १०० startups बघत होतो , त्यात मराठी नावे खूप कमी होती आणि त्यांच्य्ही profiles linkedin वर बघितल्या तर मराठी शाळांचे असावे असे वाटले नाही .

तर मग आता मराठी तरुण मुलांनी सुरु केलेले नाव घेण्यासारखे धंदे कोणते ? म्हडे चाललेल्या व न चाललेल्या snapdeal , flipkart , ola , zomato , bookmyshow , paytm , practo , shaadi , naukti अशा कंपन्या / धंदे कोणते आहेत ? यात तर किती कमावतात हे हि विचारात नाही .
By the way नोकरी फालतूच असते पण किमान अनुभव आणि भांडवला शिवाय धंदे कसे बरे सुरु करावेत ?

"मातृभाषा प्रायमरी अन अर्ध्या सेकंडरी शिक्षणास आवश्यक आहे असे जगभरात मान्य आहे. " मग हि आवश्यक मराठी मातृ भाषेतून शिकून हि बाकीच्या सर्वसामान्य लोकांनी चांगल्या मानलेल्या institutes मध्ये या मुलांना का प्रवेश मिळत नाही ? एखादवेळी तुमच्या दृष्टी ने या IIT / IIM या संस्था फालतू असतील . आ.रा.रा. म्हणतात म्हणजे असणारच ! मग या संशांसाठी एवढी जीवघेणी चडाओढ का ? आणि अनेक चांगल्या कंपन्या तिकडे वर्ष नु वर्ष का जातात ? तसे हि इकडे सर्व मूर्खच मुले असणार . आणि नोकरी देणाऱ्या फालतू कंपन्या असणार ? मग वर्ष नु वर्षे त्यांना कसे परवडते ? ते पण काही कॉलेज मध्ये starting pakage ५० लाख ( भारतात ) किंवा १.२ करोड ( विदेशात ) का देतात ? त्याचा फायदा काय ? जर या मुलांमुळे फायदा होत असेल तरच त्यांना असे pakage मिळेल न ? मान्य आहे कि फार थोड्या लोकांना असे pakage मिळते , पण मिळते हे सत्य आहे . त्यात जर मराठी माध्यमाची मुले असली तर नाव सांगा ..

सॅम्पल स्पेस चा इस्स्यु आहे आणि तेच कारण आहे मराठी माध्यमातील मुले सध्या IIT आणि IIM मध्ये कमी आहेत ( किंवा नाहींयत).
Iit आणि iim भारी आहेच..शंका नाहीय.
तुमच्या लेखाचा मेन मोटिव्ह काय आहे ते स्पष्ट करता का.
जर तुम्हाला वाटत असेल दर्जा खालावला आहे तर ते चूक आहे कारण पार्टीसिपेशन नाहीय.

महिन्याला करोड?
<<
महिन्याला?? Lol

मी काय एमेन्सी ऋणमेष वाटलो का तुम्हाला?

तुमच्या दृष्टी ने या IIT / IIM या संस्था फालतू असतील . आ.रा.रा. म्हणतात म्हणजे असणारच !
<<
हे मी कुठे लिहिलं म्हणे?
ब्रिदलायझर टेस्ट करून घेतो स्वतःची... काय सांगता येत नाही. OTमध्ये पेशंटला दिलेल्या भुलीतलं थोडं इथर जास्त हुंगलं गेलं तर चढतं कधीकधी.

महिन्याला?? Lol
>>>>
पगार महिन्यालाच होतो ना?
वर्षाला असेल तर चाळीशीपर्यंत मी मराठी माध्यमदेखील तिथवर पोहोचेन

एमेन्सीत प्याकेज महिन्यावर ठरवतात का? करोड चं प्याकेज = महिना १ करोड ना?

