मदत

सौ. वीणाताई श्रीकांत सहस्रबुद्धे (थर्ड आय असोसिएशनच्या संचालिका) यांच्या कार्याशी ओळख: संयुक्ता मुलाखत

Submitted by dhaaraa on 25 March, 2012 - 21:26

नशिबाने जरी जग दाखवणे नाकारले तरी आपल्या मनःचक्षूंनी जग पाहू इच्छिणार्‍या दृष्टीहीनांसाठी तिसर्‍या डोळ्याच्या रुपात आपुलकीने मदतीचा हात पुढे करण्यार्‍या नाशिकच्या 'थर्ड आय असोसिएशन' (पुर्वाश्रमीची थर्ड आय फाऊंडेशन) या दृष्टीहीनांसाठी, विशेषतः दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कार्यरत असलेल्या संस्थेची, आणि संस्थेच्या कामाची ओळख मायबोलीकरांना करून देण्याचा हा माझा प्रयत्न! गेली १४ वर्षे विविध अडचणींवर मात करून नेटाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणार्‍या या संस्थेच्या संचालिका आहेत - सौ. वीणा श्रीकांत सहस्रबुद्धे!

भेट सावली संस्थेच्या मुलांशी!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 6 February, 2012 - 14:07

गेले वर्षभर आपण मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे ह्या ना त्या रूपात पुण्यातील सावली सेवा संस्थेच्या गरजू मुलामुलींना शैक्षणिक मदत करत आहोत. परंतु या संस्थेच्या विश्वस्त मृणालिनीताई भाटवडेकर व संस्थेच्या देखभालीतील काही मुलांना भेटायचा माझा योग आला तो मायबोलीकरीण रुनी पॉटर हिच्या पुणे भेटीत! या भेटीचा हा वृत्तांत व अनुभव मांडण्याचा प्रयत्न केलाय!

अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : संबंधित धोके, शक्यता, खबरदारी व मदत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 July, 2011 - 09:46

वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....

आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?

ज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 16 June, 2011 - 09:58

सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ.

Pages

Subscribe to RSS - मदत