शृंगार ५

Submitted by अनाहुत on 31 August, 2015 - 07:12

एका नाजुक विषयावर लिहिण्याचा हा प्रयत्न आहे . शक्यतो उघडपणे न बोलला जाणारा पण सर्वांच्या जिव्हाळ्याचा . आपण आपल्याला याबद्दल वाटणाऱ्या भावना फारशा व्यक्तही करु शकत नाही .व्यक्त करू शकत नाही ते अनोळखी लोकांमधे पण ओळखीच्या [ limited ] लोकांमधील सर्वात आवडता विषय . या विषयावर लिखाण तस विपूल आहे पण अशा मंचावर लिखाण करताना बराच विचार करावा लागला .

या विषयावर लिहिण्यामधील महत्त्वाची समस्या म्हणजे लोकांची range . एका बाजूला हे फारच सपक किंवा बेचव वाटू शकत तर दुसरीकडे अगदीच उथळ सवंग किंवा बिभत्स वाटू शकत . म्हणून एका मध्यम मार्गाने जाण्याचा हा प्रयत्न . तरीही काही ठिकाणी हे थोडे कमी-जास्त होते आहे . इतक variation वाचक सांभाळू शकतील .

माझ्यासाठी लेखकाने गोष्ट लिहिली कि ती तिथेच संपत नाही किंवा पूर्ण होत नाही . वाचक ती वाचतात आणि त्याचा अर्थ लावतात तिथे ती पूर्ण होते . काही ठिकाणी जिथे दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ निघत असल्यास वाचकांनी स्वतःच्या सोईचा अर्थ घेतल्यास हि गोष्ट तुम्हाला जास्त जवळची वाटेल व तुम्हाला जास्त आनंद होईल .

तुम्ही कथा वाचता आहात आपले अभिप्राय देत आहात हे पाहून आनंद झाला . तुम्हाला असाच आनंद पुढेही देण्याचा प्रयत्न राहिल .
............................................................................

मेणाहून कोमल आणि वज्राहून कठोर अशा प्रकारचे वर्णन एकाच गोष्टीचे असेल तर ती गोष्ट कोणती ? असो ज्याचा त्याचा वेगळा विचार असू शकतो . पण हि फक्त उपमा असू शकते . ख-या जगात बराच फरक पडू शकतो . महाभारतात दुर्योधनाचा काही भाग कमजोर राहिला आणि तेथेच सातत्याने मार लागून तो गेला . बाकी धर्म अधर्म जरी बाजूला ठेवला तरी झाल ते बरच झाल . त्याने कंबरेला काही गुंडाळलच नसत तर त्याच सगळ शरीर वज्राच झाल असत . मग त्याची बायको काही वाचली नसती . थेट वज्रच घ्यायच म्हणजे काय ?

असो बाकी मंजूला वज्राघात तर नाही ना सहन करावा लागत . असा विचार करण्यामागे कारणही तसच होत तिचा चेहरा फार त्रासिक व्हायचा . आणि अशा अनुभवात चेहरा त्रासिक होणे चांगल नाही . म्हणजे अस व्हायलाच नको . आणि तिला याबद्दल विचारण्याच धाडसही नाही होत . कारण तिला अस काही विचारल तर ती विचारल आहे त्याच उत्तर तर देत नाही उलट दुसऱ्याच विषयावर वाद घालत बसते . त्यामुळे सर्व मुडची वाट लागते . पण एकदा इतर वेळी तिला हे विचारायलाच हव . असाच रेटण्याचा विषय नव्हे हा . ती काही दिवस जिमला आली असती तरी बर झाल असत . पण ती यायलाच तयार नव्हती .

