-राव पाटील!

होम स्टे/ बजेट हॉटेल्स आणि रेस्टोरंट सुचवा

Submitted by अजिंक्यराव पाटील on 19 April, 2024 - 13:46

नमस्कार मायबोलीकर..
येत्या 2 महिन्यात पुणे ते गोवा आणि परत असा प्लॅन आहे. 8 ते 10 दिवसांचा विचार आहे. आम्ही 2 जोड्या स्वतः च्या गाडीने प्रवास करणार आहोत. खालील ठिकाणी/ जवळपास होमस्ते, हॉटेल आणि रेस्तरांत सुचवा.

पहिला मुक्काम: हरिहरेश्वर/श्रीवरधन/ बागमंडला भाग

दुसरा: बागकर हाऊस MTDC मुरुड हर्णे जवळ ठरतंय, उपलब्ध नसल्यास इतर option असावेत.

तिसरा: गणेशगुळे

चौथा: धामापूर/ मालवण तारकर्ली

पाचवा: गोव्यात कुठेही चालेल (दोन दिवसासाठी)

सहावा: कोल्हापूर

सातवा: महाबळेश्वर

नवा गडी

Submitted by अजिंक्यराव पाटील on 1 March, 2024 - 08:01

"हेज्यायची कटकट" करवादत तो भेलकांडत उठला. बंगालीकडचा हा नवा स्टॉक जरा जास्त पावरबाज निघाला होता त्याच्यासाठी. तरी बंगाली सांगत होता, बॉडी बारीक आहे तर जरा कमी दम मार म्हणून. पण बॉडीने काय होतंय भेंडी.. अर्ध्या शहरात आपली हवा आहे, कोन माय का लाल पण आपल्या नादाला लागत नाही. चुकून कोणी तसं वाटलं तरी आपला कोयता आणि तो... साल पण घरच्याना लै प्रॉब्लेम. पूर्वी महिन्यातून एकदा अंडी आणि पाव्हने आल्यावर चिकन खाणारे हे, आता रोज बोट्या हाणतात तेव्हा नाय दिसत का हा पैसा कुटून आला. जाउंदे भेंडी.. सकाळ सकाळ काय भोसडा उदास करायचा..

विषय: 
शब्दखुणा: 

प्यायला पाहिजे!

Submitted by अजिंक्यराव पाटील on 2 February, 2021 - 01:37

कसेतरी कुठेतरी जगायला पाहिजे
म्हणूनच थोडीतरी प्यायला पाहिजे!

हजारो उठतात या अंतरंगी वेदना,
वेदना विसरायला प्यायला पाहिजे!

हजार प्रश्न लाखो चिंता, हजारो कारणे,
साऱ्यांना एक उत्तर प्यायला पाहिजे!

नकोशी कुणा असते उन्मनी अवस्था
कधीतरी कारणाविना प्यायला पाहिजे!

पडो कुणी प्रेमात, डोळ्यात जावे गुंतुनी..
वारुणीच रमणी आम्हा प्यायला पाहिजे!

वोडका, रम ब्रँडी स्कॉच वा असो व्हिस्कीही,
दर्जा सांभाळून मात्र प्यायला पाहिजे!

घडीभर सुख हे मजबुरी होऊ नये,
तिने नव्हे आपण तिला प्यायला पाहिजे!

-राव पाटील

विषय: 
शब्दखुणा: 

मला जी वाचायची आहेत ती पुस्तके- गझल

Submitted by अजिंक्यराव पाटील on 7 December, 2020 - 10:28

मला जी वाचायची आहेत ती पुस्तके,
माणसापेक्षा बरीच आहेत ती पुस्तके.

भ्रांत जीवनाची कसे जगावे कळेच ना,
अश्यावेळी सोबत जी देतात ती पुस्तके

परत करतो म्हणत नेली होती ज्यांनी,
आठवती का त्यांना तरी आज ती पुस्तके

माणसांचे वागणे अहो आता झाले असे,
नेमके कसे सांगणार नाहीत ती पुस्तके.

-राव पाटील (उगाच काहीतरी)

विषय: 
शब्दखुणा: 

खेळ: भाग २

Submitted by अजिंक्यराव पाटील on 19 June, 2020 - 06:13

खेळ: भाग १: https://www.maayboli.com/node/75151

गेल्या अनेक दिवसांपासून लाटकरांच्या मनात असलेला विचार त्यांनी बोलून दाखवला होता. एन्काउंटर स्पेशालिस्ट असा शिक्का, त्यामागोमाग येणारे हेवेदावे, अंतर्गत राजकारण, होणारी बदनामी या सर्वांची कल्पना त्यांना होतीच. म्हणूनच "एथिकल शूटर" ह्या उपाधीचा शोध त्यांनी मनातल्या मनात लावून ठेवला होता. यासोबत येणाऱ्या संभाव्य धोक्यांची कल्पना त्यांना होतीच, पण नियंत्रित वातावरणात त्यांचा बेत यशस्वी होऊ शकतो हे देखील त्यांना नीट माहित होतं.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - -राव पाटील!