मज्जाय ब्वा तुम्हा एमेन्सी लोकांची

मला केस टू केस वाद घालायचा नाहीये पण इन जनरल अस वाटत की हल्ली मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा घसरला आहे . याच कारण मध्यमवर्गाने या शाळांकडे पाठ फिरवली आहे. ज्या प्रसिद्ध शाळात प्रवेशासाठी मारामारी असे तिथे आता या या चे बोर्ड लागतात.
माझी मुलं मराठी माध्यमात शिकली पण आता नवीन मुलांना मी सुद्धा मराठी माध्यमात घाला म्हणणार नाही कारण शिक्षणापेक्षा सुद्धा कंपनी हा कळीचा मुद्दा आहे।

आरारा, त्यांनी पगार हा शब्द वापरला म्हणून मी महिना समजतो.
धागाकर्त्याने क्लीअर करावे, महिना करोड की वार्षिक करोड.
आणि अ‍ॅन्युअल पॅकेज एक करोड असेल तर सिरीअसली फार नाहीये ते.. थोडी वर्षे थांबा, माझे नावही असेल त्या लिस्टीत

मेधा
माझा हायपोथिसिस असा आहे
१) मराठी मध्यमातील मुले २००० च्या आसपास पर्यंत ठीक ठाक performace देत होती .
२) २००० नंतर अधोगती सुरु झाली आणि ती वाढतच आहे
३) ३ वर्षापूर्वी आमच्या शाळेची स्थिती सुधारण्या साठी काय करता येईल यासाठी जेव्हा परीशितीचा अभ्यास केला तेव्हा कळले कि परीस्ठीथी हाताबाहेर गेली आहे . काहीही सुधारणा होण्याची शक्यता आहे

आता अशा वेळी जर शक्य असेल तर लोकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालावे .

आता - आपल्याकडे स्वप्न रंजनात रमायची लोकांना सवय आहे . त्यामुळे आजही मराठी शाळेत घालणे किती चांगले अशी दिशाभूल केली जाते . जर जर मराठी माध्यमातून शिकून मुलांची समाज खरेच वाढत असेल तर कोठेतरी त्याचा output दिसायला हवा नाही का? जसे कि एकेकाळी लातूर मधल्या शाळांनी १० वी ची परीक्षा देण्याची सर्वांपेक्षा चांगली पद्धत शोधून काढली आणि अनेक वर्षे त्यांचे विद्यार्थी गुद्वत्ता यादीत येत होते . तीच गोष्ट मुंबईतील पार्ले टिळक आणि बालमोहन या शाळांची

तसेही पूर्वी हि मराठी माध्यमाची मुले B Scholl कमीच जायची ,हे असे का ? १९९९ साली जमनालाल बजाज मध्ये माझ्या batch मध्ये असलेली सर्व मराठी माध्यमाची मुले १० च्या आसपास होती आणि बहुदा सर्व engineer होती . पुढच्या आणि मागच्या batch मध्ये हि अशीच अवस्था होती . लक्षात घ्या १२० जगात फक्त १० . आणि त्याच वर्षी IIM - Kolkata मध्ये माझा भाऊ होता तिकडे मराठी माध्यमाचे ४-५ च मुले होती .

म्हणजे आधी कमी असलेली मुले आता जवळपास शून्य झाली आहेत .

आता escape mentality प्रमाणे सर्व बोलतात कि नोकरीत काय ठेव्लेव - धंदा करा . तर हा संघर्ष मी पण करतोय आणि यात अनेकदा वेगवेगळ्या startup एवेन्त्स ला जाण्याची वेळ आली . तिकडे अनेक लोकांना भेटलो , मला चित्र विचित्र कल्पना घेवून आलेले अनेक तरुण भेटले . थोड्या फार गप्पा झाल्यावर त्यांची profile कळायची . मला तरी मराठी माध्यमाचा कोणी भेटला नाही

किंवा असे तर नाही ना कि माझ्या समजुतीत काही दोष आहे आणि मलाच मराठी माध्यमाचे लोक आपला समजत नाहीत , माझ्यापासून दूर पळतात . तर काही नावे मी विहार्लेल्या प्रश्नांची द्या - मोठ्या प्रमाणात मिळाली तर माझा काहीतरी गैरसमज झाला हे मान्य करीन , एक पूर्ण धंदा काही होत नाही , काही assumption चुकली म्हणून बंद करावा लागला . हि तर होती गोष्ट आहे

Friedrich Nietzsche म्हणाला होता कि “Sometimes people don't want to hear the truth because they don't want their illusions destroyed.”