या विषयावर बोलायचच अस ठरवून रात्री तिच्याकडे विषय काढला . परत तेच तिने दुसऱ्याच विषयावर वाद घालायला सुरूवात केली . पण मी ठरवल होत आज या विषयावर बोलायचच . मग आधी तिला बोलू दिल . तिच बोलून झाल्यावर परत तिला याबद्दल विचारल तरीही तिने बरेच आढेवेढे घेतले . पण शेवटी बोलली ती . बरच बोलली , पण त्याचा गोषवारा एवढाच होता कि तिला आता यात interest वाटत नाही . आयुष्यात याबद्दल interest न वाटण्याची वेळ येऊ शकते . पण या वयात अस होण नैसर्गिक नक्कीच नाही . नक्कीच तिला दुसरा काही मानसिक किंवा शारीरिक त्रास असेल ज्यामुळे अस होऊ शकत पण यावर उपाय किंवा more specifically उपचार केले तर ती नक्कीच परत पहिल्यासारखी होईल . पण या उपचारांसाठी ती तयार होईल का हि शंकाच आहे . पण हे करायला तर हवेच ना . आधी आपणच भेटू डॉक्टरला मग बघू काय होत ते . आधी शारीरिक समस्या आहे का ते पाहू मग गरज पडली तर मानसिक समस्येचा विचार करु . ठिक आहे आधी जाऊ Gynaecologist कडे . पण स्त्रीरोग तज्ञाकडे कस जायच आणि तेही सोबत स्त्री नसताना . तिथ आत तरी सोडतील का ? त्याला काय सोडतील कि . पण जी गोष्ट आपल्यालाच awkward वाटते ती दुसऱ्याला कशी सांगावी हा प्रश्नच आहे ना . जाऊदे पाहू तेव्हाच तेव्हा .

दुसऱ्या दिवशी मी आजारी आहे अस फोन करून सांगितल आणि स्त्रीरोग तज्ञाकडे गेलो . सर्वात आधी पोहोचून तिथ नंबर लावला . लोकांच्या appointments होत्या तरीही सुरूवातीला पोहोचून जास्त वेळ नाही घेणार अशा सबबीवर सर्वांच्या आधी जाण्याची परवानगी मिळवली .

" ठिक आहे पेशंटच नाव "

बायकोच नाव सांगितल.

" कुठ आहेत त्या बोलवा त्यांना पटकन परत अपॉइंटमेंटवाले पेशंट कुरकुर करतात . "

" ती नाही आली मलाच बोलायच आहे डॉक्टरांशी . "

" अहो स्त्रीरोग तज्ञ आहेत मॅडम तुम्हाला कस तपासणार ? "

" अहो मी नाही माझी बायको आहे पेशंट . "

" अहो मग बोलवाना त्यांना . "

" म्हणजे पेशंट तिच आहे पण आता आली नाही ती . "

" अहो अस न तपासता गोळ्या नाही देत मॅडम . "

" मी बोलतो त्यांच्याशी . "

" तुम्हाला अस नाही सोडता येणार आत . "

" मी बोलतो तुम्ही इंटरकॉमवर फोन तरी लावा . "

फोन लावल्यावर विषयाची थोडी कल्पना दिली आणि मला आत बोलावल . हे receptionist लोक विनाकारण बडबड करत बसतात अगदी स्वतः डॉक्टर असल्याच्या थाटात .

डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली त्यावर त्यांच मत अस झाल कि एवढ्यातच अस घडन अवघड आहे . routine check up आणि काही test केल्या नंतर निदान होईल . पण फार काही serious वाटत नाही . आता यासाठी मंजूला घेऊन येण गरजेच होत . अवघड आहे पण फार जरुरी आहे .

घरी गेल्यानंतर मंजूसोबत याबद्दल बोललो . पण ती काही तयार झाली नाही . तिला एकदा विषय सांगून झाला होता आता तिला यावर विचार करायला वेळ द्यायला हवा होता .

