मदत हवी आहे - निवासी कार्यकर्ते (residential staff/worker) पोसिशन कुठे मिळू शकेल?

Submitted by रायगड on 28 May, 2022 - 02:11

माझ्या नात्यात एक ग्रुहस्थ - वय वर्षे ८०+ आणि त्यांचा मुलगा - वय ५० - असे दोघेच रहातात. वडिल रिटायर्ड होमिओपथी डॉ...., मुलगा - हा थोडा डोक्याने कमी (iq कमी आणि फार पूर्वी डिप्रेशनचा त्रास झाल्याने १२ वी नंतर सोडून दिलेले शिक्षण). तो घरातली कामं, बाजारहाट वगैरे करतो पण बाकी काही बाहेर काम धंदा करत नाही, कधीच केला नाही. वडील आहेत तोपर्यंत ठीके. पण त्यांच्यामागे त्या मुलाला (पुरूषाला) एकटे रहाणे, सर्व व्यवहार करणे, घर manage करणे - कठीण जाणारे. एकंदरीत पाचपोच, जगात वावरायला लागणारा सेन्स याची त्याच्या कमी आहे.

तर या दोघांना रहाता येईल आणि तिथे काही कामही करता येईल अश्या काही निवासी संस्था कोणाला माहित आहेत का? म्हणजे ते मोठे काका consulting doctor म्हणून काम करू शकतात आणि त्यांचा पन्नाशीतला मुलगा स्ंस्थेत काही लागेल ते - साफसफाई ते भांडी, स्वैपाकाला मदत वगैरे वगैरे करू शकेल? खूप मोबदल्याची अपेक्षा त्यांना नाही. पण त्या मुलाला गुंतवता येणे, पुढे एकटं रहायची वेळ येईल तेव्हा सोबतीला, आजूबाजूला इतर लोकं असतील..असा त्यांचा विचार आहे. मुंबई, पुणे, नाशिक इ. जवळ चालेल. वनवासी कल्याण आश्रम, वा तत्सम निवासी शाळा, व्रुद्धाश्रम असे काही पर्याय डोक्यात येतात. कोणाला काही माहिती असल्यास क्रुपया कळवावे. इतर काही पर्याय सुचत असतील तर ते ही सुचवा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशी पण कुटुंब असतात.
खुप वेदनादायक आहे.
कोणती समाज सेवा म्हणून निराधार लोकांना सांभाळणारी संस्था च त्यांना मदत करू शकेल.

रायगड,
डॉ. विनोद शहांच्या जनसेवा फाउंडेशन, पुणे येथे चौकशी करा.

रायगड, कुटुंबाविषयी वाचून वाईट वाटले.
मी थोडी चौकशी करून सांगते.
त्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळो.

आमच्या गावात फार फार पूर्वी असे कुटुंब होते, त्यांनी त्यांचे घर एका गरीब कुटुंबाला दिले व त्याच्या मोबदल्यात त्यांनी त्यांच्या मतिमंद मुलीला सांभाळले

निवासी कार्यकर्ता म्हणून 80 वर्षाच्या व्यक्तीला नोकरी मिल्ने मुश्किल आहे

अशा नोकर्या तरुण लोकांना देतात, 80 वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीस इतरांची जबाबदारी घेण्याचा जॉब कशाला देतील ? त्यातही ते होमिओपथिक डॉकटर आहेत , म्हणजे ते ऑफिशियल एलोपथ नाहीत. कंपनी ऑफिशियल एम बी बी एस किंवा सायकीयात्री इ झालेला ठेवेल