मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
गटग
आमचं मुंबई गटग
गृपवर बोलता बोलता आम्हीही गटग करायचे ठरवले, पुणेकरांना जमण्यासारखे नव्हते पण अर्जिता पुण्याहुन माहेरी येणार होती दसर्याच्या निमित्ताने म्हणुन आम्ही रविवारी ५ ऑक्टोबरला गटग करण्याचे ठरवले, पण मुंबईत कुठे भेटायचे यावर चर्चा झाल्या , दादरला भेटायचे ठरले, मामीने दादर ईस्ट ला ग्रेट पंजाबचे नाव सुचवले, शेवटपर्यंत कोण कोण येणार हे नक्की नव्हते पण जवळपास ८-१० जणी तयार झाल्या. हळहळु गटगचा दिवस जवळ आला तश्या बर्याच जणी वैयक्तीक अडचणींमुळे येउ शकल्या नाहीत आणी आम्ही ५ जणी ज्या गटगला नक्की जमणार होतो त्यांनी १२ वाजता भेटण्याचे ठरवले.
मायबोली बंगळुर गटग!
..
..
..
एक अकेला इस शहर में...
असं वाटलं.. घरची आठवण आली..
माय मराठी ची ओढ जाणवु लागली की पहिलं काम काय करावं?
माबो उघडावं!
अन ह्या सुंदर विश्वात स्वतः ला झोकुन द्यावं.. इथे काय नाही?
आईची माया.. बाबांचा कडक पणा.. बहीण भावांचं प्रेम.. मायेचा ओलावा.. आणि ज्ञानाचं भंडार..
ईथेच..भाववेधी काही वाचतो, हीरीरी ने आपली मते मांडतो, कुठला चित्रपट पाहीला ते बोलतो, काय खाल्लं, काय घेतलं सगळं शेअर करतो आपण..
आणि आपल्या सारखेच इतर अनेक जण..
ह्या सगळ्या लोकांना प्रत्यक्षात भेटावसं न वाटेल तर नवल!
पण ते जरा कठीण आहे कारण आपण देशा-देशात विभगलेलो..
मायबोलीकर मनीषला भेटण्यासाठी गटग
तर, मायबोलीकर मनीष पुण्यास सुट्टीनिमित्त येत आहे.
त्याला भेटण्यासाठी गटग करण्याचे आयोजिले आहे.
तरी सर्वांनी अवश्य येण्याचे करावे. धन्यवाद. कृपया. धन्यवाद.
वर्जिनिया आणि वाशिंगटन डी. सी. गटग
नमस्कार जनहो.
रुनि, लालू, मानुषी, स्वाती दांडेकर आणि मी बी - असे आम्ही पाचजण येत्या शुक्रवारी (११ एप्रिल २०१४) हरंडन इथे भेटणार आहोत. व्हर्जिनिया आणि वाशिंगटन डी. सी. इथे राहणार्या मायबोलिकरांना जर ह्या गटग मधे यावेसे वाटत असेल तर कृपया मला संदेश पाठवा. जर दुरवरुन कुणाला यायचे असेल तर आपले स्वागतच आहे!
गटग येत्या शुक्रवारी (११ एप्रिल २०१४) सायंकाळी ६:३० ला ठरले आहे.
स्थळ - हरंडन
सायकल राईड - २
सायकल राईड - २
पहिल्या राईड नंतर अनेक जणांनी विचारणा केली की दुसरी राईड कधी? तर घेऊन येत आहोत. दुसरी राईड. हा पेपर थोडा(साच) अवघड आहे. एक छोट्टासा घाट मध्ये आहे. :)
ता २३ फेब.
दिवस रविवार
वेळ : सकाळी साडेसहा (परत :) )
ठिकाण : थोडे अवघड पण तरीही जमेल असेच.
चांदणी चौक ( चौकाकडे जाणार्या रस्त्यावर पण बायपास वरच थांबायचे.)
राईड १ - चांदणी चौक ते पिरंगुट. ( चौक ते पिंरगुट १२ किमी)
राईड २ - पिरंगुट ते आनंदगाव (ज्यांना समोर जायचे त्यांच्यासाठी) पुढे ८ ते ९ एक किमी.
एकुण अंतर (चांदणी चौकापासून ) २१-२२ किमी वन वे.
पुणे गटग १५ डिसेंबर २०१३
येत्या रविवारी पुण्यात गटग ठरवले आहे. कोणाला जमू शकेल त्यांनी कळवा व अवश्य या.
गंधर्वची गूगल मॅप लिन्क. साधारण या ठिकाणी आहे.
गटग
उगाच भेटण्यासाठी ठरवलेले गटग
गटग
१६ नोव्हेंबरला भेटूया का दुपारी ४ वाजता बोरिवलीत? म्हणजे ठाण्याहून कोणी येणार असेल तरी त्यांना सोपं पडेल, घोडबंदर रोड वरून?
बोरिवलीत पश्चिमेला स्टेशनजवळ राधाकृष्ण म्हणून हॉटेल आहे. दुपारी चार वाजता आपल्याला ते मोकळं मिळेल. काय म्हणता?
गटग
मुंबईमध्ये पुन्हा कधी गटग आहे. मला खूप उत्सुकता लागली आहे सगळ्यांना भेटायची.