Sometimes people don't want to hear the truth because they don't want their illusions destroyed.
जबरदस्त लाईन आहे... आवडली !

तसेही पूर्वी हि मराठी माध्यमाची मुले B Scholl कमीच जायची ,हे असे का ? १९९९ साली जमनालाल बजाज मध्ये माझ्या batch मध्ये असलेली सर्व मराठी माध्यमाची मुले १० च्या आसपास होती आणि बहुदा सर्व engineer होती . पुढच्या आणि मागच्या batch मध्ये हि अशीच अवस्था होती . लक्षात घ्या १२० जगात फक्त १० . आणि त्याच वर्षी IIM - Kolkata मध्ये माझा भाऊ होता तिकडे मराठी माध्यमाचे ४-५ च मुले होती . >>

हिंदी, तमिळ, बंगाली माध्यमातली किती मुले होती जमनालाल बजाज मधे ? १९९९ च्या आधी किती होती. प्रत्येक वर्षाचा क्लास साइझ आणि १० वीपर्यंतची भाषा याचा तक्ता कसा दिसेल ? १९६० साली ८०% टक्के मुले मराठी माध्यमातली होती का ? माझा अंदाज असा आहे की मराठी ( किंवा भारतातल्या इंग्रजी मिडियमवाले म्हणतात तसे ) व्हर्नाक्युलर माध्यमातली मुले इन जनरल मायनॉरिटीच होती मॅनेजमेंट इंस्टिट्युट मधे. मी तर असेही म्हणेन की ७०- ८०=९० च्या दशकात मराठी घरातली मुले मुलीच मॅनेजमेंट इंस्टिट्युट मधे मायनॉरिटी होती . मेडिसिन / आय आय टी मधे चित्र कदाचित वेगळे असावे मागच्या शतकात .

हे सगळे अ‍ॅनलिसिस करुन पुढे काय करणार ? तुमच्या कुटूम्बातली मुले कुठल्या माध्यमात शिकतात ?

एक अवांतर प्रश्न.
मराठी माध्यमात शिकलेल्या लोकांबद्दल लिहीले आहे. हिंदी, गुजराती, तमीळ, तेलेगु, कन्नडा, बंगाली, मलयाळम या माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांचे काय? तुमच्या दृष्टीने यशस्वी झालेल्या लोकांत त्यांचे प्रमाण काय?
का फक्त इंग्रजी माध्यमातून शिकणारेच यशस्वी होतात?

या पिढीतले माहित नाही, पण आमच्या पिढीतले शेकडो मराठी माध्यमातील विद्यार्थी आय आय टी मधे होते. इथे हार्वर्ड मधे, येल, प्रिन्स्टन वगैरे मधेहि मराठी माध्यमातील विद्यार्थी होते.
आताशा तिकडून येणारे विद्यार्थी नावाने मराठी असले, नि कदाचित मराठी माध्यमात शिकले असले तरी सगळे हिंदी, इंग्रजीच बोलतात.
विशेषतः मी भारतात आलो नि शुद्ध मराठीत बोलत असलो तरी मराठी लोकसुद्धा इंग्रजीतूनच बोलतात.
मला वाटते मराठी माध्यमातून शिकलो म्हंटले तर भारतात तुम्हाला कुणि विचारत नाहीत. कारण भारतात विषयाच्या ज्ञानापेक्षा डिग्री सर्टिफिकेट, नि कुठली शाळा, नि कुठले मिडियम हेच जास्त महत्वाचे!
एकूणच कामात चोखपणा वक्तशीरपणा हे गुण भारतात फार कमी दिसून येतो असे मी बरेचदा ऐकले आहे. त्यामुळे बाकीचा फापटपसारा महत्वाचा. त्यामुळेच अनेक लोक कंटाळून इकडे आले, नि इथे त्यांच्या कामाचे चीज झाले. अगदी सी ई ओ च नाही झाले तरी तसेहि हजारो लोक नोकरीवर असलेल्या ठिकाणी सी इ ओ एकच असतो, म्हणजे बाकीचे काय अयशस्वी का?
इथे बरे आहे, कुठल्याहि भाषेतून शिकला असा - तोडके मोडके जरी इंग्रजी येत असेल, पण विषयाचे ज्ञान पक्के असेल तर चालते. ते नसेल तर इंग्लंडमधे शिकला असला तरी उपयोग नाही!!