आता काही दिवस प्रेम व्यक्त करत होतो पण तात्पुरत का होईना ब्रम्हचर्य पाळून . तिला वेळ देण गरजेच होत . पण या वेळामधे काही गोष्टी थांबल्यातरी काही गोष्टी नाही थांबवता येत . आपले विचार , आपल्या भावना या व्यतिरिक्त इतर शारीरिक घडामोडीही होत राहतात . दिवस उगवतानाच उभे राहणारे प्रश्न आणि बरच काही . अहोरात्र शारीरिक घडामोडी घडत असतात . एखाद्याला इच्छा होत नसल्यास दुसऱ्याला जास्त प्रमाणात इच्छा का होऊ लागते ? हाताला/हातांना श्रम द्यावे का ? नेहमी खळाळत वाहणाऱ्या प्रवाहाला किती दिवस बांध घालणार ? त्यातच आठवण झाली बांधांना कुठेतरी सांडवा असतो ज्याचा मुळात उद्देशच हा असतो की एका विशिष्ट मर्यादेच्या वर पातळी गेली की पाण्याचा आपोआप विसर्ग सुरू होतो . अस काही शारीरिक बाबतीतही असेलच . तोपर्यत थांबायच का ? कोणी किती वेळ उभ राहू शकत ? असे वेगवेगळ्या विषयावरचे एक ना अनेक प्रश्न पडत होते , आपल उभे राहत होते .

.... क्रमशः

भाग १ http://www.maayboli.com/node/55229
भाग २ http://www.maayboli.com/node/55239
भाग ३ http://www.maayboli.com/node/55264
भाग ४ http://www.maayboli.com/node/55293
भाग ५ http://www.maayboli.com/node/55354
भाग ६ http://www.maayboli.com/node/55545
भाग ७ http://www.maayboli.com/node/55591
भाग ८ http://www.maayboli.com/node/58057
भाग ९ http://www.maayboli.com/node/58315
भाग १० http://www.maayboli.com/node/58327
भाग ११ http://www.maayboli.com/node/58339
भाग १२ http://www.maayboli.com/node/58350

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहीलंय.कथानायक समजूतदारपणे परिस्थिती हँडल करतोय असं दिसतंय.
कथा नायक अशासाठी की लग्नाला बरीच वर्षं झाल्यावर ही ८०% तरी पुरुषांची कथा असावी.
'अनाहूत' सल्ला कथानायकाला: 'हल्ली' मूड न होणे हे (बरेचदा जाणवत नसलं तरी) रोजची घरकामं, देहाचा थकवा, काम आणि ट्रॅफिक मधला एकंदर स्ट्रेस(दोघांचाही) यावर बरंच आहे. एक दिवस कथानायकाने 'आज दोन्ही वेळच्या स्वयंपाकाला आणि सगळ्या घरकामाला सुट्टी.कपडे मी वाळत घालेन, भांडी मी लावेन ,मस्त विश्रांती घेऊ, आवडता पिक्चर घरी पाहू, लोळत पडू' असं जाहिर करुन परिणाम टेस्ट करावेत.

छान संयमित लिहिलंय. हा प्रोब्लेम ब-याच जणांना/जणींना होतो आणि याची कारणे अनेकानेक असु शकतात. कथानायकाने त्याला सुचले त्या दिशेने सुरवात केलीय प्रोब्लेम सोडवण्यासाठी. बघु पुढे काय होते ते.

या संवेदनशील विषयावर अत्यंत संतूलितपणे आणि समंजसपणे लिहीत आहात. विषय आणि लिखाण दोन्हीही उत्तम आहे. वाचतेय.

मस्त लिहिताय , कीप इट अप.
जरा आयडिया पुरवु का ? Proud कथानायकाला नायकीणीला घेऊन कुठे तरी हिलस्टेशनवर घेऊन जायला सांगा म्हणजे शृंगार कथा पुढे सरकेल.

अतिशय संयत लेखन आणि ज्वलंत परंतु अनुल्लेखित विषय ज्या धाड्साने हाताळ्ता आहात त्याबद्दल अभिनंदनही!

>>या संवेदनशील विषयावर अत्यंत संतूलितपणे आणि समंजसपणे लिहीत आहात. विषय आणि लिखाण दोन्हीही उत्तम आहे. वाचतेय.>> +१

आभारी आहे . आपल्या सुचनांबद्दल धन्यवाद . पुढेही असेच लिहिण्याचा प्रयत्न राहिल . आपले अभिप्राय कळवत रहा .

..