टोपी गटग (निंबुडा भेट गटग)
आज दि. १८ मे २०१० रोजी टोपीमिथुन च्या म२ (म stands for मुंबई) हापिसात "निंबुडा भेट (मिनी) गटग" संपन्न जाहले. त्याचा हा मिनी-वृत्तांत. हा गटग आयत्या वेळी ठरविण्यात आल्याने आणि टोपीमिथुनकरांसाठीच असल्याने बाहेरील लोकांच्या दारात रिक्षा फिरविण्यात आलेली नव्हती. परंतु टोपीमिथुनकरां व्यतिरिक्तच्या लोकांना टुकटुक करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी या वृ. ची रिक्षा दारोदार, गल्लोगल्ली फिरविण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. (आधीच आपलं intention clear केलेलं बरं! नाहीतर कोपर्यातून कुणीतरी बोंब मारायचं की आम्हाला बोलावलं नव्हतं तर वृ. चा घाट कशासाठी!
)