साधारण हा माध्यमाचा फरक नाहीये, ऍक्सेस चा आहे.

माझा एक लेख आहे या मुद्द्यावर
उद्या देतो लिंक

कोणाला पाहिजे सी इ ओ पोस्ट, स्ट्रेस आणि डिप्रेशन.
मस्त 9 तो 5 जॉब , 5 नंतर फॅमिली बरोबर टाईम स्पेनडिंग म्हणजे पण लाईफ सक्सेस आहेच की.

मला मोठा विरोधाभास जाणवला आहे. मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा किती घसरलाय हा बाफचा विषय अस्ताना किती अमराठी शब्दान्चा वापर ?

इंग्लिश, commercial benefits, recruitment, bio data, medium, top १०० startups, profiles, consulting, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, private बँकिंग, टॉप, सर्व्हे, management, data, Content.... काही शब्दान्ना मराठीत सहज पर्याय उपलब्द आहेत.

आता मराठी भाषा शिकून यशस्वी होता येत नाही असे जर मराठी लोकांना वाटत असेल, तर ते मराठी शिकणार नाहीत, वाचणार नाहीत. मग त्यांच्या मनात मराठी शब्द आधी येतील का इतर भाषांतले- विशेषतः इंग्रजी मधले?

आता मराठी भाषा कशाला म्हणायचे हाच विषय चर्चेला घ्या!!

मी स्वतः २००१ मध्ये दहावी झालो. २००९-११ मध्ये आय आय एस सी (जिचे नाव तुम्ही का लिहिले नाहीत, माहित नाही, पण त्याची रँक भारतात १ आहे) मधून मास्टर्स केले आणि आता ऑस्ट्रेलियामध्ये पीएच्डी करतो आहे. माझ्या २ वर्ष नंतर दहावी झालेले अनेक मित्र (सतीश, सिद्धार्थ, विनायक, चैतन्य, समीहन, अनुप, शिल्पा, पल्लवी, संपदा इत्यादी... यादी खूप मोठी आहे) माझ्या बरोबर किंवा पुढे-मागे आय आय एस सी आणि आय आय टी मध्ये होते. महाराष्ट्रातील विविध शहरे आणि छोटी गावे यांमधून आलेली ही मंडळी होती. विनायक तर सध्या आयसर त्रिवेंद्रम या नामवंत संस्थेत प्राध्यापक आहे. ऋषिकेश हा शाळेतला वर्गमित्र ओक्लाहोमा युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक आहे. अनेक जण परदेशात पोस्ट डॉक करत आहेत. काही मित्र तर अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून येऊन त्यांनी ते यश कमावले आहे (त्यांना आवडणार नाही, म्हणून नावे सांगत नाही). ते आता कुटुंबाचा मोठा आधार बनले असून सर्वांचा कौतुकाचा विषय ठरले आहेत.

शंतनू, तुम्ही ज्या क्षेत्राबद्दल बोलताय त्यातले पगार लेखकाच्या अपेक्षेला आणि यशाच्या व्याख्येला पुरे पडणारे आहेत का?
अन्यथा तुमचा प्रतिसाद बाद.

Pages