शृंगार

स्त्री चं सौंदर्य

Submitted by अरविंद डोंगरे on 19 May, 2020 - 03:10

मी पाहिली अशी एक नार
    जिला शोभतो कसला ही शृंगार।
आकाशी रंगाच्या साडीवर
                 सोनेरी छटा ।
जशा आकाशातून उतरल्या
         विजेच्या लाटा ।
तिच्या कानातील बाली
       जणू चंद्राची सावली।
तिच्या कांती वरती शोभून
           दिसतो तो  झब्बा लाल।
अजून ही शृंगारात घाले भर
       तिच्या ओठावरील लाली लाल।
केश ही किती छान झुबकेदार
        तरीही राहिली  शृंगारात कमतरता।
नाही तर अजूनही
         वाढली असती तिची सुंदरता ।
कपाळावर टिकली आणि गळ्यात हार

शब्दखुणा: 

शृंगार ४

Submitted by अनाहुत on 26 August, 2015 - 12:48

मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .

" अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर ती खाली लागेल . "

" असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "

" ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "

Subscribe to RSS - शृंगार